मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Horoscope 23 to 29 January 2023: 'या' राशींसाठी हा आठवडा राहणार लाभदाई; तर 'यांनी' घ्यावी काळजी
 Weekly Horoscope 23 to 29 January 202
Weekly Horoscope 23 to 29 January 202 (HT)

Weekly Horoscope 23 to 29 January 2023: 'या' राशींसाठी हा आठवडा राहणार लाभदाई; तर 'यांनी' घ्यावी काळजी

23 January 2023, 9:48 ISTNinad Vijayrao Deshmukh

Weekly Horoscope 23 to 29 January 2023 : ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना चांगले तर काही राशींसाठी हा आठवडा चांगला किंवा वाईट राहील. काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

मेष: सप्ताहात समिश्र स्वरूपाची फल मिळतील. कुभें तील शनि नेपच्युन युतीत मनोधैर्य सांभाळा. मनस्तापासारख्या घटना घडतील. सप्ताहाच्या सुरुवातीला सावधगिरी बाळगुन वाटचाल करावी. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. व्यवसायिकांचे उद्योगधंद्यात लक्ष कमी होईल. महिला वर्गास प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून जमनार नाही. वाहन प्रवासात काळजी घेणे जरुरीचे आहे. घरातील मतभेद सामोपचाराने मिटविलेले बरे अन्यथा त्रासदायक ठरतील. आर्थिक दृष्ट्या ओढाताणीचा कालावधी आहे. सप्ताहात मध्यानंतर नोकरदारासाठी ग्रहमान साथ देणार आहे. नोकरीत बढ़तीची बातमी मिळेल. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम होईल. भावडांशी संयमाने रहावे नाही तर त्यांच्या पासुन दुरावण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत असणारा वाद मिटून आर्थिक धनलाभ मनाप्रमाणे होईल. सुशिक्षीत तरुणवर्गास नोकरी शोधण्यासाठी फार कष्ट सोसावे लागणार नाही. आपणास इच्छित नोकरी त्वरीत मिळेल. आपल्याला आठवण येत असलेल्या पूर्वीच्या मित्र मैत्रिणींच्या आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आपला समारंभात सहभाग असेन.घरातील वातावरण आनंदी असेल.

ट्रेंडिंग न्यूज

शुभदिवस: सोमवार, गुरुवार, शुक्रवार.

वृषभ: सप्ताहात कर्मस्थानातून सुरू होणार चंद्रभ्रमण आणि कर्मस्थ स्थानातली ग्रहयोगामुळे प्रापर्टी वाहन खरेदीतून फायदा सूचित करत आहे. घरातील वरिष्ठांची काळजी घेणे जरुरीचे आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरुर मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीदायक यश मिळवून देणारा सप्ताह आहे. आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल. कोर्टकचेरीच्या कामांसाठी काळ अनुकूल आहे. प्रेमीयुगुलांसाठी सुवार्ता आपणाला या सप्ताहात मिळणार आहे. आपण विवाहाच्या विचारात असाल तर विवाह खात्रीशीर उत्तम पार पडेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल. नोकरवर्गाने वरिष्ठांशी संयमाने वागावे लागणार आहे. आपली बदली मनाविरुद्ध होण्याची संभावना आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. व्यवसायिकांनी भागीदारी न करणे योग्य आहे. व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झाल्यामुळे आपण चिंतीत असाल. भागिदारी व व्यवसायातले व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल. व्यवहारामध्ये दक्षता घेणे आवश्यक आहे.

शुभदिवसः मंगळवार,बुधवार, रविवार.

मिथुनः सप्ताहात सुरू भाग्यस्थानातून होणाऱ्या योगामुळे आणि दशमस्थ गुरू असल्याने शुभ फळे देणारे आहे. भागीदारीमध्ये त्रासातून फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांचे म्हणणे आपणास टाळता येणार नाही अन्यथा त्यांच्याशी वादविवाद होण्याची संभावना दाट आहे. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. बहुमान मिळेल. प्रेमी युगुलांसाठी काळ प्रतिकुल आहे. बोलताना वादविवाद टाळा. काही काळ एकमेकांपासून दूरावण्याची संभावना आहे.घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. वडिलर्जित प्रॉपर्टीच्या वादासंबंधी योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल.

शुभदिवसः बुधवार, शुक्रवार, रविवार.

कर्क: सप्ताहाच्या सुरुवातीस अष्टमातील भ्रमणातून चंद्र जातोय जमिनीचा व्यवहार जपून करावा लागणार आहे. पैसे मिळण्यास विलंब होईल किंवा व्यवहार अर्धवट होण्याची संभावना आहे. मानसिक स्थिती अस्थिर राहिल. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जोडिदारास या आठवड्यात समजून घेणे गरजेचे आहे. वादविवाद होण्याची सूचना ग्रहस्थिती आहे. तरी काळजी घेणे योग्यच आहे.भागीदारीत व्यवसाय करण्यामुळे आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. हा काळ तारेवरची कसरतीचा आहे. तेव्हा निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्या शिवाय घेवू नये. सप्ताहाच्या मध्यान्नात नोकरीमध्ये वरिष्ठ आपणाला बदलीची संधी देतील. विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. महिला वर्गासाठी ग्रहमान अनुकुल आहे. कलाक्षेत्रात असणाऱ्या महिलांसाठी प्रगतीचे शिखर गाठण्यास काळ अती उत्तम आहे. शेअर्स मधील दिर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांची विद्याभासातात रूची वाढेल.परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शनिवार.

सिंह: सप्ताहात सप्तम स्थानातील शनि, शुक्र, युती व अष्टमातील गुरूमुळे नोकरदारांना नोकरीतील बदल हा विषयघोळ घालेल. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. लाभापासून दूरावले जाल. मित्र मंडळी,नातेवाईक वादविवादाची परिस्थिती ठेवील. घरातील वरिष्ठांची काळजी घेणे जरुरीचे आहे. सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग आहे. त्यांना बहुमान मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहात मध्यानंतर जोडीकडून सहकार्याची संभावना आहे. व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल.कामगारांना प्रमोशनची संधी मिळणार आहे. त्याचा आपण फायदा करुन घ्याल.आर्थिक परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होईल. कोर्टकचेरीचे कामकाजात सुयश लाभेल. प्रेमीयुगुलांनी एकमेकांतील हळवा वाद टाळणे आवश्यक आहे. जमिन खरेदीतून लाभ होईल.बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. व्यसनापासून दूर रहा.शासकीय नोकरदार व्यक्तींना बढती मिळण्याचे योग उत्तम आहेत. पैशाची आवक उत्तम असल्याने आपण समाधानी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहिल.

शुभदिवस: सोमवार, बुधवार, शनिवार.

कन्या: सप्ताहात षष्ठातील ग्रहयोग आणि अष्टमस्थ राहु मुळे अचानक धनलाभाची संधी देईल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले हिताचे ठरेल प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी न जाणे योग्यच होईल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे लागेल. वाहन चालविण्यास ग्रहमान अनिष्ट आहे. आपल्या संशयीवृत्तीवर आवर घाला. नोकरदार आपण जर नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर सध्या तरी तो विचार सोडून द्यावा. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. वादविवादामध्ये सामोपचाराने प्रसंग हाताला. विद्यार्थ्यांना ग्रहमान प्रतिकूल आहेत. पतीपत्नीतील मतभेद वाढविणारे आहे.वरिष्ठांचा सल्ला आपणास बहुमोल ठरेल. अवास्तव खर्च टाळणे जरुरीचे आहे. प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे.

शुभदिवस: गुरुवार, शनिवार, रविवार.

तुला: सप्ताहात षष्ठ, सप्तम, अष्टमातील ग्रहयोगामुळे अतिशय प्रिय असणारा व्यक्ती दुरावणार आहे. नोकरदार नोकरी बदलण्याच्या विचारात असतील तर तूर्तास विचारांना ब्रेक द्या. आपल्याला मध्यस्थ बनून तडजोड करणे अतिशय उत्तम जमते, त्यामुळे वादविवाद करणे आपल्याला फारसे जमणार नाही. संततीस काळ प्रतिकुल आहे. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. व्यवसायात आपणास अपेक्षीत यश लाभणार नाही. प्रॉपर्टी खरेदीतून अपेक्षीत लाभ आपणास मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कष्ट सहन करावे लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करुन जमणार नाही रोजगारात घाईगडबडीत निर्णय घेवू नये. विचाराअंती निर्णय घ्यावे. जमिनी विक्री लांबणीवर ठेवा.विरोधकांचा त्रास जाणवेल. प्रवासात काळजी तर घ्यावीच लागेल. मित्र मंडळी नातेवाईक यांच्याशी व्यवहारात दक्षता घ्यावी लागेल. नोकरीमध्ये पगार पूर्ण मिळण्यास अडचण जाणवेल. पतीपत्नीत वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील गुंतवणूक नुकसानकारक होईल. नोकरदारांना त्यांच्या कामाचा मोबदला अर्धवट मिळण्याची संभावना आहे. व्यवसायिकांना येणी येण्यास खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शनिवार.

वृश्चिकः सप्ताहात चतुर्थातील शनि, शुक्र, नेपच्युन आणि पंचमातील गुरूमुळे पैशासंदर्भातील कामे झटपट होतील. आर्थिक स्थैर्य लाभेल. स्वत:चे घर, वाहन होण्यास काळ अनुकूल आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जमण्यास काळ अनुकूल आहे. संततीविषयी काळ भाग्योदयकारक आहे.मित्रमैत्रिणीं बरोबर आपण वेळ मजेत घालविणार आहात. नोकरदारांसाठी नोकरीत मानसन्मान मिळेल. प्रेमी युगुलांनी प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे. फसवणूकीची संभावना आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. नातेवाईक मित्रमंडळी यांच्या सह फिरण्याचा योग उत्तम आहे. नोकरी मध्ये बॉसची मर्जी आपल्यावर विशेष असेन. वारसा अधिकार मिळेल.व्यापाऱ्यांना सुवर्णकाळ आहे. आपण मानसिक समाधान लाभेल. सुशिक्षीत बेरोजगारांना उत्तम नोकरीचा लाभ होईल. विद्यार्थ्यांना काळ सुवर्णसंधीचा आहे. महिला शासकिय सेवेत असणाऱ्यांसाठी काळ अनुकूल वातावरण आहे.आपली सामाजिक पत प्रतिष्ठा वाढणार आहे. सप्ताहाच्या मध्यान्नात आरोग्याबाबतीत विशेष तक्रारी आणि अपघात भय संभवते.काळजीपूर्वक वाहन चालवा.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

धनु: सप्ताहात पराक्रम स्थानातून होणारे ग्रहयोग आणि चंद्रभ्रमणामुळे आंनदायक वातावरण निर्माण होईल. आपल्या मनोकामना पूर्ण करणारे आहे त्याचबरोबर आर्थिक लाभहीआपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल.उत्कर्ष वाढविणारा काळ आहे. आपण आपल्या बोलण्याघर संयम ठेवला तर बऱ्याच समस्या कमी होतील. विद्यार्थ्यांनी चिडखोरपणा वाढू देवू नये. व्यावसायिकांची येणी वसुल होतील. अतिशय शुभप्रद घटना अनुभवास देणारा सप्ताह आहे. कुटुंबामधून आपणास शुभवार्ता मिळणार आहे.अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास प्रॉपर्टी खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होणार आहे. संतती प्राप्तीचे योग उत्तम आहे. आपल्याला मित्र मैत्रिणींमुळे अनपेक्षीत लाभ होणार आहे. विक्रीच्या व्यवहारामध्ये आपणास अपेक्षीत असणारा फायदा मिळेल.वरिष्ठ आपल्या वर मर्जी ठेवणार आहे. इच्छीत नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही. जोडीदाराशी मतभेद टाळावे.

शुभदिवसः मंगळवार, बुधवार, गुरुवार.

मकरः सप्ताहातील धनस्थानातून होत असलेल्या ग्रहयुतीमुळे सुशिक्षित तरूणांना आपणास इच्छित असणारी नोकरी जरूर मिळणार आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जमण्यात काहीच शंका नाही. विवाह योग उत्तम आहे. प्रेमियुगुलांना आपल्या मनाप्रमाणे प्रेमविवाह करण्याचा योग उत्तम आहे. व्यापारी वर्गाने उधारीचे प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. अन्यथा येणी येताना त्रास संभवतो. मात्र वादविवादाचे प्रसंग टाळा. शेअर्स मधील गुंतवणूकीत इच्छीत फायदा मिळणार आहे. महिला वर्गास काळ अनुकूल आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक आहे. अचानक धनलाभाची संधी मिळेल.वारसा अधिकारातून आपणास उत्तम लाभ मिळणारआहे. एकंदरीत आठवडा मजेशीर, समाधानी जाईल आपला यश संपादन करण्याचा काळ उत्तम आहे. खेळाडूंसाठी यशाचा शिखरं गाठण्यास भाग्याची साथ उत्तम मिळणार आहे. लेखक, वर्गास काळ अनुकुल आहे. आपल्या लिखाणास उत्तम दाद मिळेल. कलाकारांना मान सन्मान, प्रसिद्धी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना वाव देणारा सप्ताह आहे.

शुभदिवसः मंगळवार,बुधवार,शनिवार.

कुंभ: नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहे. कुटुंबातील वातावरण समाधानी, आनंदी असेन. त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती. मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यवसायाच्या प्रस्ताव येतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या इच्छे प्रमाणे मुलगा संतती होईल. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून सन्मान मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आपल्या वडिलार्जित प्रॉपर्टीत असणारा वाद मिटून आर्थिक धनलाभ मनाप्रमाणे होईल. सुशिक्षीत तरुणवर्गास नोकरी शोधण्यासाठी फार कष्ट सोसावे लागणार नाही. आपणास इच्छित नोकरी त्वरीत मिळेल. आपल्याला आठवण येत असलेल्या पूर्वीच्या मित्र मैत्रिणींच्या आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.व्यवसायामध्ये धाडसी पाऊल उचलण्याचा प्रयत्न आपला यशस्वी होणार आहे. प्रॉपर्टी वाहन खरेदी योग उत्तम आहे. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती उल्लेखनिय असेन. घरातील वातावरण आनंदी असेल. कोर्टकचेरीची कामे यश मिळवून सुरळीत पार पडतील. विरोधकांवर विजय मिळविण्यास काळ अनुकूल आहे.

शुभदिवसः सोमवार,मंगळवार,शुक्रवार.

मीनः सप्ताहातील व्ययातील ग्रहयोग व प्रथम स्थानातील गुरू मानसिक स्थिती प्रसन्न ठेवणारे आहे. जबाबदारीने आपण काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना पेपर तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना काळ यशाच्या मार्गाकडे नेणारा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातच लक्ष द्यावे. स्थावराच्या वादात प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे. विवाहइच्छुकांचे विवाह जमण्यास विलंब लागेल. अनिद्रेच्या विकारांकडे क्वचितही दुर्लक्ष करुन चालणार नाही. नोकरीत भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी योग राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल. कामाचा उरक वाढविला पाहिजे. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, रविवार.