सप्ताहात चंद्रदेव बुध, शुक्र आणि मंगळाच्या राशीतुन संक्रमण करणार आहे. शुक्र, चंद्र, मंगळ, राहु, गुरू या ग्रहांच्या नक्षत्रातुनही चंद्रभ्रमण होत असताना बुध राशी बदल करून शनिच्या राशीत प्रवेश करेल. चंद्र-केतु 'ग्रहणयोग', गुरू-चंद्र 'गजकेसरीयोग' आणि राहु-नेपच्युन-चंद्र नवमपंचम योग याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव राहील, पाहुयात राशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!
सप्ताहात ग्रहणयोगात मानसिक ताणतणाव राहील. वादविवाद वाढतील. प्रकृतीच्या त्रासाकडे अजिबातच दुर्लक्ष करु नये. कुटुंबात कलह, जोडीदारांशी वाद होण्याची शक्यता आहे. जमिन खरेदी विक्री तोट्यात राहील. महिलांनी आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. स्थावर संपत्ती विक्री पासून नुकसान होण्याची संभावना आहे. शेअर्स अधिकची गुंतवणूक सध्या फायदेशीर नाही. कर्ज प्रकरणामुळे त्रास होईल. महिला वर्गाने आपले आरोग्य जपणे गरजेचे आहे. शासकिय सेवेत असणाऱ्यांसाठी काळ प्रतिकुल आहे. दूरचा प्रवास होणार आहे. नोकरदार नोकरी बदलण्याच्या विचारात असतील तर तूर्तास विचार टाळावेत. व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील. संतती पत्नी विषयी काळजी व चिंता वाढेल. नोकरदार वर्गांनी कोणत्याही कामाचे नियोजन पूर्णपणे समजून घेवून हाताळणे योग्य ठरेल. नोकरदारांना नवीन ओळखीतून लाभ होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील दुर्लक्ष कटाक्षाने टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. काळजीपूर्वक व्यवहार करा. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात विशेष काळजी घ्या.
शुभदिवस: शुक्रवार, बुधवार, गुरुवार.
सप्ताहात राहु-चंद्र प्रतियोगात सामाजिक प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे. व्यवसायिकांना भागिदारीत सामंजस्य पणाची भुमिकेतुन वाटचाल करावी लागेल. आरोग्याच्या तक्रारी वाढविणारा आठवडा आहे. कार्यक्रमांमध्ये वस्तूंची जपणूक करणे गरजेचे आहे. मित्र-मैत्रिणीं सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. विद्यार्थ्यांनी आळस न करता उत्साहाने अभ्यास करावा लागणार आहे. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळल्या पाहिजेत. घरातील वातावरण एकंदरीत ताणतणावाचे असल्यामुळे आपली आर्थिक स्थिती चिंतादायक असेल. कर्ज काढताना निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्यापार सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेले कामे काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामातील मध्यस्थांची भुमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होईल. नोकरीत पद आणि जबाबदाऱ्या वाढतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही वाढणार आहेत. नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पष्ट बोलणे टाळावे.
शुभदिवसः मंगळवार, बुधवार, रविवार.
सप्ताहात गजकेसरीयोगात नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. वेगवेगळ्या योजना नवीन कल्पना आखाव्या लागतील. आणि त्या सहकाऱ्यांकडून पूर्ण करून घ्याव्या लागतील. बरोबरचे सहकारी वरिष्ठ या दोघांची उत्तम साथ मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभही वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढणार आहेत. प्रगती करण्यासाठी आव्हाने स्वीकारावीच लागतात हे तत्त्व लक्षात ठेवावे. कमिशनचे व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. व्यवसाया तील फायदा वाढेल. व्यवसायानिमत्त प्रवासाचे योग येतील. व्यवसायातील लाभ तसेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक अथवा जमीन स्थावराच्या व्यवहारातून उत्तम आर्थिक फायदा होईल. दानधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यावर खर्च करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. लेखक वर्गाकडून दर्जेदार लिखाण होईल. स्वप्ने बघितल्या शिवाय ती पूर्ण करण्याची इच्छा होत नाही. नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. परंतु बोलण्यावर संयम ठेवा.
शुभदिवसः सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
सप्ताहात राहु-चंद्र प्रतियुतीत नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. स्थावराच्या देण्या घेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे. आणि नात्यात मैत्रीत वितृष्टता येईल. उच्च शिक्षण अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल. मार्गदर्शक किंवा शिक्षकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. स्वभावात रागीटपणा निर्माण होईल. कुटुंबापासून वेगळे राहण्याचे प्रसंग येतील. व्यापारात अपयश येण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात अडथळे येतील. आहारावर नियंत्रण ठेवा. मध्यान्न काळानंतर समस्येपासून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. आर्थिक आघाडीवर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. आर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्या जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे.
शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शनिवार.
सप्ताह बुध राशीबदल करत असल्याने उत्सहावर्धक आणि प्रगतीकारक असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता आहे. सफलतेचा आनंद मिळणार आहे. हितशत्रू अर्थात गुप्तशत्रू पासुन सावध राहावे. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. घरातील वातावरण बिघडणार नाही. नात्यां मध्ये गैरसमज होणार नाही याची खबरदारी घ्यावी. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लागेल. नोकरीतील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. भागीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. अचानक खर्च वाढतील. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. घर वाहन खरेदीचे योग येतील. विवाहितांनी जोडीदारा बरोबर वादविवाद टाळावेत. टोकाची भूमिका घेऊ नये. व्यसनापासुन सावध रहा. आरोग्याची काळजी घ्यावी. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. प्रवासातुन विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाटत नाही.
शुभदिवसः बुधवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात ग्रहयोग प्रतिकुल असल्याने मेहनत करताना शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ताण घेऊ नका. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. सप्ताहात खर्चावर नियंत्रण कराव लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कलाकारा साठी फायदेशीर ठरणार आहे. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. एकंदरीत हा सप्ताह काहीसा कष्टप्रद असणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ दगदग व मानसिक त्रास वाढवणारा नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. स्वतंत्र व्यावसायिकांची मध्यस्थांच्या मदतीतून मार्गी लागतील. अपेक्षित संकल्प पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या.
शुभदिवसः गुरुवार, शुक्रवार, रविवार.
सप्ताहात शुभ योगात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. उत्तम मित्र मिळतील. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. आपल्या शांतता प्रिय व न्यायी स्वभावामुळे आपला लौकिक वाढेल. तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. वडिलो पार्जित अथवा वडिलां बरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. प्रेमात पुढे जाताना धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा व सन्मान होईल.
शुभदिवसः मंगळवार, शुक्रवार, रविवार.
सप्ताहात ग्रहमान अनुकूल असल्याने कालखंड भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी राहील. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोर्टकचेरीचे काम सहज पार पडतील त्यामध्ये आपणास विरोधकावर मात करता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना काळ यशाच्या मार्गाकडे नेणारा आहे. प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे. नोकरीत भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी योग राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहेत.
शुभदिवसः शुक्रवार, गुरुवार, शनिवार.
सप्ताहात शुभ योगात दिर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळा साठी फायदेशीर ठरणार आहे. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल. कामाचा उरक वाढविला पाहिजे. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आर्थिक खर्चात वाढ होईल. आर्थिक नियोजानावर लक्ष द्या. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग येतील. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करताना वरिष्ठांचा मान सांभाळा. व्यवसायात वृद्धीच्या संधी चालून येतील. पत्नीसोबत जोडीदाराबरोबर वादविवाद टाळावेत. मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. प्रकृती संभाळा. कर्तुत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे.
शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शनिवार.
सप्ताहात चंदभ्रमण अनुकूल लाभल्याने व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. रोजगारात नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. बेरोजगारांना नोकरी मिळेल. शत्रुपक्षावर मात कराल. वैद्यकीय व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना हा सप्ताह आर्थिकदृष्या लाभ देणारा आहे.
शुभदिवसः सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
सप्ताहात चंद्रबलं उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभ प्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. तुमच्या कामाचे गोडकौतुक केले जाईल. विद्यार्थ्यांनी आळसा पासून दूर रहावे. कोर्टकचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. अनुकुल सप्ताह आहे. विशेषत नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. नोकरीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडा कडून सहकार्य लाभेल. व्यापारीवर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. आंनदायक वातावरण राहिल. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
शुभदिवस: गुरुवार, शुक्रवार, रविवार.
सप्ताह ग्रहयोग उत्तम असल्याने नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल. अध्यात्मिक प्रगती होईल. पितृ-मातृ सुख उत्तम मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने काहीसा खर्चिक आठवडा राहिल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कलाकारांना मान सन्मान प्रसिद्धी मिळेल. प्रेमीयुगुलांना आपल्या मनाप्रमाणे प्रेमविवाह करण्या जोगे योग आहेत. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. मित्र मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या मदतीने सहकार्याने नवीन योजनेवर कार्य कराल. लेखक व कलाकारांकडून उत्तम कलानिर्मिती होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. प्रगतीदायक सप्ताह आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. नवीन प्रकल्प पुर्णत्वास जातील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत.
शुभदिवस: बुधवार, गुरूवार, शनिवार.