मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Horoscope: शुक्र ग्रह राशीबदल करत असल्याने कसा असेल सप्ताह? पाहा साप्ताहिक राशिभविष्य!

Weekly Horoscope: शुक्र ग्रह राशीबदल करत असल्याने कसा असेल सप्ताह? पाहा साप्ताहिक राशिभविष्य!

May 29, 2023 06:33 AM IST

Weekly Horoscope 29 may to 4 June 2023: अनेक राशींसाठी हा आठवडा काळजी घेण्याचा. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा सप्ताहात राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणारं आकस्मिक धनलाभ जाणून घ्या आपल्या राशीनुसार!

Horoscope_2023
Horoscope_2023

मेषः सप्ताहात प्रत्येक वेळी एका नवीन समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.प्रतिकूल परिस्थितीवर करण्यासाठी लागणारे धाडस कमी पड़ते.आणि चुकीच्या मार्गाने जाणे तुम्हाला आवडत नाही.अवघड काळात नाउमेद न होता मानसिक स्वास्थ्य सांभाळणे महत्वाचे आहे.प्रलोभने टाळा.दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता खोल विचार करून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावेत.बोलण्यावर संयम ठेवा.तुमची मते कारण नसताना देऊ नका.नोकरीत सत्ता अधिकाराची पदे सांभाळतांना कठोर निर्णय घ्यावे लागतील.वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.मात्र हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य विघडवणार आहे.काळ बदलला की परिस्थिती बदलते. व्यावसायिकांत कष्ट दगदग वाढणार आहे.व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल.व्यवसायासाठी प्रवास होतील.कौटुंबिक खर्च होईल.शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.कर्ज घेताना विचारपूर्वक कर्ज घ्यावेत.मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील.लेखक वर्गाकडून कलाकारांकडून उत्तम कलेची निर्मिती होईल.वाहने सावकाश चालवा.अपघात भय संभवते.त्यासंबंधी काळजी घ्यावी.

शुभ दिवस: सोमवार, बुधवार, गुरुवार.

वृषभः सप्ताहात कामाचा व्याप वाढणार आहे.आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल.आखलेले कामे काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील.कामातील मध्यस्थांची भुमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होईल.नोकरीत पद आणि जबाबदाऱ्या वाढतील.कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही वाढणार आहेत.नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल.परंतु बोलण्यावर संयम ठेवा.स्पष्ट बोलणे टाळावे. ठरवलेली कामे मार्गी लागतील.नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल.स्थावराच्या देण्या-घेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे. आणि नात्यात मैत्रीत वितृष्टता येईल.उच्च शिक्षण अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल.मार्गदर्शक किंवा शिक्षकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.लेखक कलाकारांनानवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.खाण्यावर आणि व्यसनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

शुभदिवसः मंगळवार,बुधवार,शनिवार.

मिथुनः सप्ताहात ठरलेल्या योजना मार्गी लागतील. धडाडीने निर्णय घेतल्यास महत्वकांक्षा ठेवून परिश्रम केल्यास कार्यक्षेत्राची क्षितीजे विस्तृत झाल्याचे दिसून येईल.नवीन योजना नवीन कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत.योजना आखाव्या लागतील.आणि त्या सहकाऱ्यांकडून पूर्ण करून घ्याव्या लागतील.बरोबरचे सहकारी वरिष्ठ या दोघांची उत्तम साथ मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभही वाढेल.व्यवसाय करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढणार आहेत.प्रगती करण्यासाठी आव्हाने स्वीकारावीच लागतात हे तत्त्व लक्षात ठेवावे.कमिशनचे अथवा ट्रेडिंगचे व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे.व्यवसायातील फायदा वाढेल. व्यवसायानिमत्त प्रवासाचे योग येतील.व्यवसायातील लाभ तसेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक अथवा जमीन स्थावराच्या व्यवहारातून उत्तम आर्थिक फायदा होईल. दानधर्म, पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यावर खर्च करण्याची इच्छा निर्माण होईल.वैवाहिक जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. लेखकवर्गाकडून दर्जेदार लिखाण होईल.स्वप्ने बघितल्याशिवाय ती पूर्ण करण्याची इच्छा होत नाही. नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल.तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.परंतु बोलण्यावर संयम ठेवा.

शुभदिवसः सोमवार,गुरुवार,शनिवार.

कर्कः प्रगतीकारक सप्ताह असणार आहे.आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता आहे.सफलतेचा आनंद मिळणार आहे.हितशत्रू अर्थात गुप्तशत्रू पासुन सावध राहावे.सुसंवाद विश्वास असेल. तरच आपली माणसे सुख-दुःखात आपल्याबरोबर असतात.त्यामुळे घरातील वातावरण बिघडणार नाही. नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही याची खबरदारी घ्यावी.घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लागेल.नोकरीतील वातावरण चांगले राहील.वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल.बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील.व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील.भागीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. अचानक खर्च वाढतील. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल.शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.घर वाहन खरेदीचे योग येतील.विवाहितांनी जोडीदाराबरोबर वादविवाद टाळावेत,टोकाची भूमिका घेऊ नये.व्यसनापासून सावध रहा.आरोग्याची काळजी घ्यावी.दुरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. प्रवासातुन विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाटत नाही.

शुभदिवसः बुधवार,शनिवार,रविवार.

सिंहः सप्ताहात आपण आपल्या कार्यक्षेत्रात सहकारी प्रतिस्पर्ध्यावर सहज मात करू शकाल.परंतु परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे.तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल.मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील.व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे.कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे.वडिलोपार्जित अथवा वडिलां बरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील.व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा.आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.जुनी येणी अचानक वसूल होतील.जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. प्रेमात पुढे जाताना धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या.लेखक व कलाकारांकडून उत्तम कलानिर्मिती होईल.प्रसिद्धीचे योग येतील.आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.घरातील वातावरण बिघडणार नाही. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी .

शुभदिवसः बुधवार,शनिवार,रविवार.

कन्याः सप्ताहात मेहनत वाढवावी लागणार आहे. कलासक्त न्यायप्रिय व भावनिक असणाऱ्या या राशीच्या व्यक्तींने मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे.प्रतिकूल परिस्थिती सावधानतेने हाताळावी लागते.काही अडचणींना सामोरे जायचे आहेआणि यासाठी सोशिकपणा संयम हे तुमचे गुण उपयोगी पडणार आहेत.या त्रासदायक काळात वादविवाद टाळा.दुसऱ्यांना दुखवणे तुम्हाला जमत नाही पण या प्रतिकूल काळात मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबरतुमच्या वागण्या बोलण्यामुळे गैरसमज होणार नाही.तयाची विशेष काळजी घ्या.नोकरीत अचानक बदल घडतील.वातावरण बदलणार आहे.पण बदल नजीकच्या पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरणार आहेत.नोकरीत आपली मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल.वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही. काळात मेहनत वाढवावी लागणार आहे. मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. सोशिकपणा संयम हे तुमचे गुण उपयोगी पडणार आहेत. दुसऱ्यांना दुखवणे तुम्हाला जमत नाही.मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर तुमच्या वागण्या बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. नोकरीत आपली मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल.वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही. मनाप्रमाणे लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही.मात्र नाउमेद होऊ नका.परिस्थिती बदलत असते हे लक्षात ठेवा.काळजीपूर्वक व्यवहार करा.

शुभदिवसः मंगळवार,शनिवार,रविवार.

तुलाः सप्ताहात आपले मनोधैर्य आणि आत्मविश्वास उंचावलेला असणारा आहे.आत्मविश्वास हा महत्त्वाचा असला तरी उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न व त्यातील सातत्य तेवढेच परिणाम करतात हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून सप्ताहात न कंटाळता कार्यरत राहणे गरजेचे राहील. ठरवलेली उद्दिष्टे साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल.परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता.जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे.अपेक्षित संपादन करता येईल.व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील.परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा.पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत.व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग येतील.स्वतःचे अस्तित्व सिद्ध करताना वरिष्ठांचा मान सांभाळा. व्यवसायात वृद्धीच्या संधी चालून येतील.पत्नीसोबत जोडीदाराबरोबर वादविवाद टाळावेत.मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.प्रकृती संभाळा.

शुभदिवसः मंगळवार, बुधवार,शनिवार.

वृश्चिकः सप्ताहात मेहनत करताना शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ताण घेऊ नका.प्रकृतीची विशेष काळजीलागेल. मंगळ लग्नस्थ संताप आणि चिडचिड निर्माण करेल. तसेच या सप्ताहात खर्चावर नियंत्रण कराव लागण्याची शक्यता आहे.वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही.मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत.प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल.कमिशनचे व्यवसाय जाहिरात क्षेत्र मीडिया क्षेत्र कला क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता आहे.नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे.नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.कलाकारासाठी फायदेशीर ठरणार आहे.या सप्ताहात जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे.आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. एकंदरीत हा आठवडा काहीसा कष्टप्रद असणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ दगदग व मानसिक त्रास वाढवणारा.नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील.स्वतंत्र व्यावसायिकांची मध्यस्थांच्या मदतीतून मार्गी लागतील.ठरवलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल.

शुभदिवसः बुधवार,शनिवार,रविवार.

धनुः सप्ताहात ग्रहांची अनुकूलता आहे.कर्तृत्वाला उजाळा देणारा सप्ताह असणार आहे.महत्त्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी या बदलाबरोबरच सत्ता अधिकार मिळणार आहे आणि आर्थिक फायदा अंशतः वाढणार आहे.वरिष्ठांशी मतभेद टाळणे गरजेचे राहील. ऑफिसमध्ये वागण्या-बोलण्यामुळे सहकारी वर्गात गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी कष्ट वाढणार आहेत. मात्र घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फलितही या प्राप्त होईल..व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. नवीन करार अथवा योजना मार्गी लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत.आर्थिक आवक वाढणार आहे, जमीन, स्थावर यात गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या.तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करता येईल. प्रेमिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. प्रियकराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. लेखकवर्ग संपादन कलाकार यांच्याकडून उत्तम कलेची निर्मिती होईल.अपघात भय दर्शवतो.

शुभदिवसः सोमवार,मंगळवार,बुधवार.

मकरः सप्ताहात अपेक्षित असणारे निर्णय येतील. परदेशात नोकरीच्या संधी चालून वरिष्ठांबरोबर वादविवाद टाळणेगरजेचे राहील.नवीन स्वतंत्र व्यावसायिकांसाठी खऱ्या अर्थाने सफलता देणारा काळ ठरेल.गुरू शुभ फलदायी ठरेल.ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत.नफ्यात वाढ होईल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील.आर्थिक उत्कर्षाचा साप्ताहिक कालखंड आहे.विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल.महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शन व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार आहे.प्रेमिकांना अपेक्षित प्रतिसादासाठी प्रिय व्यक्तीचे मन वळवावे लागेल.संततीने घेतलेल्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल.मुलांचे समाजात त्यांच्या क्षेत्रात कौतुक होईल.संततीला परदेशप्रवासाच्या संधी येतील.मनाचा निश्चय सोडू नका.नकारात्मक विचार दूर ठेवा. रिअल इस्टेट जमीन जागा खरेदी विक्री करिता फायदे मंद सिद्ध होईल.आरोग्यविषयक समाधानकारक सप्ताह राहील. व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी.अनुकूल काळ आहे.व्यायाम करणे गरजेचे आहे.सहकारातून यश प्राप्ती कर्तृत्वाला वाव देणारा काळ आहे.

शुभदिवसः गुरुवार,शनिवार, रविवार.

कुंभः सप्ताहात आक्रमकपणासाठी ओळखली जाणारी राशी असली तरी आपणास सबुरीचे धोरण हवे. आपली तत्त्वे जपत कार्यरत राहणे हा आपल्या राशीचा स्वभाव आहे.मात्र त्याला थोडी मुरड घालावी लागेल.ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास प्रयत्न याचबरोबर इतरांचे सहकार्य देखील महत्त्वाचे असते.हे पटवून देणारा कालावधी आहे.डोके शांत ठेवून पुढे जावे लागणार आहे.अडचणींना तोंड द्यावे लागेल.कामे लांबणीवर पडतील.परंतु उद्दिष्टपूर्तीचा आनंद मिळणार आहे.नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद टाळा.स्पष्ट बोलण्यावर नियंत्रण ठेवणे तसेच गरजेपेक्षा जास्त न बोलणेंच उत्तम. नोकरीत जबाबदाऱ्या वाढणार आहेत, पण त्या पेलण्याची क्षमताही राहील.हाताखालच्या माणसांकडून काम करून घेताना प्रेमाचे व सबुरीचे घोरण ठेवावे लागणार आहे.जुनी आर्थिक येणी अचानक वसूल होतील घर जमिनीच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून लाभ होतील.शेअर्स छोट्या मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.नवीन वास्तु अथवा स्थावर यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी अजून काही काळ थांबणे गरजेचे आहे.विवाहितांनी जोडीदाराबरोबर बोलता-वागताना टोकाची भूमिका घेणे टाळायला हवे. जोडीदाराला प्रवासाचे योग असले तरी आरोग्याची चिंता मात्र निर्माण होऊ शकते. संततीसौख्यासाठी ग्रहांची अनुकूलता आहे.

शुभदिवसः मंगळवार,बुधवार,रविवार.

मीनः सप्ताहात व्यक्तीमत्व बहरून निघेल.कर्तुत्वाताला वाव देणारा सप्ताह आहे.कष्टाचे फळ मात्र नंतरच्या काही काळातच मिळणार आहे.जोडीदारांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहेत.त्याचे सल्ले निर्णायक ठरतील नोकरीत कनिष्ठ सहकान्यांशी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल अन्यथा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.अपेक्षित आणि इच्छित संकल्प पूर्ण करण्याकरता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे.व्यवसाय वृद्धीची संधी मिळेल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील.आर्थिक तेजीचा सप्ताह आहे.जुनीयेणी वसूल होतील.नोकरी व्यापारात व्यवसायातून अपेक्षित फायदा होणार आहे.संपत्ती स्थावराशी संबंधित अथवा सरकारी कामे ठराविक कालावधीत मार्गी लागतील.घर वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे.वैवाहिक जोडीदाराचा सल्ला त्याचे वर्चस्व मान्य करावे लागेल.यशामुळे तुमचे समाजातील वजन वाढणार आहे.त्यात तुमच्या जोडीदाराचा वाटा महत्त्वाचा असेल.संशोधकांनी काळात घेतलेली मेहनत पुढील काळ फलदायी ठरेल. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल.वाहन चालवितानाया काळात वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

शुभदिवसः सोमवार,गुरुवार,रविवार.

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel
विभाग