Weekly lucky zodiac signs: नववर्षाचा पहिला आठवडा या ३ राशींसाठी अपेक्षेपेक्षा अधिक लाभाचा-weekly lucky zodiac signs from 1 to 7 january 2024 mesh vrishchik makar rashi predictions ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly lucky zodiac signs: नववर्षाचा पहिला आठवडा या ३ राशींसाठी अपेक्षेपेक्षा अधिक लाभाचा

Weekly lucky zodiac signs: नववर्षाचा पहिला आठवडा या ३ राशींसाठी अपेक्षेपेक्षा अधिक लाभाचा

Jan 01, 2024 11:18 AM IST

Weekly Lucky Rashi 1 to 7 January 2024: नवीन वर्षाचा पहिला आठवडा ग्रह-नक्षत्राच्या स्थितीमुळे तीन राशींना अपेक्षेपेक्षा अधिक लाभ देणारा राहील.

Weekly Lucky Rashi 1 to 7 January 2024
Weekly Lucky Rashi 1 to 7 January 2024

नववर्षाच्या पहिल्या सप्ताहात व्यापार रोजगार आणि बुद्धीचा स्वामी बुध मार्गी होत असल्याने 'या' राशींना वर्षाच्या पहिल्याच सप्ताहात नवीन संधी सह भरघोस लाभ मिळणार आहे. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांच्यासाठी शुभ तारीख कोणती आहे.

मेषः 

सप्ताहात शुक्र आणि बुध यांचा संयोग निर्माण झाल्याने लाभदायक घटना घडणार आहे. नोकरी व रोजगारात आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील. आपल्या इच्छित महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. नवीन संधी येऊ शकते. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरीत प्रशंसा होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा सप्ताह ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोशपूर्वक कामात रस घ्याल.

चंद्रबल शुभ तारीखः ०२, ०३, ०४, ०७ .

वृश्चिकः 

सप्ताहात बुध मार्गी होत असल्याने आपणास आर्थिक लाभ घडविणारा योग आहे. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नवीन आरंभ कराल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागतील. आर्थिक बाबतीत फायद्याचा सप्ताह आहे. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल.

चंद्रबल शुभ तारीखः ०१, ०३, ०५, ०६.

मकरः 

सप्ताहात बलवान चंद्रभ्रमणात मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. मनोबल कमालीचे उंचावलेल असेल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. शुक्र आणि बुध राशी बदलातील प्रभावात तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनशांती लाभेल. घर खरेदीचा योग आहे. जंगम मालमत्तेत वाढ होईल.

चंद्रबल शुभ तारीखः ०२, ०४, ०५, ०६.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Whats_app_banner