मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly lucky zodiac signs : विघ्नहर्ता या ३ राशींची विघ्न करेल दूर, आठवडा विशेष यशाचा व लाभाचा

Weekly lucky zodiac signs : विघ्नहर्ता या ३ राशींची विघ्न करेल दूर, आठवडा विशेष यशाचा व लाभाचा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 12, 2024 09:55 AM IST

Weekly Lucky Rashi 12 to 18 february 2024: फेब्रुवारी महिन्याच्या या सप्ताहत माघी गणेश जयंती आहे, तसं तर बाप्पाचा आशीर्वाद सर्वांसोबत असतो, पण जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर गणपती बाप्पाची खास कृपा राहील.

lucky zodiac signs from 12 to 18 february 2024
lucky zodiac signs from 12 to 18 february 2024

सप्ताहात रविचं राशीपरिवर्तन आणी गुरू व राहु या आकस्मिक लाभ देणाऱ्या ग्रहांशी होणारा चंद्रयोग पाहता 'या' ३ राशींसाठी ग्रहमान विशेष अनुकुल राहतील! कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ मिळेल!

मिथुनः 

सप्ताहात रवि बदलात आणि गुरूशी होणाऱ्या चंद्रसंयोगात लाभदायी घटना घडणार आहे. सप्ताह आनंददायी असणार आहे. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील. आपल्या इच्छित महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थ्यी विद्याभ्यासात प्रगती करतील. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील.

चंद्रबल शुभ तारीखः १२, १४, १५, १७.

सिंहः 

सप्ताहात चंदगोचर पाहता प्रतिभेस वाव मिळेल. शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. गुरूबल पाहता गुरूकृपा लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील कामाचे कौतुक होईल. भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. शासकिय क्षेत्रात व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी असेल. सप्ताहात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. ह्या शुभ योगात लाभ घ्या. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत.

चंद्रबल शुभ तारीखः १४, १५, १७, १८.

मीनः 

सप्ताहात गुरूचा चंद्राशी होणारा योग आणि धनस्थानात राहु-नेपच्युन यामुळे आपणास मोठा आर्थिक लाभ घडविणारा योग आहे. सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. गृहसौख्य उत्तम लाभेल. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. ग्रहबल उत्तम लाभल्याने विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथ प्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल.

चंद्रबल शुभ तारीखः १३, १५, १६, १८.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)