मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly lucky zodiac signs: गजकेसरी व लक्ष्मीयोगामुळं ३ राशींसाठी फायद्याचा ठरणार हा आठवडा

Weekly lucky zodiac signs: गजकेसरी व लक्ष्मीयोगामुळं ३ राशींसाठी फायद्याचा ठरणार हा आठवडा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 15, 2024 03:18 PM IST

Weekly Lucky Rashi 15 to 21 January 2024: आठवडा ग्रह-नक्षत्राच्या स्थितीमुळे तीन राशींना अपेक्षेपेक्षा अधिक लाभ देणारा राहील. जाणून घ्या या तीन राशी कोणत्या आहेत.

weekly lucky zodiac signs 15 to 21 january 2024
weekly lucky zodiac signs 15 to 21 january 2024

Weekly Lucky Zodiac Signs : या सप्ताहात गुरूच्या भ्रमणात 'गजकेसरीयोग' आणि शुक्राच्या राशीपरिवर्तनात 'लक्ष्मीयोग' घटीत होत असून, 'या' राशींना जास्तीचा लाभ होणार! वाहन आणि नवीन गृहखरेदीसाठी उत्तम योग ! जाणून घ्या कोणत्या ३ राशींसाठी आठवडा ठरेल भाग्याचा. 

सिंहः 

सप्ताहात आपणास शुक्रबल लाभणार असल्याने प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार कराल. कामात धडाडी दाखवाल. तटस्थ आणि स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे सर्वात वेगळे उठून दिसाल. नवनवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी सप्ताह आहे. मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारीवर्गाला आर्थिक फायद्याचा कालावधी आहे. आनंदी व ऊत्साही सप्ताह राहील. मनात प्रसन्नता असेल. आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील.

चंद्रबल शुभ तारीखः १५, १७, २०, २१.

मकरः 

सप्ताहात शुक्र आपणास आकस्मिक धनलाभ मिळवून देईल. कलाकारांच्या हातून जगावेगळ्या कलाकृती निर्माण होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वृत्ती आनंदी राहील. वर्तमानकाळात वावरत असलात तरी काम करता करता तुमच्या डोक्यात सतत भविष्यकाळ राहील. आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. लाभ स्थानातील चंद्रगोचर आणि शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ मंडळी सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. सुख मिळेल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. व्यवसायात नवीन प्रकल्प आरंभ कराल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल.

चंद्रबल शुभ तारीखः १६, १७, १९, २०.

मीनः 

सप्ताहात आपणास शुक्र बदलात मोठे आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात फायदा मिळेल. एखादी महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर अवश्य करावी. आर्थिक लाभ चांगले होतील. व्यापारात आर्थिक उलाढालीतून आकस्मिक धनलाभ होणार आहेत. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक सप्ताह आहे. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभ कालावधी आहे.

चंद्रबल शुभ तारीखः १५, १६,२०, २१.