Weekly Lucky Zodiac Signs : लक्ष्मीयोगात मिळेल खास यश! या ३ लकी राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा सप्ताह-weekly lucky zodiac signs from 25 to 31 august 2024 kark kanya meen rashi predictions ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Lucky Zodiac Signs : लक्ष्मीयोगात मिळेल खास यश! या ३ लकी राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा सप्ताह

Weekly Lucky Zodiac Signs : लक्ष्मीयोगात मिळेल खास यश! या ३ लकी राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा सप्ताह

Aug 26, 2024 12:01 PM IST

Weekly Lucky Rashi 25 to 31 august 2024 : ग्रह नक्षत्राच्या शुभ योग संयोगात ३ राशीच्या व्यक्तिंना ऑगस्ट महिन्याचा शेवटचा सप्ताह लकी ठरेल. जाणून घ्या या आठवड्यात कोणाला खास यश मिळेल!

आठवड्याच्या लकी राशी
आठवड्याच्या लकी राशी

सप्ताहातील चंद्र गोचर पाहता सरस्वतीयोग आणि लक्ष्मीयोग हे दोन ग्रहयोग घटीत होत आहे. या राशींना होणार या योगांचा सर्वाधिक लाभ!

[ कर्क, कन्या, मीन ]

कर्कः 

सप्ताहातील चंद्राचा होणारा संयोग पाहता लक्ष्मीयोग योग घटीत होत आहे. आर्थिक बाबतीत लाभदायी घटना घडणार आहे. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या इच्छित महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अति आत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थ्यी विद्याभ्यासात प्रगती करतील. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल. अचानक धनलाभ होतील.

चंद्रबल शुभ तारीखः २६, २८, ३०, ०१.

कन्याः 

सप्ताहात बुध मार्गस्थ होणार असुन आपणास आर्थिक लाभ घडविणारा योग आहे. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. गृहसौख्य उत्तम लाभेल. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यां कडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. ग्रहबल उत्तम लाभल्याने विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथ प्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल.

चंद्रबल शुभ तारीखः २७, २८, ३०, ३१.

मीनः 

सप्ताहात सरस्वतीयोग घटीत होत असल्याने शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील कामाचे कौतुक होईल. भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. शासकिय क्षेत्रात व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी असेल. सप्ताहात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील.

चंद्रबल शुभ तारीखः २७, २९, ३१, ०१.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)