मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Horoscope : मेष ते मीन राशींसाठी हा सप्ताह किती फायदेशीर ठरेल, वाचा आठवड्याचे राशीभविष्य

Weekly Horoscope : मेष ते मीन राशींसाठी हा सप्ताह किती फायदेशीर ठरेल, वाचा आठवड्याचे राशीभविष्य

Jun 17, 2024 05:00 AM IST

Weekly Horoscope 17 to 23 June 2024 : ग्रह-नक्षत्राच्या बदलात हा सप्ताह तुमच्यासाठी कसा ठरेल, कोणत्या राशीच्या लोकांना नोकरीची संधी मिळेल, जाणून घ्या ग्रह नक्षत्राच्या योग-संयोगात मेष ते मीन सर्व १२ राशींचे आठवड्याचे राशीभविष्य.

साप्ताहिक राशीभविष्य १७ ते २३ जून २०२४
साप्ताहिक राशीभविष्य १७ ते २३ जून २०२४ (Pixabay)

सप्ताहात अस्त बुध उदीत होणार आहे. दक्षिणायन आरंभ होत असुन वटपौर्णिमेचा योग आहे. चंद्रमा शुक्र, मंगळ आणि गुरूच्या राशीतून तर मंगळ, राहु, बुध, शनि, केतु या पाच ग्रहांच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. चंद्रभ्रमणात मंगळ, गुरू, हर्शल, रवि, बुध, शुक्र या सहा ग्रंहाशी प्रतियोग करीत असल्याने बुद्धादित्ययोग, लक्ष्मीयोग, राजयोग, केमद्रुमयोग हे चार मुख्य ग्रहयोग घटीत होत आहे. आपल्या जन्मराशीवर कसा प्रभाव राहील या योगांचा! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!

मेषः 

सप्ताहात केमद्रुमयोगात सुरुवातीस वातावरण ताणतणात्मक राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला काही नवीन आव्हाने उभा राहू शकतात. तुम्हाला परिवारातून सहकार्य लाभणार नाही. एकटेपणा जाणवेल. हानी होण्याचे योग आहेत. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. चलबिचल वाढेल. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. मध्यान्न काळानंतर अनुकुल सप्ताह आहे. विशेषत नोकरदारांना नोकरीत नवीन योजनेवर कार्य करावे लागेल. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारांशी सौजन्याने वागावे. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात व्यापारीवर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना मान आणि प्रसिद्धीचे योग आहे.

शुभदिवस: मंगळवार, गुरुवार, रविवार.

वृषभः 

सप्ताहात राजयोगाचा प्रभाव पाहता कार्यक्षेत्रात गुप्त शत्रुवर सहज मात करू शकाल. परंतु परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे. तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील. व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. वडिलोपार्जित अथवा वडिलां बरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळा साठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या.

शुभदिवस: सोमवार, गुरुवार, रविवार.

मिथुनः 

सप्ताहातील बुद्धादित्य योग आपणास शुभ फळे देणारं आहे. व्यवसायात भागीदारीत फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांचे म्हणणे आपणास टाळता येणार नाही अन्यथा त्यांच्याशी वादविवाद होण्याची संभावना दाट आहे. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमानाबरोबरच प्रसिद्धीही मिळेल.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शनिवार.

कर्कः 

सप्ताहात चार मोठ्या ग्रहांच्या योगात मोठे व्यवहार आणि आर्थिक लाभ होतील. नोकरीत बदली व प्रमोशनचे योग आहे. नवीन ठिकाणी कामाची संधी प्राप्त होईल. मनोवृत्ती आनंदी राहिल. व्यापारात उत्कृष्ठ प्रगती कराल. राजकीय सामाजिक व्यक्तींना मोठी जबाबदारी पदप्रप्ती व मानसन्मान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्साही आणी ऊर्जादायक राहणारआहे. आप्तेष्ट मित्र आणि नातेवाईकांकडून मित्र मैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. कौतुक होईल. शेअर मार्केट मध्ये लाभ होईल. अतिमोह टाळावा. आनंददायी आठवडा आहे. पूर्ण तत्परतेने प्रयत्नशील राहा. यश निश्चित लाभेल. कोर्ट प्रकरणाचे निकाल आपल्या बाजुने लागतील. भांवडापासून बंधुसौख्य उत्तम प्रकारे मिळेल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल.

शुभदिवसः गुरुवार, शनिवार, रविवार.

सिंहः 

सप्ताहात बुधाचा उदय होत असल्याने विद्वत्तेत वाढ होईल. नोकरीत नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. परदेशगमनाचे योग आहेत. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात यश संपादन होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. विद्यार्थी एखादी परकीय भाषा शिकतील. कुंटुबावर व राहत्या घरावर फार प्रेम कराल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेलअध्यात्मिक उन्नती होईल. पितृ मातृ सुख उत्तम मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल.

शुभदिवसः गुरुवार, शनिवार, रविवार.

कन्याः 

सप्ताहात वटपोर्मिमेनजीक बुद्धादित्य योगाची अनुकूलता आहे. कर्तृत्वाला उजाळा देणारा सप्ताह असणार आहे. महत्त्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी या बदलाबरोबरच सत्ता अधिकार मिळणार आहे आणि आर्थिक फायदा वाढणार आहे. वरिष्ठांशी मतभेद टाळणे गरजेचे राहील. ऑफिसमध्ये सहकारी वर्गात गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. उद्योग करणाऱ्यांसाठी कष्ट वाढणार आहेत. मात्र घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फलितही या प्राप्त होईल. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. नवीन करार अथवा योजना मार्गी लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. आर्थिक आवक वाढणार आहे. जमीन स्थावर यात गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. वरिष्ठांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करता येईल. प्रेमिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. प्रियकराची मर्जी सांभाळावी लागणार आहे.

शुभदिवसः बुधवार, शनिवार, रविवार.

तूळ: 

सप्ताहात चंद्रभ्रमण अनिष्ट परिणाम कारक असल्याने प्रकृतीची विशेष काळजी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. तसेच या सप्ताहात खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात क्षेत्र आणि कला क्षेत्राशी संबंधीत असणाऱ्यांना ग्रहांची अनुकूलता आहे. लेखकवर्ग संपादन कलाकार यांच्याकडून उत्तम कलेची निर्मिती होईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कलाकारासाठी फायदेशीर ठरणार आहे. या सप्ताहात जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. स्वतंत्र व्यावसायिकांची मध्यस्थांच्या मदतीतून मार्गी लागतील.

शुभदिवसः बुधवार, शनिवार, रविवार.

वृश्चिकः 

सप्ताहात लक्ष्मीयोगात अपेक्षित असणारे निर्णय येतील. परदेशात नोकरीच्या संधी चालून वरिष्ठांबरोबर वादविवाद टाळणे गरजेचे राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना सफलता देणारा सप्ताह ठरेल. मंगळ शुभ फलदायी ठरेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नफ्यात वाढ होईल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा साप्ताहिक कालखंड आहे. विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शन व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार आहे. संततीने घेतलेल्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल. मुलांचे समाजात त्यांच्या क्षेत्रात कौतुक होईल. संततीला परदेश प्रवासाच्या संधी येतील. मनाचा निश्चय सोडू नका. नकारात्मक विचार दूर ठेवा. रिअल इस्टेट जमीन जागा खरेदी विक्री करिता फायदेशीर ठरेल. आरोग्यविषयक समाधानकारक सप्ताह राहील.

शुभदिवस: शुक्रवार, शनिवार, रविवार.

धनुः 

सप्ताहात गजकेसरीयोगात चंद्रगोचर मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे.कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे.

शुभदिवसः गुरुवार, शनिवार, रविवार.

मकरः 

सप्ताहात शनिच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात अनुकुल वातावरण निर्माण करतील. विद्यार्थ्यांचे लक्ष विद्याभ्यासात राहील. पित्यापासून अथवा वडिलधाऱ्या व्यक्तीपासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. संतती सुख उत्तम राहील. विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल. स्थावर इस्टेटीचा उपभोग घ्याल. उधळ्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा अन्यथा कर्जबाजारी व्हाल. व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. हातात कायम पैसा खेळता राहील. कुटुंबात मान मिळेल. समाधानी वृत्तीमुळे समाजात कुठेही अडचण येणार नाही. नातेवाईकांकडून काही बाबतीत त्रास जाणवेल. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा. आई वडिलांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासातुन शुभप्रद घटना घडतील.

शुभदिवसः मंगळवार, बुधवार, रविवार.

कुंभः 

सप्ताहात पौर्णिमेनजिक चंद्रबलं क्षीण असल्यामुळे रोजगारात समिश्र स्वरुपाची फलप्राप्ती होईल. आळशीपणाचा त्याग करा. बंधुसुख उत्तम मिळेल. आरोग्याबाबतीत काही तक्रारी उद्भभवतील. डोळ्यांचे विकार संभवतात. ललित वाङमयाची आवड राहील. आपल्याकडे कल्पकता शक्ती उत्तम असते. आपण कामात सातत्य ठेवा. कलाकारांना विशेषत गायन व वादक यांना नविन संधी मिळतील. नातेवाईक व शेजारी वर्गीशी आपले सलोख्याचे संबंध राहतील. प्रवासात प्रियजनांच्या भेटी-गाठी होतील. तरुणतरुणींचे विवाहाचे योग आहेत. सार्वजनिक कामाची हौस निर्माण होईल. आपण शूर व पराक्रमी आहात. व्यापारातील हुशारीमुळे आपली दुसऱ्यांवर सहज छाप पडेल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. मित्रमैत्रिणी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करा. नोकरीत बढती मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग विद्ववत्तेचा लौकीक होईल. संतती सुख उत्तम होईल. गुरूकृपा लाभेल. लेखनकार्य हातून घडेल.

शुभदिवसः सोमवार, बुधवार, शनिवार.

मीनः 

सप्ताहात गजकेसरीयोगात नविन संधी प्रस्ताव येतील. बढतीचे योग आहेत. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. सहकारी संस्था यात काम करण्याची संधी मिळेल. शत्रुपक्षावर मात कराल. वैद्यकीय व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत.आरोग्य उत्तम राहील. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रवासात लाभ होईल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना हा सप्ताह आर्थिकदृष्या लाभ देणारा आहे. संपूर्ण सप्ताह अनुकूल वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.

शुभदिवसः बुधवार, गुरुवार, रविवार.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

 

WhatsApp channel