Weekly Horoscope : महालयारंभ आणि ग्रहणयोगात हा आठवडा कसा जाईल! वाचा साप्ताहिक राशीभविष्य-weekly horoscope 16 to 22 september 2024 in marathi saptahik rashi bhavishya ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Horoscope : महालयारंभ आणि ग्रहणयोगात हा आठवडा कसा जाईल! वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope : महालयारंभ आणि ग्रहणयोगात हा आठवडा कसा जाईल! वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Sep 15, 2024 10:27 PM IST

Weekly Horoscope 16 to 22 september 2024 : सप्टेंबरचा या सप्ताहात पितृपक्ष सुरू होईल. तसेच, ग्रह-नक्षत्राच्या योग-संयोग कोणत्या राशींना शुभ लाभ देईल. सप्टेंबर महिन्याचा हा सप्ताह तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य.

साप्ताहिक राशीभविष्य १६ ते २२ सप्टेंबर २०२४, आठवड्याचे राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्य १६ ते २२ सप्टेंबर २०२४, आठवड्याचे राशीभविष्य

सप्ताहात प्रोष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ती आणि महालयारंभ अर्थात पितृपक्ष सुरू होत आहे. चतुर्थी आणि दुर्गाष्टमी आहे. रवि आणि शुक्र राशीपरिवर्तन करीत अनुक्रमे कन्या व तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. 

चंद्रमा शनि, गुरू आणि मंगळाच्या राशीतून तर मंगळ, राहु, शनि, केतु आणि शुक्र या ग्रहांच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. चंद्राचं राशी गोचर पाहता शनि, राहु, नेपच्युन या ग्रंहाशी युतीयोग करीत आहे. विषयोग आणि ग्रहणयोग घटित होत आहे! कसा असेल सप्ताह! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!

मेषः 

सप्ताहातील शुक्राचं राशीपरिवर्तन पाहता उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. संतती सुख उत्तम राहील. विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल. स्थावर इस्टेटीचा उपभोग घ्याल. उधळ्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा अन्यथा कर्जबाजारी व्हाल. व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. हातात कायम पैसा खेळता राहील. कुटुंबात मान मिळेल. समाधानी वृत्तीमुळे समाजात कुठेही अडचण येणार नाही. नातेवाईकांकडून काही बाबतीत त्रास जाणवेल. आई वडिलांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या प्रकृतीची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आनंददायी वातावरण असणार आहे.

शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शनिवार.

वृषभः 

सप्ताहात रवि राशीपरिवर्तनात बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना विशेष यश संपादन होईल. प्रतिस्पर्ध्यावर सहज मात करू शकाल. परंतु परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे. तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील. व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. वडिलोपार्जित अथवा वडिलां बरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनात काळजी घ्यावी. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील.जोडीदारा कडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शनिवार.

मिथुनः 

सप्ताहात शुक्र बदलामुळे कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक अशांती असल्याने काही अंशी त्रास जाणवेल. डोळ्यांचे विकार संभवतात. ललित वाङमयाची आवड राहील. आपल्याकडे कल्पकता शक्ती उत्तम असते. आपण कामात सातत्य ठेवा. कलाकारांना विशेषत गायन व वादक यांना नविन संधी मिळतील. नातेवाईक व शेजारी वर्गीशी आपले सलोख्याचे संबंध राहतील. प्रवासात प्रियजनांच्या भेटी-गाठी होतील. तरुणतरुणींचे विवाहाचे योग आहेत. सार्वजनिक कामाची हौस निर्माण होईल. व्यापारातील हुशारीमुळे आपली दुसऱ्यांवर सहज छाप पडेल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. मित्रमैत्रिणी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करा. नोकरीत बढती मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग विद्ववत्तेचा लौकीक होईल. संतती सुख उत्तम होईल. गुरूकृपा लाभेल. लेखनकार्य हातून घडेल. समारंभात भाग घ्याल. मोठमोठे व्यवहार जपून करा. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल. व्यवसायात आर्थिक लाभ वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होईल.

शुभदिवस: सोमवार, बुधवार, शनिवार.

कर्कः 

सप्ताहात शुक्राचं राशीबदल पाहता व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. नोकरीत कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. लेखक वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग दुग्धशर्करा आहे. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहयोग आहेत. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. सप्ताहाच्या मध्यान्न काळानंतर आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. मनासारख्या घटना घडतील. मनइच्छित अपेक्षित यश लाभेल.

शुभदिवसः मंगळवार, बुधवार, शनिवार.

सिंहः 

सप्ताहात रवि राशीपरिवर्तन आणि प्रभाव पाहता आपणास विशेष संधी उपलब्ध होतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम सप्ताह राहील. दिर्घकालीन गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच गुंतवणुक करा.आहे. संततीच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. अनुकुल सप्ताह आहे. विशेषत: नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. नोकरीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारीवर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. आंनदायक वातावरण राहिल. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शुभदिवसः मंगळवार, शनिवार, रविवार.

कन्याः 

सप्ताहात शुक्र राशीपरिवर्तन करत असल्याने प्रगतीदायक कालावधी राहिल. व्यवसायात भागीदारीत फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांचे म्हणणे आपणास टाळता येणार नाही. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. बहुमान मिळेल. प्रेमी युगुलांसाठी काळ प्रतिकुल आहे. बोलताना वादविवाद टाळा. काही काळ एकमेकांपासून दूरावण्याची संभावना आहे. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.

शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

तूळ: 

सप्ताहात रवि शुक्र राशीपरिवर्तनात शुभदायी घटना घडतील. रोजगारात नविन प्रस्ताव आणि संधी येतील. बढतीचे योग आहेत. आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. गुढ विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. बेरोजगारांना नोकरी मिळेल. शत्रुपक्षावर मात कराल. वैद्यकीय व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत.आरोग्य उत्तम राहील. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना हा सप्ताह आर्थिकदृष्या लाभ देणारा आहे. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. अनुकूल वातावरण राहिल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील.

शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

वृश्चिकः 

सप्ताहातील विषयोग पाहता मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना काळ यशाच्या मार्गाकडे नेणारा आहे. प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे. नोकरीत भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी योग राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. नवीन प्रकल्प पुर्णत्वास जातील. कर्तुत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. दिर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल. कामाचा उरक वाढविला पाहिजे. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आर्थिक खर्चात वाढ होईल.

शुभदिवसः सोमवार, गुरुवार, शनिवार.

धनुः 

सप्ताहात ग्रहयोगाचा प्रभाव असल्याने प्रारंभी काहीसी मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला काही नवीन आव्हाने उभा राहू शकतात. तुम्हाला परिवारातून सहकार्य लाभणार नाही. एकटेपणा जाणवेल. हानी होण्याचे योग आहेत. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. मध्यान्न काळा नंतर अनुकुल सप्ताह आहे. विशेषत नोकरदारांना नोकरीत नवीन योजनेवर कार्य करावे लागेल. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारांशी सौजन्याने वागावे. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. कलाकारांना मान आणि प्रसिद्धीचे योग आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा.

शुभदिवसः शुक्रवार, शनिवार, रविवार.

मकरः 

सप्ताहात शुक्र ग्रहाच्या राशीबदलात दिर्घकालीन रखडलेले मोठे आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. नोकरीत बदली व प्रमोशनचे योग आहे. नवीन कामाची संधी प्राप्त होईल. मनोवृत्ती आनंदी राहिल. व्यापारात उत्कृष्ठ प्रगती कराल. राजकीय सामाजिक व्यक्तींना मोठी जबाबदारी पदप्रप्ती व मानसन्मान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्साही आणी ऊर्जादायक राहणारआहे. आप्तेष्ट नातेवाईकांकडून मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. कौतुक होईल. शेअर मार्केट मध्ये लाभ होईल. अतिमोह टाळावा. आनंददायी सप्ताह आहे. पूर्ण तत्परतेने प्रयत्नशील राहा. यश निश्चित लाभेल. भांवडापासून बंधुसौख्य उत्तम प्रकारे मिळेल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक व सामाजिक कार्यात प्रगती कराल.

शुभ दिवस: बुधवार, गुरुवार, शनिवार.

कुंभः 

सप्ताहात नोकरीत नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. मित्र आणि भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास आर्थिक लाभ होईल. परदेशगमनाचे योग आहेत. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात यश संपादन होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. विद्यार्थी एखादी परकीय भाषा शिकतील. कुंटुबावर व राहत्या घरावर फार प्रेम कराल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. व्यापारात उन्नती होईल. पितृ मातृ सुख उत्तम मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. मानसिक आरोग्य उत्तम राहील.

शुभदिवस: गुरुवार, शुक्रवार, शनिवार.

मीनः 

सप्ताहातील ग्रहणयोगात सुरुवातीस थोडासा त्रास जाणवेल. नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद टाळावेत. स्पष्ट बोलण्यावर नियंत्रण ठेवणे तसेच गरजेपेक्षा जास्त न बोलणेंच उत्तम राहील. नोकरीत जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आरोग्यविषयक अचानक त्रास संभवतो. मध्यान्न काळानंतर ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नफ्यात वाढ होईल. अपेक्षित असणारे निर्णय येतील. परदेशात नोकरीच्या संधी चालून येतील. नवीन स्वतंत्र व्यावसायिकांसाठी सफलता देणारा काळ ठरेल. व्यापार व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा कालखंड आहे. विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना पत्नीचा जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शक आणि व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार आहे. जुनी आर्थिक येणी अचानक वसूल होतील. शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून आपणास लाभ होईल. आकस्मिक धनलाभ घडतील.

शुभदिवस: मंगळवार, बुधवार, रविवार.

Whats_app_banner