सप्ताहातील पहिल्याच दिवशी बुध राशीबदल करणार आहे. रवि-बुधाच्या संयोगात बुद्धादित्य योग होणार आहे. चंद्रमा बुध, रवी आणि मालकीच्या राशीतुन त्याचबरोबर राहु, गुरू, शनि आणि केतुच्या नक्षत्रातून गोचर करणार आहे. सप्ताहात चंद्राचा राहु-नेपच्युनशी नवमपंचम योग तर मंगळ शुक्राशी षडाष्टक योग होत आहे. बुध राशीबदलाचा काय परिणाम होईल! पाहुयात राशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!
सप्ताहात चंद्रभ्रमण उत्तम राहील. अनेक आनंददायी शुभवार्ता मिळणार आहेत. आर्थिक प्रगती राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मानसन्मान देखील लाभणार आहे. वाहन सौख्य मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. व्यापारात व्यवसियाकांनी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. स्पर्धापरिक्षेत आपण यशस्वी व्हाल. कला लेखकवर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धि योग आहेत. विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदवार्ता मिळेल. मानसिक अवस्था उत्तम राहील. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. अन्यथा स्वताःचे नुकसान करून घ्याल. अतिउत्साही व अविचारी घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. आर्थिक आघाडीवर सप्ताह उत्तम राहणार आहे.
शुभदिवस: बुधवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात बुध ग्रहाच्या प्रभावामुळे आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. अत्यंत शुभ आठवडा आहे. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे. विरोधकावर मात कराल.
शुभदिवस: गुरुवार, शुक्रवार, रविवार.
सप्ताहात चंद्र-राहु नवमपंचम योगात आपण आपल्या कार्यक्षेत्रात हितशत्रुवर सहज मात करू शकाल. परंतु परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे. तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील. व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. प्रेमात पुढे जाताना धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या. लेखक व कलाकारा कडून उत्तम कलानिर्मिती होईल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
शुभदिवस: बुधवार, गुरुवार, रविवार.
सप्ताहात चंद्रबल अनिष्ट लाभल्याने काही नवीन समस्या अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी लागणारे धाडस कमी पडते. अवघड काळात नाउमेद न होता मानसिक स्वास्थ्य सांभाळणे महत्वाचे आहे. दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता खोल विचार करून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावेत. बोलण्यावर संयम ठेवा. कारण नसताना तुमची मत देऊ नका. नोकरीत सत्ता अधिकाराची पदे सांभाळतांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. मात्र हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य विघडवणार आहे. व्यावसायात कष्ट दगदग वाढणार आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. व्यवसायासाठी प्रवास होतील. कौटुंबिक खर्च होईल. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कर्ज घेताना विचारपूर्वक कर्ज घ्यावेत. मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील. लेखक वर्गाकडून कलाकारांकडून उत्तम कलेची निर्मिती होईल. वाहने सावकाश चालवा.
शुभदिवसः गुरुवार, शनिवार, रविवार.
सप्ताहात ग्रहयोगात कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेले कामे काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामातील मध्यस्थांची भुमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होईल. नोकरीत पद आणि जबाबदाऱ्या वाढतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही वाढणार आहेत. नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पष्ट बोलणे टाळावे. ठरवलेली कामे मार्गी लागतील. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. स्थावराच्या देण्या-घेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे. नात्यात मैत्रीत वितृष्टता येईल. उच्च शिक्षण अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल. मार्गदर्शक किंवा शिक्षकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.
शुभदिवसः सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
सप्ताहात ग्रहबल उत्तम लाभल्याने ठरलेल्या योजना मार्गी लागतील. धडाडीने निर्णय घेतल्यास महत्वकांक्षा ठेवून परिश्रम केल्यास कार्यक्षेत्राची क्षितीजे विस्तृत झाल्याचे दिसून येईल. नवीन योजना नवीन कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. योजना आखाव्या लागतील. सहकाऱ्यांकडून पूर्ण करून घ्याव्या लागतील. बरोबरचे सहकारी वरिष्ठ या दोघांची उत्तम साथ मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभही वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढणार आहेत. प्रगती करण्यासाठी आव्हाने स्वीकारावी लागतात हे तत्त्व लक्षात ठेवावे. कमिशनचे अथवा ट्रेडिंगचे व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. व्यवसायातील फायदा वाढेल. व्यवसायानिमत्त प्रवासाचे योग येतील. व्यवसायातील लाभ तसेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक अथवा जमीन स्थावराच्या व्यवहारातून उत्तम आर्थिक फायदा होईल. दानधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यावर खर्च करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. लेखकवर्गाकडून दर्जेदार लिखाण होईल. नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल.
शुभदिवसः मंगळवार, बुधवार, शनिवार.
सप्ताहात चंद्राशी होणारा इतर ग्रहयोग पाहता प्रगतीकारक कालावधी असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासाठी ग्रहयोग उत्तम साथ देतील. सफलतेचा आनंद मिळणार आहे. हितशत्रू अर्थात गुप्तशत्रू पासुन सावध राहावे. सुसंवाद विश्वास असेल. तरच आपली माणसे सुख-दुःखात आपल्या बरोबर असतात. त्यामुळे घरातील वातावरण बिघडणार नाही. नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही याची खबरदारी घ्यावी. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीतील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. भागीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. अचानक खर्च वाढतील. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. घर वाहन खरेदीचे योग येतील. जोडीदाराबरोबर वादविवाद टाळावेत. टोकाची भूमिका घेऊ नये. व्यसनापासुन सावध राहा. आरोग्याची काळजी घ्यावी. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत.
शुभदिवस: सोमवार, बुधवार, शनिवार.
सप्ताह चंद्रबल अशुभ स्वरुपाचं फल देणारा आहे. चंद्रबल अनिष्ट असल्या कारणाने उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही विचाराअंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांतचित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. सप्ताहात वारंवार प्रवास करावे लागतील. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. नुकसान होऊ शकते. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहील. उष्णतेचे विकार उद्भवतील. महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. सप्ताहाच्या उत्तरार्ध वाहनापासून अपघात भय संभवते. वाहन सावकाश चालवा. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणावात्मक राहील. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते.
शुभदिवसः बुधवार, शनिवार, रविवार.
सप्ताहाच्या सुरुवातीचे चंद्रभ्रमण आपणास कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्थ्यासोबत तणाव वाढवू शकते. आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती संयम ठेवून हाताळा. अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. गुप्तशत्रु विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नविन समस्या उद्भवतील. सप्ताहाच्या मध्यान्न काळानंतर ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेले योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल.
शुभदिवस: मंगळवार, बुधवार, शनिवार.
सप्ताहात चंद्रभ्रमण शुभफलदायी ठरणार आहे. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्यामुळे बढती मिळेल. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबात वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. सप्ताहाच्या उत्तरार्थ कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये.आर्थिक बाबतीत फसगत होईल. शत्रुत्व निर्माण होईल. लहरी स्वभाव व व्यसनाधिनतेवर आवर घालावा लागेल. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी.
शुभदिवसः बुधवार, शुक्रवार, शनिवार.
सप्ताहात चंद्र-मंगळ योगात शुभ घटना घडणार आहेत. शुभवार्ता ऐकायला मिळतील. वकृत्व कलेत वृद्धी होईल. धार्मिक अध्यात्मिक सौख्य लाभेल. सत्पुरुषांच्या सेवेतून सन्मार्गाने उत्तम धन मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संतती कडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नोकरीत बदलीचे योग आहेत. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ आठवडा आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल त्या प्रयत्नात यश मिळेल. आकस्मिक धनलाभ घडेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
शुभदिवस: गुरुवार, शनिवार, रविवार.
सप्ताह काहीसा समिश्र स्वरुपाची फले देणारा आहे. अनिष्ट चंद्रभ्रमणात भांवडात काही समस्या निर्माण होतील. भावंडात तिव्र चिंता वाढेल. वेडे धाडस टाळा. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. कामात रिस्क घेवू नका. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्च वाढणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. मानसिक दृष्ट्या त्रासाचा सप्ताह आहे. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या. सप्ताहाच्या उत्तरार्थ व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील.
शुभदिवस: सोमवार, गुरुवार, शनिवार.