सप्ताहात दर्श भावुका अमावास्या शनैश्चर जयंती आहे. उदीत बुध अस्त होणार आहे. चंद्रमा मंगळ, शुक्र आणि बुधाच्या राशीतून तर केतु, शुक्र, मंगळ, राहु व गुरूच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. चंद्र या गोचरात मंगळ, रवि,बुध,गुरू,शुक्र,हर्शल या सहा ग्रहांशी युतीयोग करीत असल्याने लक्ष्मीयोग, बुद्धादित्ययोग, गजकेसरी योग, राजयोग अश्या प्रकारे चार मोठे योग घटीत होत आहेत. या योगाचा आपल्या जन्मराशीनुसार कसा प्रभाव राहील! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!
सप्ताहात लक्ष्मीयोगात अनुकुल वातावरण निर्माण करतील. खूप दिवस वाट पहात असलेले आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. थोडीशी चैन खरेदीचा मोह होईल. घरातील काही गोष्टींसाठी पैसाही खर्च कराल. कुटुंबात खेळी मेळीचे आनंदी वातावरण राहिल्यामुळे मन:स्वास्थ्य लाभेल. परंतू तुमच्या मूडी स्वभावाचे दर्शनही इतरांना घडेल. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नको त्या मार्गाचा अवलंब कराल. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत घोषणा करू नका. बोलण्यातील टीकात्मक वृत्ती टाळा. विद्यार्थ्यांचे लक्ष विद्याभ्यासात राहील. पित्यापासून अथवा वडिलधाऱ्या व्यक्तीपासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. संतती सुख उत्तम राहील. तरुण-तरुणींचे विवाहाचे योग आहेत. पत्नी सुंदर मिळेल. विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल. स्थावर इस्टेटीचा उपभोग घ्याल. उधळ्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. अन्यथा कर्जबाजारी व्हाल. व्यवसाय-धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. हातात कायम पैसा खेळता राहील. कुटुंबात मान मिळेल. समाधानी वृत्तीमुळे समाजात कुठेही अडचण येणार नाही. नातेवाईकांकडून काही बाबतीत त्रास जाणवेल.
शुभ दिवस: मंगळवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात राजयोगात शुभ फलदायी घटना घडणार आहेत. तुमच्यातील आनंदी वृत्ती इतरांना सुखावून जाईल. वाचन लिखाण करायला सवड मिळेल. प्रवासाचे योग येतील. ज्यांना विवाह करायचाय त्यांनी जोडीदार शोधण्याची मोहिम हाती घ्यायला हरकत नाही. बिनधास्तपणा तुमच्या नसानसात असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक येईल. घर बदल करण्याचे योग आहेत. तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल. वत्कृत्वकलेत वाढ होईल. धार्मिक अध्यात्मिक सोख्य लाभेल. सत्पुरुषांच्या सेवेतून सन्मार्गाने उत्तम धन मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नोकरीत बदलीचे योग आहेत. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ सप्ताह आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. त्या प्रयत्नात सफलतापूर्वक यश मिळेल. आकस्मिक धनलाभ घडेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम सप्ताह राहील.
शुभदिवसः गुरुवार, शुक्रवार, रविवार.
सप्ताहात बुद्धादित्य योगात स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. नोकरी व्यवसायात अनेक कामे चिकाटीने पूर्ण कराल. आर्थिक बाजूही सुधारेल. अत्यंत विचार करून व्यवहाराला धरून पैसा खर्च कराल. मोजकं बोलून शांत राहून आपली कामे साध्य कराल. कोळसा लोखंडी सामानाचा व्यापार करणाऱ्यांना पैसा मिळेल. वैवाहिक जीवनात भावना आणि विचार यांचे अपरिपक्क रूप समोर आल्यामुळे थोडे गैसमज होण्याची शक्यता आहे. आपले मनोबल व आत्म विश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे.कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक स्वास्थ लाभेल.
शुभदिवसः सोमवार, बुधवार, रविवार.
सप्ताहात चंद्रबल पाहता कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तरी त्या कर्तव्य निष्ठेने त्या पारही पाडाल. यावेळी आर्थिक तोंडमिळवणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्या साठी कष्ट घेतलेत तरी मनाजोगे यश मिळणार नाही. परिस्थितीचे योग्य आकलन न झाल्यामुळे निर्णयात अथवा बोलण्यात ठामपणा आढळणार नाही. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल.संतती सुख उत्तम राहील. तरुण-तरुणींचे विवाहाचे योग आहेत. पत्नी सुंदर मिळेल. विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल. स्थावर इस्टेटीचा उपभोग घ्याल. उधळ्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा अन्यथा कर्जबाजारी व्हाल. व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. हातात कायम पैसा खेळता राहील. कुटुंबात मान मिळेल. समाधानी वृत्तीमुळे समाजात कुठेही अडचण येणार नाही.
शुभदिवस: मंगळवार, गुरुवार, शनिवार.
सप्ताहात रवि चंद्र युतीत आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहिल्यामुळे नोकरी व्यवसायात त्याचा कामावर परिणाम होईल. लेखकांना लिखाणास उत्कृष्ट काळ आहे. प्रेमप्रकरणा मध्ये रोखठोक व्यवहार करेल. घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहिले तरी तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास गोष्टी टोकापर्यंत जाणार नाही. किर्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल. आळशीपणा त्याग करा. बंधुसुख उत्तम मिळेल. आरोग्याच्या छोट्या-छोट्या तक्रारी राहतील. डोळ्यांचे विकार संभवतात. ललित वाङमयाची आवड राहील. आपल्याकडे कल्पकता शक्ती उत्तम असते. आपण कामात सातत्य ठेवा. कलाकारांना विशेषत गायन व वादक यांना नविन संधी मिळतील. नातेवाईक व शेजारी वर्गीशी आपले सलोख्याचे संबंध राहतील. प्रवासात प्रियजनांच्या भेटी-गाठी होतील. तरुणतरुणींचे विवाहाचे योग आहेत. सार्वजनिक कामाची हौस निर्माण होईल. आपण शूर व पराक्रमी आहात. व्यापारातील हुशारीमुळे आपली दुसऱ्यांवर सहज छाप पडेल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. मित्रमैत्रिणी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करा. नोकरीत बढती मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग विद्ववत्तेचा लौकीक होईल.
शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, रविवार.
सप्ताहात बुद्धादित्य उद्योग क्षेत्रात यश मिळण्या साठी नवीन मार्गाचा अवलंब कराल. कौटुंबिक जीवनात भावनिक पातळीवर निर्णय घ्याल. उत्साह आणि आनंदी वृत्तीमुळे सहवासातील इतर व्यक्तींनाही स्फूर्ती द्याल. प्रत्येक बाबतीत चोखंदळपणा आणि आवडीनिवडी जास्त ठेवाल. कलाकारांना आपल्यातील क्षमतेला वाव मिळेल. रोजगारात नविन संधी प्रस्ताव येतील. बढतीचे योग आहेत. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. बेरोजगारांना नोकरी मिळेल. शत्रुपक्षावर मात कराल. वैद्यकीय व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत.आरोग्य उत्तम राहील. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रवासात लाभ होईल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना हा सप्ताह आर्थिकदृष्या लाभ देणारा आहे.
शुभदिवसः सोमवार, गुरुवार, रविवार.
सप्ताहात चंद्रबल पाहता बुद्धीच्या जोरावर धाडस दाखवून प्रत्येक काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कराल. राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. पैसा खर्च करण्यातही लहरीपणा जाणवेल. कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. तुमच्यातील कलेला समाजातील लोकांची दाद मिळेल. कष्टाने का होईना जूनी येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे ध्येयावर प्रेम कराल. सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे जाल. समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल.संकटांना तोंड द्यावे लागले तरी मन:शांती ढळू देऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने काहीसा खर्चिक आठवडा राहिल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत:आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. सप्ताहाच्या मध्य काळातील चंद्र भ्रमण मात्र शुभ फलदायी ठरणार आहे. मनासारख्या घटना घडायला सुरुवात होईल. तरुण तरुणीमध्ये विवाहयोग जुळतील. आपल्या लेखण शैलीत उत्तम प्रतिसाद मिळेल. कलाकारांना मान सन्मान, प्रसिद्ध मिळेल.
शुभदिवस: शुक्रवार, बुधवार, शनिवार.
सप्ताहाय लक्ष्मीयोगात आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजना आखाल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी कामही चालू कराल. परदेशगमनाचे योग संभवतात. आत्मविश्वास वाढेल. जवळच्या व्यक्तींकडून मदत मिळणार नाही त्यामुळे परस्थितीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पावले उचलाल. लांबणीवर पडलेली कामे मार्गी लागतील. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. नोकरीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारीवर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. आंनदायक वातावरण राहिल.
शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, रविवार.
सप्ताहाच्या सुरुवातीला होणार चंद्रभ्रमणात मनात थोडा गोंधळ असला तरी खूप चांगलं संशोधन करू शकता. काही वेळेस स्वत:हून संकटे ओढवून घ्याल. सुबत्ता असली तरी संशयी स्वभावामुळे जीवनात आनंद उपभोगता येत नाही संतती आजारी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शिक्षणासाठी परदेशगमन होऊ शकते. प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही आयुष्यात घडतील. आरोग्याच्या दृष्टीकोनातुन तापदायक जाणार आहे. मानसिक ताणतणाव राहिल. वादविवाद वाढतील. प्रकृतीच्या त्रासाकडे अजिबातच दुर्लक्ष करु नये. कुटुंबात कलह जोडीदारांशी वाद होण्याची शक्यता आहे. जमिन खरेदी विक्री तोट्यात राहील. महिलांनी आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. उद्योग व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील. संतती पत्नी विषयी काळजी व चिंता वाढेल. सप्ताहाच्या मध्यकाळा नंतर मात्र चंद्रभ्रमण नवम व दशम स्थानातून होत आहे. व्यवसायिकांना आपल्या योजना प्रत्यक्ष व्यवसायात उतरवता येतील.
शुभदिवसः गुरुवार, शुक्रवार, शनिवार.
सप्ताहाच्या सुरुवातीच्या कालखंडात व्यवसायात अवाजवी कल्पनांना थारा देऊ नये. तुमच्या कडक आणि मर्मभेदी बोलण्यामुळे दुसऱ्याची मने दुखावणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराच्या सुस्वभावामुळे बऱ्याच अडचणी दूर होतील. तुम्ही फक्त टोकाची भूमिका घेऊ नये. कर्ज काढले असेल तर त्याचे हप्ते वेळेत भरावे लागतील. व्यवहार करताना स्वत:चा फायदा लक्षात घेऊन व्यवहार करावे लागतील. संततीसाठी एरवीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. आपणास काही नवीन समस्यांना तोंड द्यावे लागेल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नीसोबत मधुर संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या विषयी गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्रेमसंबंधात वादविवादाचे प्रकार घडतील. भागीदारीतील आर्थिक व्यवहार देवाण-घेवाण अडचणीत आणणार आहेत. व्यवसायिकांना कर्ज प्रकरण त्रासदायक ठरण्याची संभावना आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी स्नेहपूर्वक वागा. आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. संततीतीविषयी अशुभ घटना घडतील. मानसिक अस्वस्थता उत्पन करणारा सप्ताह आहे. व्यापार वर्गांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. निर्णय चुकू शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. शक्यतो दुरवरचे प्रवास टाळावेत.
शुभदिवस : मंगळवार, गुरुवार, रविवार.
सप्ताहात चंद्रभ्रमण पाहता कष्टदायक सप्ताह असणार आहे. विचारापेक्षा कृतीला जास्त महत्त्व देत आल्यामुळे कधीतरी तुमच्या हातून अविचारही होऊ शकतो. त्यासाठी एखाद्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करा. प्रवासाचे बेत आखाल परंतु प्रकृती सांभाळून प्रवास करावे लागतील. प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. परंतु या भेटीगाठींमध्ये भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व दिल्याचे जाणवेल. आर्थिक चणचण भासेल. ऐन मोक्याच्या वेळी कुठूनही पैसा उभा राहू शकतो. आपणास कठोर परिश्रम घ्यावे लागतील. गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. वाहनापासून अपघाताची शक्यता राहिल. आरोग्य ठीक राहणार नाही. कायम चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरात चोरी व आग ह्याची भिती राहील.घरात कलह होतील. त्यामुळे नवनवीन घरात राहण्याचे प्रसंग येतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. आपल्या व्यवहारात भानगडी उपस्थित होतील. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता वाटते. वडिलांच्या इस्टेटीत लाभ होणार नाही. सार्वजनिक कामात सावधानतेने भाग घ्या.
शुभदिवसः बुधवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात चंद्रभ्रमण पाहता रोजगारात मध्यम स्वरूपाचे फले मिळतील. एखाद्या गोष्टीमध्ये वाहून न जाता तटस्थपणे विश्लेषण करणे तुम्हाला चांगले जमेल. त्यामुळे तुमचा सल्ला घेण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. राजकारणी लोकांचा जनमानसावर प्रभाव पडेल. नोकरीमध्ये अधिकाराच्या जागेवार वर्णी लागेल. जबाबदारीची कामे अंगावर पडतील. खेळाडूंना नवीन संधी मिळतील. दूरदृष्टी ठेवल्याचा उपयोग होईल. आपल्याकडे कल्पकता शक्ती उत्तम असते. आपण कामात सातत्य ठेवा. कलाकारांना विशेषत गायन व वादक यांना नविन संधी मिळतील. नातेवाईक व शेजारी वर्गीशी आपले सलोख्याचे संबंध राहतील. प्रवासात प्रियजनांच्या भेटी-गाठी होतील. तरुण-तरुणींचे विवाहाचे योग आहेत. सार्वजनिक कामाची हौस निर्माण होईल.आपण शूर व पराक्रमी आहात. व्यापारातील हुशारीमुळे आपली दुसऱ्यांवर सहज छाप पडेल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. मित्रमैत्रिणी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करा. नोकरीत बढती मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग विद्ववत्तेचा लौकीक होईल. संतती सुख उत्तम होईल.
शुभदिवसः सोमवार, बुधवार, रविवार.