सप्ताहात कालाष्टमी व गुरुपुष्यामृत योग आणि इंदिरा एकादशी आहे. बुध राशीपरिवर्तन करीत कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. चंद्रमा बुध, रवि आणि स्वताःच्या मालकीच्या राशीतून तर मंगळ, राहु, गुरू, शनि, केतु या ग्रहांच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे.
चंद्राचं राशी भ्रमण पाहता मंगळ या ग्रंहाशी युतीयोग करीत असुन लक्ष्मीयोग घटित होत आहे! कसा असेल सप्ताह! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!
सप्ताहात बुध राशीपरिवर्तनात नव्या योजना तयार कराल. त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त कराल. सरकार दरबारी किंवा सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल आणि आपल्या कामाचा गौरव होईल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे.कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल.
शुभदिवस: बुधवार, गुरुवार, शनिवार.
सप्ताहात ग्रहमान अनुकुल वातावरण निर्माण करतील. आपल्याला जाणवण्याजोगा चांगला बदल घडणार आहे. मन प्रसन्न राहणार आहे. लोकांचे सहकार्य मिळणार आहे. आर्थिक आघाडीवर शुभ घटनांनी मनाला आधार मिळणार आहे. लोकांना खूष करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. आपल्या इच्छापूर्ण होतील. घरात व स्वतःसाठी अचानक खरेदी कराल. पित्यापासून अथवा वडिलधाऱ्या व्यक्तीपासून आर्थिक लाभ होतील. विलासी वस्तूंची खरेदी कराल. संतती सुख उत्तम राहील. विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल. स्थावर इस्टेटीचा उपभोग घ्याल. उधळ्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा अन्यथा कर्जबाजारी व्हाल. व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. हातात कायम पैसा खेळता राहील. कुटुंबात मान मिळेल. समाधानी वृत्तीमुळे समाजात कुठेही अडचण येणार नाही. नातेवाईकांकडून काही बाबतीत त्रास जाणवेल. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा. प्रवासातुन शुभप्रद घटना घडतील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत.
शुभदिवसः शुक्रवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात व्यवसायात बऱ्याच प्रमाणात त्रास भोगावा लागणार आहे. राशीच्या व्ययस्थानातली रवी-मंगळ युती बऱ्याच प्रकाराने त्रासदायक राहील. नव नवीन कल्पनांनी भरलेल्या मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. सुरूवातीला खर्चाचे प्रमाण वाढल्यागत भासेल. आवश्यक गोष्टींपेक्षा अनावश्यक गोष्टींवर खर्च झाल्याने आनंदावर विरजण पडेल. प्रवासात प्रेमात पडणारी एखादी व्यक्ती भेटेल. आपल्याकडे कल्पकता शक्ती उत्तम असते. आपण कामात सातत्य ठेवा. कलाकारांना विशेषत गायन व वादक यांना नविन संधी मिळतील. नातेवाईक व शेजारी वर्गीशी आपले सलोख्याचे संबंध राहतील. प्रवासात प्रियजनांच्या भेटी-गाठी होतील. तरुणतरुणींचे विवाहाचे योग आहेत. सार्वजनिक कामाची हौस निर्माण होईल. व्यापारातील हुशारीमुळे आपली दुसऱ्यांवर सहज छाप पडेल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. मित्रमैत्रिणी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करा. नोकरीत बढती मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. संतती सुख उत्तम होईल. लेखनकार्य हातून घडेल. समारंभात भाग घ्याल. मोठमोठे व्यवहार जपून करा.
शुभदिवसः मंगळवार, बुधवार, शनिवार.
सप्ताहात गुरुपुष्यामृत योगानजीक चंद्रभ्रमण शुभ स्थानातुन होत आहे. नोकरदार नोकरीमध्ये आपणास आराम मिळेल. नव तरुणतरूणींचा विवाह योग उत्तम आहे. व्यवसायिक पार्टनरशीपची मदत आपणास योग्य वेळी मिळणार आहे. वरिष्ठांचे मत आपल्या विषयी अनुकुल असेल. आपले लांबचे प्रवास घडण्याचा योग आहे. कुटुंब सौख्य मनासारखे मिळेल. मात्र संततीच्या आरोग्याची काळजी आपणास जाणवणार आहे. प्रेमी युगुल आपला प्रेम विवाह योग उत्तम आहे. ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. नोकरीत बदलीचे योग आहेत. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ आठवडा आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल.त्या प्रयत्नात सफलतापूर्वक यश मिळेल. आकस्मिक धनलाभ घडेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल.
शुभदिवस: गुरुवार, शुक्रवार, रविवार.
सप्ताहात चंदभ्रमण पाहता लाभदायक गोष्टीत विलंब होईल. संततीबाबत विना कारणच चिंता राहणार आहे. प्रतिष्ठेबाबत जागरूक रहा. हितशत्रूंच्या कारवाया रोखण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहे. या प्रयत्नांना उशिराने फळ मिळेल. संतती थोडी उर्मट बनेल. छोटे मोठे प्रवास घडतील. प्रवासात थोडी दगदगच होईल. पण कामे चांगल्या रितीनेमार्गी लागतील. मनाचे समाधान लाभेल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. व्यापारात कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्च वाढणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. मानसिक दृष्ट्या त्रासाचा सप्ताह आहे. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल.
शुभदिवस: शुक्रवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात बुध राशीबदलात आर्थिक आघाडीवर विविध प्रकारचे लाभ होतील. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. मनात कायम संशयाची पाल चुकचुकत राहील मात्र मित्र व सहकार्यांची मदत मिळेलच. हातात पैसा खेळता राहील. नवीन वस्तुंची खरेदी होईल. हितशत्रू वाढतील. पण त्यांचा बंदोबस्त सुद्धा होईल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मानसन्मान देखील लाभणार आहे. वाहन सौख्य मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. व्यापारात व्यवसियाकांनी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. स्पर्धापरिक्षेत आपण यशस्वी व्हाल. कला लेखकवर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धि योग आहेत. विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे. मित्र मैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. मानसिक अवस्था उत्तम राहील. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल.
शुभदिवस: बुधवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात चंद्रभ्रमणात नव्या कल्पनांच्या मागे धावताना स्वतःच्या आर्थिक आवाक्याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तो जपूनच वापरा अन्यथा वेळेला हाताशी काही राहणार नाही. गरजेपूरता पैसा निश्चित मिळेल. जामिन राहू नका. घरात आरोग्याचे प्रश्न राहणार आहेत. वाहन खरेदीची शक्यता आहे. मात्र जरा दम धरल्यास चांगले आहे. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. गुप्तशत्रु विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नविन समस्या उद्भवतील. मध्यान्न काळानंतर नोकरी व्यवसायात सुद्धा प्रगती होईल. ज्या नोकरीदारांची बढती अडकली होती ती सुटेल. अचानक बढती मिळून येणाऱ्या दिवाळीचा आनंद वाढेल. ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.
शुभदिवसः गुरूवार, शुक्रवार, शनिवार.
सप्ताहात बुधाचं राशीपरिवर्तनात पाहता गेल्या सप्ताहाच्या तुलनेत बऱ्यापैकी चांगला सप्ताह राहणार आहे. वेगळ्या अंदाजाने भाग्याची साथ मिळणार आहे. जोडीदाराचा उत्कर्ष होईल. आणि आनंदही उपभोगाल. मित्रमैत्रिणीं बरोबर आपण वेळ मजेत घालविणार आहात. नोकरदारांसाठी नोकरीत मानसन्मान मिळेल. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे. फसवणूकीची संभावना आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. नातेवाईक मित्रमंडळी यांच्या सह फिरण्याचा योग उत्तम आहे. नोकरी मध्ये वरिष्ठांची मर्जी आपल्यावर विशेष राहील. वारसा अधिकार मिळेल. व्यापाऱ्यांना सुवर्ण काळ आहे. आपण मानसिक समाधान लाभेल. सुशिक्षीत बेरोजगारांना उत्तम नोकरीचा लाभ होईल. आपली सामाजिक पत प्रतिष्ठा वाढणार आहे. आरोग्या बाबतीत विशेष तक्रारी आणि अपघात भय संभवते. काळजी पूर्वक वाहन चालवा. दुरचे प्रवास या सप्ताहात शक्यतो टाळावेत. मानसिक स्वास्थ लाभेल.
शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शनिवार.
सप्ताहात सुरुवातीला मोठे खर्च कराल. या खर्चातून फारसा आनंद मिळणार नाही. आर्थिक दृष्ट्या पंचमातले रवी बुध चांगले यश देतील. मात्र हा काळ फारसा चांगला नाही. कष्टाच्या प्रमाणात पैसा मिळणार नाही. आणि हितशत्रूंचा त्रास बऱ्यापैकी वाढणार आहे. मन शांत ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत रहा. संततीस काळ प्रतिकुल आहे. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. व्यवसायात आपणास अपेक्षीत यश लाभणार नाही. स्थावर मालमत्तेच्या खरेदीतून अपेक्षीत लाभ आपणास मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कष्ट सहन करावे लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करुन जमणार नाही रोजगारात घाईगडबडीत निर्णय घेवू नये. विचाराअंती निर्णय घ्यावे. जमिनी विक्री लांबणीवर ठेवा. विरोधकांचा त्रास जाणवेल. प्रवासात काळजी तर घ्यावीच लागेल. मित्र मंडळी नातेवाईक यांच्याशी व्यवहारात दक्षता घ्यावी लागेल. नोकरीमध्ये पगार पूर्ण मिळण्यास अडचण जाणवेल. पतीपत्नीत वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील गुंतवणूक नुकसानकारक होईल.
शुभदिवसः शुक्रवार, शनिवार, रविवार.
सप्तमात बुधाचं राशीबदल आपल्या पथ्यावर आहे. त्यामुळे एकदम आनंदी उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळीच्या तयारीला लागाल. आपण मुळातच उत्साही असता त्यात ही बदललेली ग्रहस्थिती आपल्याला चांगला हातभार लावणार आहे. नव्या संधी प्राप्त होतील. मनाप्रमाणे काम करता येतील. महत्त्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी या बदलाबरोबरच सत्ता अधिकार मिळणार आहे आणि आर्थिक फायदा वाढणार आहे. वरिष्ठांशी मतभेद टाळणे गरजेचे राहील. सहकारी वर्गात गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. उद्योग करणाऱ्यांसाठी कष्ट वाढणार आहेत. मात्र घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फलितही या प्राप्त होईल. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. नवीन करार अथवा योजना मार्गी लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. आर्थिक आवक वाढणार आहे. जमीन स्थावर यात गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करता येईल. प्रियकराची मर्जी सांभाळावी लागणार आहे.
शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
सप्ताहात योग फारसा चांगला नाही. बऱ्यापैकी त्रासाचा राहणार आहे. थोडी मानसिक चिंता व चंचलता राहणार आहे. प्रवासात बेरंग होण्याची शक्यता आहे. नव्या कल्पना लोकांना पटणार नाहीत. त्यातून नैराश्य येईल. कुटूंबात आरोग्य चिंता राहील. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कलाकारासाठी फायदेशीर ठरणार आहे. या सप्ताहात जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. एकंदरीत हा आठवडा काहीसा कष्टप्रद असणार आहे. भावाबहिणींबाबत तीव्र चिंता वाटेल. त्याचप्रमाणे स्वतःचे धाडसही अंगाशी येऊ शकते. वेडे धाडस या आठवड्यात टाळणेच चांगले आहे. प्रवासही जपूनच करा. किंवा टाळला तर उत्तम राहील. भावा-बहिणींच्या प्रश्नांची समास्याची तीव्रता राहील. पैसा व प्रतिष्ठेसाठी कोणत्याही कामात घाई करू नका.
शुभदिवसः सोमवार, बुधवार, रविवार.
सप्ताहात चंद्रभ्रमण अनुकूल असल्याने संधीच सोनं करता येणं अगदी शक्य आहे. प्रयत्नांची आणि कष्टांची शर्थ करा. यश तुमचेच आहे. प्रत्येक व्यवहारात व कामात यश व पैसा निश्चितच मिळेल. शुक्र शुभ फलदायी ठरेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नफ्यात वाढ होईल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा साप्ताहिक कालखंड आहे. विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शन व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार आहे. संततीने घेतलेल्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल. मुलांचे समाजात त्यांच्या क्षेत्रात कौतुक होईल. संततीला परदेश प्रवासाच्या संधी येतील. मनाचा निश्चय सोडू नका. नकारात्मक विचार दूर ठेवा. रिअल इस्टेट जमीन जागा खरेदी विक्री करिता फायदेशीर ठरेल. आरोग्यविषयक समाधानकारक सप्ताह राहील. व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. आपण ज्या वास्तुच्यासाठी प्रयत्न करत असाल ती वास्तु मिळण्याची शक्यता आहे.
शुभदिवसः मंगळवार, बुधवार, रविवार.