मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Horoscope: समृद्धी, ऐश्वर्यदायी रविचा कन्या राशीत प्रवेश; कसा असेल नवा आठवडा?

Weekly Horoscope: समृद्धी, ऐश्वर्यदायी रविचा कन्या राशीत प्रवेश; कसा असेल नवा आठवडा?

HT Marathi Desk HT Marathi
Sep 18, 2023 09:29 AM IST

Weekly Horoscope 18 September to 24 September 2023: काही राशींसाठी हा आठवडा लाभदायक आहे तर काही राशींसाठी काळजी घेण्याचा आहे. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणारं आकस्मिक धनलाभ जाणुन घ्या आपल्या राशी नुसार !

Today horoscope
Today horoscope

मेषः सप्ताहात ग्रहयुती पाहता विद्वत्तेत वाढ होईल. देवदर्शनासाठी प्रवास होईल. नोकरीत नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. परदेशगमनाचे योग आहेत. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात यश संपादन होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. विद्यार्थी एखादी परकीय भाषा शिकतील. कुंटुबावर व राहत्या घरावर फार प्रेम कराल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. अध्यात्मिक उन्नती होईल. पितृ मातृ सुख उत्तम मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल.

ट्रेंडिंग न्यूज

शुभदिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार.

वृषभः सप्ताहातील सुरुवातीस दोन दिवस काहीसी काळजी पूर्वक वाटचाल करावी. नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद टाळा. स्पष्ट बोलण्यावर नियंत्रण ठेवणे तसेच गरजेपेक्षा जास्त न बोलणेंच उत्तम. नोकरीत जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आरोग्यविषयक अचानक त्रास संभवतो. चंद्रगोचर शुभ फलदायी ठरेल. नियोजीत ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नफ्यात वाढ होईल. अपेक्षित असणारे निर्णय येतील. परदेशात नोकरीच्या संधी चालून येतील. नवीन स्वतंत्र व्यावसायिकांसाठी खन्या अर्थाने सफलता देणारा काळ ठरेल. व्यापार व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा कालखंड आहे. विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना पत्नीचा जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शक आणि व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार आहे. जुनी आर्थिक येणी अचानक वसूल होतील. शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आपणास लाभ होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या.

शुभदिवस: गुरुवार, शुक्रवार, रविवार.

मिथुनः सप्ताहातील ग्रहसंकेत पाहता व्यापारात भागिदारीमुळे आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. नोकरीत कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. लेखकवर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग दुग्धशर्करा आहे. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही.तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहे. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. सप्ताहाच्या मध्यान्न काळानंतर आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यावसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. तुमच्या कामाचे गोडकौतुक केले जाईल. मनासारख्या घटना घडतील.

शुभदिवस: सोमवार, शुक्रवार, रविवार.

कर्कः सप्ताहातील प्रतिकूल चंद्रभ्रमण पाहता त्रासदायक सप्ताह असणार आहे. आपणास कठोर परिश्रम घ्यावे लागतील. गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करताना भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. वाहनापासून अपघाताची शक्यता राहिल. आरोग्य ठीक राहणार नाही. कायम चिंताग्रस्त राहाल.घरात कलह होतील. त्यामुळे नवनवीन घरात राहण्याचे प्रसंग येतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते.आपल्या व्यवहारात अडचण उपस्थित होतील.नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता वाटते.वडिलांच्या इस्टेटीत लाभ होणार नाही. सार्वजनिक कामात सावधानतेने भाग घ्या. मानहानी होण्याची शक्यता आहे. उधळेपणावर आळा घालावा लागेल. नाहीतर कर्जबाजारी व्हाल. लांब पल्याचे प्रवास टाळा. वाहन जपून आणि सावकाश चालवा. अपघात भय शस्त्रक्रिया भय संभवते.

शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

सिंहः सप्ताहात मानसिक स्वास्थ संभाळणे अत्यंत गरजेचे आहे. नोकरदारांना नोकरीतील बदल त्रासदायक ठरेल. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. लाभापासून दूरावले जाल. मित्र मंडळी नातेवाईक वादविवादाची परिस्थिती ठेवील. घरातील वरिष्ठांची काळजी घेणे जरुरीचे आहे. जोडिदारासोबत वादविवाद टाळा. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले हिताचे ठरेल प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी न जाणे योग्यच ठरेल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्च वाढणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. काळजी घ्या. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या प्रकृतीवर लक्ष द्या. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल काळ नाही.

शुभदिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार.

कन्याः सप्ताहात समिश्र फले लाभतील. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्थ्यांसोबत तणाव वाढवू शकतो. परिस्थिती संयम ठेवून हाताळा अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बाॅसची मर्जी राखावी लागेल. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. शत्रुचा विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी भांडण वादविवाद असे प्रसंग घडतील. वडिलोपार्जित घर संपत्तीमध्ये नविन समस्या देखील उद्‌भवतील. व्यवसायात आर्थिक फसवणुकीची दाट शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रिया कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार लांबणीवर टाका. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका विचारअंतीच निर्णय घ्यावेत. आपण बोलण्यावर संयम ठेवावा अन्यथा समस्या निर्माण होतील. लांबचे प्रवास जपुन करावेत. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. संततीच्या आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्ष द्यावे लागेल. प्रवास कष्टमय नुकसानकारक राहतील.

शुभदिवस: सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

तुला: सप्ताहातील ग्रहस्थिती पाहता मानसिक स्वास्थ उत्तम राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करता येईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. शिक्षण क्षेत्रातील महिलांना अनुकुल प्रगतीचे शिखर गाठता येईल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. मनोबल उंचावेल. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची उत्तम दाद मिळेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लागेल. व्यवसियाकांनी व्यवसायात केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. कोर्ट कचेरीचे प्रसंग तूर्तास टाळावेत. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. नवीन प्रकल्प हाती येतील.त्यामध्ये आपण यशस्वी व्हाल. लेखक वर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धि योग आहेत. विरोधकोवर मात करण्यास काळ उत्तम आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात काळजी घ्या.

शुभदिन: सोमवार, बुधवार, गुरुवार.

वृश्चिकः सप्ताहात सुरुवातीस चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग पाहता प्रगतीदायक आणि शुभ सप्ताह आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. उत्कर्ष वाढविणारा काळ आहे. आपण आपल्या बोलण्याघर संयम ठेवला तर बऱ्याच समस्या कमी होतील. व्यापारात व्यावसायिकांची येणी वसुल होतील. अतिशय शुभप्रद घटना अनुभवास देणारा सप्ताह आहे. कुटुंबामधून आपणास शुभवार्ता मिळणार आहे. अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारात लाभ होतील. आपल्याला मित्र मैत्रिणींमुळे अनपेक्षीत लाभ होणार आहे. विक्रीच्या व्यवहारामध्ये आपणास अपेक्षीत असणारा फायदा मिळेल. वरिष्ठ आपल्या वर मर्जी ठेवणार आहे इच्छीत नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही. घर,वाहन खरेदीस अनुकूल कालावधी आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून आपणास आर्थिक सहकार्य लाभेल.

शुभदिवसः सोमवार, बुधवार, रविवार.

धनुः सप्ताहात सुरुवातीस जबाबदारीने आपण काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना पेपर तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना काळ यशाच्या मार्गाकडे नेणारा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातच लक्ष द्यावे. स्थावराच्या वादात प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. नोकरीत भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी योग राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. नवीन प्रकल्प पुर्णत्वास जातील. कर्तुत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. दिर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल. कामाचा उरक वाढविला पाहिजे. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, रविवार.

मकरः सप्ताहात सुरुवातीस काही कष्टदायक राहील. काहीसी मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला काही नवीन आव्हाने उभा राहू शकतात. तुम्हाला परिवारातून सहकार्य लाभणार नाही. एकटेपणा जाणवेल.हानी होण्याचे योग आहेत. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. चलबिचल वाढेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. मध्यान्न काळानंतर अनुकुल सप्ताह आहे. विशेषत नोकरदारांना नोकरीत नवीन योजनेवर कार्य करावे लागेल. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारांशी सौजन्याने वागावे. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात व्यापारीवर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. कलाकारांना मान आणि प्रसिद्धीचे योग आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. जमिनीच्या व्यवहारात लाभ होतील.

शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शनिवार.

कुंभः सप्ताहात ग्रहयोग पाहता शुभ फळे देणारे आहे. भागीदारीत फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांचे म्हणणे आपणास टाळता येणार नाही अन्यथा त्यांच्याशी वादविवाद होण्याची संभावना दाट आहे. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. बहुमान मिळेल. प्रेमी युगुलांसाठी काळ प्रतिकुल आहे. बोलताना वादविवाद टाळा. काही काळ एकमेकांपासून दूरावण्याची संभावना आहे. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे.

शुभदिवसः सोमवार, गुरुवार, रविवार.

मीनः सप्ताहात मोठे व्यवहार आणि आर्थिक लाभ होतील. नोकरीत बदली व प्रमोशनचे योग आहे. नवीन ठिकाणी कामाची संधी प्राप्त होईल. मनोवृत्ती आनंदी राहिल. व्यापारात उत्कृष्ठ प्रगती कराल. राजकीय सामाजिक व्यक्तींना मोठी जबाबदारी पदप्रप्ती व मानसन्मान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्साही आणी ऊर्जादायक राहणारआहे. आप्तेष्ट मित्र आणि नातेवाईकांकडून मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. कौतुक होईल. शेअर मार्केट मध्ये लाभ होईल. अतिमोह टाळावा. आनंददायी आठवडा आहे. पूर्ण तत्परतेने प्रयत्नशील राहा. यश निश्चित लाभेल. कोर्ट प्रकरणाचे निकाल आपल्या बाजुने लागतील. भांवडापासून बंधुसौख्य उत्तम प्रकारे मिळेल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक व सामाजिक कार्यात प्रगती कराल. उत्कर्षकारक कालावधी राहील.

शुभ दिवस: गुरुवार, शुक्रवार, रविवार.

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel