सप्ताहात शुक्र राशीपरिवर्तन करीत सिंह राशीत प्रवेश करणार आहे. कामिका एकादशी आणि दर्श अमावस्या, दीपपुजनचा योग आहे. चंद्राचं राशी भ्रमण शुक्र, बुध व स्वताःच्या मालकीच्या राशीतुन मंगळ, राहु, गुरू, शनि या ग्रहांच्या नक्षत्रातुन भ्रमण होत आहे. चंद्राचा मंगळ, गुरू, हर्शलशी योग होत असुन गजकेसरीयोग, लक्ष्मी योग घटीत होत आहे! कसा असेल हा सप्ताह! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!
सप्ताहात मंगळाशी होणारा चंद्रयोग पाहता आर्थिक बाबतीत काम जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना काळ यशाच्या मार्गाकडे नेणारा आहे. प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे. नोकरीत भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी योग राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. नवीन प्रकल्प पुर्णत्वास जातील. कर्तुत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. दिर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल. कामाचा उरक वाढविला पाहिजे. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आर्थिक खर्चात वाढ होईल. आर्थिक नियोजानावर लक्ष द्या.
शुभदिवसः मंगळवार, बुधवार, शुक्रवार.
सप्ताहात चंद्रगोचर पाहता प्रारंभी काहीसी मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला काही नवीन आव्हाने उभा राहू शकतात. तुम्हाला परिवारातून सहकार्य लाभणार नाही. एकटेपणा जाणवेल. हानी होण्याचे योग आहेत. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. चलबिचल वाढेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. मध्यान्न काळानंतर अनुकुल सप्ताह आहे. विशेषत नोकरदारांना नोकरीत नवीन योजनेवर कार्य करावे लागेल. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारांशी सौजन्याने वागावे. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. कलाकारांना मान आणि प्रसिद्धीचे योग आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयमी भुमिकेतुन वाटचाल करावी.
शुभदिवसः गुरुवार, शुक्रवार, रविवार.
सप्ताहातील गजकेसरीयोग पाहता प्रगतीदायक कालावधी राहिल. व्यवसायातील भागीदारीत फायदा होईल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्यांना आपला धंदा वाढवण्या साठी चांगले ग्रहमान आहे. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. बहुमान मिळेल. प्रेमी युगुलांसाठी काळ प्रतिकुल आहे. बोलताना वादविवाद टाळा. काही काळ एकमेकांपासून दूरावण्याची संभावना आहे. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.
शुभदिवसः मंगळवार, बुधवार, शनिवार.
सप्ताहात चंद्र हर्शल योगात समिश्र स्वरूपाचे फले मिळतील. आळशीपणा त्याग करा. बंधुसुख उत्तम मिळेल. डोळ्यांचे विकार संभवतात. ललित वाङमयाची आवड राहील. आपल्याकडे कल्पकता शक्ती उत्तम असते. आपण कामात सातत्य ठेवा. कलाकारांना विशेषत गायन व वादक यांना नविन संधी मिळतील. नातेवाईक व शेजारी वर्गीशी आपले सलोख्याचे संबंध राहतील. प्रवासात प्रियजनांच्या भेटी-गाठी होतील. तरुणतरुणींचे विवाहाचे योग आहेत. सार्वजनिक कामाची हौस निर्माण होईल. व्यापारातील हुशारीमुळे आपली दुसऱ्यांवर सहज छाप पडेल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. मित्रमैत्रिणी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करा. नोकरीत बढती मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग विद्ववत्तेचा लौकीक होईल. संतती सुख उत्तम होईल. गुरूकृपा लाभेल. लेखनकार्य हातून घडेल. समारंभात भाग घ्याल. मोठमोठे व्यवहार जपून करा. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल. व्यवसायात आर्थिक लाभ वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सुखशांती मिळेल. संततीकडून सुख समाधान लाभेल.
शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
सप्ताहात शुक्र आपल्या राशीत प्रवेश करतोय. शुभदायी घटना घडतील. रोजगारात नविन प्रस्ताव आणि संधी येतील. बढतीचे योग आहेत. आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. गुढ विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. बेरोजगारांना नोकरी मिळेल. शत्रुपक्षावर मात कराल. वैद्यकीय व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत.आरोग्य उत्तम राहील. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रवासात लाभ होईल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना हा सप्ताह आर्थिकदृष्या लाभ देणारा आहे. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. अनुकूल वातावरण राहिल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील.
शुभदिवसः मंगळवार, शुक्रवार, शनिवार.
सप्ताहात लक्ष्मीयोगात विद्वत्तेत वाढ होईल. नोकरीत नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. परदेशगमनाचे योग आहेत. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात यश संपादन होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. विद्यार्थी एखादी परकीय भाषा शिकतील. कुंटुबावर व राहत्या घरावर फार प्रेम कराल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेलअध्यात्मिक उन्नती होईल. पितृ मातृ सुख उत्तम मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.
शुभदिवस: बुधवार, गुरुवार, शनिवार.
सप्ताहात शुक्र राशीपरिवर्तनात कर्तृत्वाला उजाळा देणारा सप्ताह असणार आहे. महत्त्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी या बदला बरोबरच सत्ता अधिकार मिळणार आहे आणि आर्थिक फायदा वाढणार आहे. वरिष्ठांशी मतभेद टाळणे गरजेचे राहील. ऑफिसमध्ये सहकारी वर्गात गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. उद्योग करणाऱ्यांसाठी कष्ट वाढणार आहेत. मात्र घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फलितही या प्राप्त होईल. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. नवीन करार अथवा योजना मार्गी लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. आर्थिक आवक वाढणार आहे. जमीन स्थावर यात गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. वरिष्ठांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करता येईल. प्रेमिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. प्रियकराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. लेखकवर्ग संपादन कलाकार यांच्याकडून उत्तम कलेची निर्मिती होईल.
शुभदिवस: बुधवार, शुक्रवार, रविवार.
सप्ताहात मंगळ चंद्र योगात आपल्या ध्येय प्राप्तीकडे वाटचाल करा. अनुकुल सप्ताह आहे. विशेषत: नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. नोकरीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडा कडून सहकार्य लाभेल. व्यापारीवर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. आंनदायक वातावरण राहिल. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. शेअर्स मधील दिर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. धनार्जन उत्तम राहील.
शुभदिवस: मंगळवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात सुरुवातीस अनिष्ट चंद्रभ्रमणात काहीसं कष्टदायक वातावरण राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला काही नवीन आव्हाने उभा राहू शकतात. तुम्हाला परिवारातून सहकार्य लाभणार नाही. एकटेपणा जाणवेल. हानी होण्याचे योग आहेत. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. चलबिचल वाढेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल.आळसीवृत्ती टाळावी. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. मध्यान्न काळानंतर अनुकुल सप्ताह आहे. विशेषत नोकरदारांना नोकरीत नवीन योजनेवर कार्य करावे लागेल. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारांशी सौजन्याने वागावे. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात व्यापारीवर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. कलाकारांना मान आणि प्रसिद्धीचे योग आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. जमिनीच्या व्यवहारात लाभ होतील.
शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
सप्ताहात लक्ष्मीयोग मोठे व्यवहार आणि आर्थिक लाभ होतील. नोकरीत बदली व प्रमोशनचे योग आहे. नवीन ठिकाणी कामाची संधी प्राप्त होईल. मनोवृत्ती आनंदी राहिल. व्यापारात उत्कृष्ठ प्रगती कराल. राजकीय सामाजिक व्यक्तींना मोठी जबाबदारी पदप्रप्ती व मानसन्मान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्साही आणी ऊर्जादायक राहणारआहे. आप्तेष्ट मित्र आणि नातेवाईकांकडून मित्र मैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. कौतुक होईल. शेअर मार्केट मध्ये लाभ होईल. आनंददायी आठवडा आहे. पूर्ण तत्परतेने प्रयत्नशील राहा. यश निश्चित लाभेल. कोर्ट प्रकरणाचे निकाल आपल्या बाजुने लागतील. भांवडापासून बंधुसौख्य उत्तम प्रकारे मिळेल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. उत्कर्षकारक कालावधी राहील.
शुभदिवस: बुधवार, शुक्रवार, शनिवार.
सप्ताहात मंगळ चंद्र योगात आपण आपल्या कार्य क्षेत्रात गुप्त शत्रुवर सहज मात करू शकाल. परंतु परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे. तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील. व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. वडिलोपार्जित अथवा वडिलां बरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. जोडीदारा कडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या. लेखक व कलाकारां कडून उत्तम कलानिर्मिती होईल.
शुभदिवसः सोमवार, बुधवार, शुक्रवार.
सप्ताहात गुरू चंद्र योग पाहता बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना विशेष यश संपादन होईल. प्रतिस्पर्ध्यावर सहज मात करू शकाल. तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील. व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. वडिलो पार्जित अथवा वडिलां बरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनात काळजी घ्यावी. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. जोडीदारा कडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. कलाकारांकडून उत्तम कला निर्मिती होईल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
संबंधित बातम्या