सप्ताहातील चंद्राचा बुध, रवि, शुक्र आणि केतुशी संयोग होत असुन राजयोग, सरस्वतीयोग आणि विपरित ग्रहण योग घटीत होत आहे. या शुभयोगाचा या राशींना होणार विशेष फायदा!
[ मिथुन, तूळ, मकर ]
सप्ताहात राजयोगात व्यापारात आर्थिक उलाढाली तून आकस्मिक धनलाभ होणार आहेत. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक सप्ताह आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहिल. कर्ज प्रकरण मंजुर होतील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील.
चंद्रबल शुभ तारीखः ०३, ०५, ०७, ०८.
सप्ताहात चंद्र मंगळ योगात आपणास आकस्मिक धनलाभ मिळवून देईल. आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. चंद्र गोचर आणि शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ मंडळी सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्र मैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. व्यवसायात नवीन प्रकल्प आरंभ कराल.
चंद्रबल शुभ तारीखः ०२, ०४, ०५, ०७.
सप्ताहात गुरू चंद्र संयोगात कार्यक्षेत्रात मोठे यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नोकरीत मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभ योग आहेत. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. प्रवास सुखकर होईल.
चंद्रबल शुभ तारीखः ०३, ०५, ०६, ०८.