Weekly Horoscope: कसा जाईल नव्या वर्षाचा पहिला आठवडा? वाचा राशीभविष्य !-weekly horoscope 1 to 7 january 2024 athvdyache rashi bhavishya ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Horoscope: कसा जाईल नव्या वर्षाचा पहिला आठवडा? वाचा राशीभविष्य !

Weekly Horoscope: कसा जाईल नव्या वर्षाचा पहिला आठवडा? वाचा राशीभविष्य !

Jan 02, 2024 12:50 PM IST

Weekly Horoscope 1 to 7 january 2024: ग्रह-नक्षत्राच्या बदलाच्या स्थितीत नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा कसा राहील, जाणून घ्या मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य.

Weekly Horoscope 1 to 7 January 2024
Weekly Horoscope 1 to 7 January 2024 (Freepik)

नववर्षाचा पहिल्याच सप्ताहात वक्री बुध मार्गी होत आहे. कालाष्टमी आणि सफला एकादशी आहे. चंद्र रवि बुध आणि शुक्राच्या राशीतुन गोचर करणार आहेत. चंद्र-केतु ग्रहण योग आणि गुरू-चंद्र शुभ नवमपंचम योगाचा आपल्या दिनचर्येवर कसा प्रभाव राहील! २०२४ चा पहिला सप्ताह कसा जाईल! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!

मेष: 

आपला आत्मविश्वास द्विगुणित करणारा सप्ताह आहे. नोकरीमध्ये बदल करायचा आहे किंवा उद्योगासंबंधित काही महत्वाचा निर्णय घ्यायचा तर ही वेळ एक खूप शुभ वेळ सिद्ध होऊ शकते. अश्यात घाईगर्दी न करता प्रत्येक निर्णयाला घेऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. सप्ताह उत्सहावर्धक आहे. आळसीवृत्ती टाळावी. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. अनुकुल सप्ताह आहे. विशेषत: नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. नोकरीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सम्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. आंनदायक वातावरण राहिल. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहेत. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता राहिल.

शुभ दिवस: गुरुवार, शनिवार, रविवार.

वृषभ: 

सप्ताह समिश्र स्वरूपाचे फले देणारा राहील. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल. विद्यार्थ्यासाठी थोड़े सावधान राहावे लागेल. या काळात तुमचे मन भ्रमित होऊ शकते. सुरुवातीच्या कालखंडात चिंतीत वातावरण नातेवाईका बद्दल गंभीर आजार दुखापत अश्या स्वरूपा तील बाबी घडण्याची शक्यता वाटते. आरोग्याच्या दृष्टीने काहीसा खर्चिक आठवडा राहिल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत: आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. सप्ताहाच्या मध्य काळानंतर सप्ताह मात्र शुभ फलदायी ठरणार आहे. मनासारख्या घटना घडायला सुरुवात होईल. तरुणतरुणीमध्ये विवाहयोग जुळतील. आपल्या लेखण शैलीत उत्तम प्रतिसाद मिळेल. कलाकारांना मान सन्मान प्रसिद्ध मिळेल. प्रेमी-युगुलांना आपल्या मना प्रमाणे प्रेमविवाह करण्याजोगे योग आहेत. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. मित्र मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या सहकार्याने नवीन योजनेवर कार्य कराल. व्यापारवर्गास अचानक धनलाभाची संधी मिळेल. दुरवरचे प्रवास हितकारक आणि आर्थिकदृष्टया लाभदायक घडतील.

शुभ दिवस: सोमवार, बुधवार, गुरुवार.

मिथुन: 

सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याच्या दृष्टीकोना तुन तापदायक जाणार आहे. नोकरीत भरपूर काम कराल. पण स्वतः च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल. एकटेपणा खूप त्रास देतो आणि हेच काही विद्यार्थ्यांना अनुभव होऊ शकतो खासकरून जे विद्यार्थी घरापासून दूर राहून शिक्षण घेत आहेत. एकटे राहू नका मित्रांसोबत वेळ घालवा. मानसिक ताणतणाव राहिल. वादविवाद वाढतील. प्रकृतीच्या त्रासाकडे अजिबातच दुर्लक्ष करु नये. कुटुंबात कलह जोडीदारांशी वाद होण्याची शक्यता आहे.जमिन खरेदी विक्री तोट्यात राहील. महिलांनी आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील. संतती पत्नी विषयी काळजी व चिंता वाढेल. आठवडयाच्या मध्य कालखंडानंतर व्यवसायिकांना आपल्या योजना प्रत्यक्ष व्यवसायात उतरवता येतील. नोकरदार वर्गांनी कोणत्याही कामाचे नियोजन पूर्णपणे समजून घेवून हाताळणे योग्य ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवा रचनात्मक आणि सक्रिय विचारां मुळे काहीही शिकू शकतात. आर्थिक तंगीतून बाहेर निघण्यात यशस्वी व्हाल. मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. नोकरदारांना नवीन ओळखीतून लाभ होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील दुर्लक्ष कटाक्षाने टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. काळजी पूर्वक व्यवहार करा. विचाराअंतीच निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत फसवणुक होण्याची शक्यता आहे.

शुभ दिवस: बुधवार, शुक्रवार, शनिवार.

कर्कः 

सप्ताहात वित्तीय देवाण घेवाण करतांना सावधान रहा. निजी जीवनात घेतलेल्या काही मोठ्या निर्णयात कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यां कडून पूर्ण प्रशंसा आणि सहयोग मिळेल. केलेली यात्रा खूप लाभ देईल. मेहनत करताना शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ताण घेऊ नका. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. या सप्ताहात खर्चावर नियंत्रण करावे लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कलाकारासाठी फायदेशीर ठरणार आहे. या सप्ताहात जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. नोकरदारांसाठी हा काळ दगदग व मानसिक त्रास वाढवणारा. नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. स्वतंत्र व्यावसायिकांची मध्यस्थांच्या मदतीतून मार्गी लागतील. ठरवलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक राहील. प्रवास लाभदायक आणि आंनदायक होतील.

शुभ दिवसः बुधवार, शनिवार, रविवार.

सिंह: 

सप्ताहाच्या सुरुवातीचा काळ उत्साहवर्धक आशादायी आहे. परंतु रविभ्रमण हे अनिष्ट असल्यामुळे समिश्र स्वरूपाची फलं मिळतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही म्हणजे, या काळात कमी मेहनतीनंतर ही सामान्यापेक्षा अधिक उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात काही अप्रिय अशुभ घटना घडू शकतात. वादविवाद टाळा. शांतपणे परिस्थिती हाताळा. व्यवहारात सावधगिरी बाळगा. कर्जाचे पैसे परत मिळण्यात अडचण येईल. मित्रमैत्रिण नातेवाईक यांच्याशी वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदारात पत्नीशी गैरसमजामुळे भांडणतंटे निर्माण होतील.भावंडांशी संयमाने राहावे लागणार आहे भावंडात दुरावा निर्माण होईल. गुप्तशत्रु विरोधक प्रतिस्पर्धी यांच्या पासुन दुरचं राहा. त्यांच्याकडून त्रास निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण इच्छित असलेल्या कामात अडचणी येतील. अधूनमधून आरोग्याच्या समस्येवर आर्थिक खर्च वाढेल. नातेवाईकांसोबत वाद नोकरीत बदल अश्या समस्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वाहन सावधानतेने चालवा. अपघाताच भय राहील. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत.

शुभ दिवस: गुरुवार, शुक्रवार, शनिवार.

कन्या: 

सप्ताह अशुभ स्वरुपाचं फल देणारा आहे. आत्मविश्वासाची कमतरता वाटेल त्यामुळे परिस्थितीवर पकड ठेवण्याचा प्रयत्न कराल. स्वतःवर विश्वास ठेवा. आरोग्याप्रति जागरूक रहा. खर्चावर लगाम लावून एक जबाबदार व्यक्तीसारखे वागा. गरजेपेक्षा जास्त विचार न करता विपरीत परिस्थिती मधून बाहेर येण्याची वाटपाहण्याची आवश्यकता राहील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यानी मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही विचाराअंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. या सप्ताहात वारंवार प्रवास करावे लागतील. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. हानी होऊ शकते. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहिल. उष्णतेचे विकार उद्‌भवतील. महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. सप्ताहाच्या उत्तरार्ध वाहनापासून अपघात भय संभवते. वाहन सावकाश चालवा. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांची आरोग्यविषयक समस्या अचानक निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण राहणार नाही.

शुभ दिवस: बुधवार, शुक्रवार, रविवार.

तूळ: 

सप्ताह काहीसा समिश्र स्वरुपाची फले देणारा आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर योग्य दिशेमध्ये आपले प्रयत्न करण्यात ही यशस्वी राहील. कुटुंबातील सदस्यांशी चुकीचा व्यवहार करू नका. करिअरमध्ये मनासारखे फळ मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे. रचनात्मक क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता आहे. केंद्रातील ग्रहयोग पाहता भांवडात काही प्रॉब्लेम निर्माण होतील. भावबहिणीत तिव्र चिंता वाढेल. वेडे धाडस टाळा. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. कामात रिस्क घेवू नका. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्च वाढणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. मानसिकदृष्ट्या त्रासाचा सप्ताह आहे. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. काळजी घ्या. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. मनस्वास्थ सांभाळा. सकारात्मक विचार आणि दृष्टीकोनातून वाटचाल करावी.

शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार.

वृश्चिक: 

सप्ताह शुभफलदायी ठरणार आहे. कमाई मध्येही वाढ होण्याचे योग बनतील. घरामध्ये आनंददायी घटनेची चाहूल लागेल. वेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल. उच्च शिक्षणासाठी ही वेळ विशेष उत्तम राहील कारण तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. उत्तम असल्याने ग्रहसंकेत बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्यामुळे बढती मिळेल. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्या कडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. सप्ताहाच्या उत्तरार्थ कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. फसगत होईल. शत्रुत्व निर्माण होईल. लहरी स्वभाव व व्यसनाधिनता यावर आवर घालावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्या बाबतीत खर्चात वाढ होईल. आकस्मिक आर्थिक हानीची शक्यता आहे.

शुभ दिवस: बुधवार, गुरुवार, रविवार.

धनु: 

सप्ताहातील ग्रहमान अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. लक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करत रहा आर्थिक परिस्थिती सुधारेल. परंतु खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल प्रयत्न आणि विचारांना भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल. आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम गती मिळण्याची शक्यता आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा करा. नशीबाची साथ लाभेल. उत्तम ग्रहमान आहेत. नोकरीतील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. नोकरीत अधिकार, सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. पतीपत्नीतील स्नेह वाढेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळा साठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. लेखक व कलाकारांकडून उत्तम कला निर्मिती होईल. प्रसिद्धीचे योग येतील.

शुभ दिवसः गुरुवार, शुक्रवार, रविवार.

मकर: 

सप्ताहात आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. वाहने मात्र सावकाश चालवा. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजी पणाने वागु नका. नोकरीत बदल नवीन संधी मिळतील. जोडीदारांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याचे सल्ले निर्णायक ठरतील. नोकरीत कनिष्ठ सहकाऱ्यांशी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. अन्यथा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संकल्प पूर्ण करण्याकरिता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. आर्थिक तेजीचा सप्ताह आहे. यशामुळे तुमचे समाजातील वजन वाढणार आहे. बंधुप्रेम मिळणार आहे. विद्यार्थीवर्गाचे विद्याभ्यासात लक्ष लागेल. आपला स्वभाव फार उदार राहील. संततीचे सुख लाभेल. नविन वस्तु घेण्याचे योग आहेत. मातृसुख उत्तम मिळेल. राजकारणात जनतेकडुन मान मिळेल. स्थावर इस्टेटीचा लाभ होईल. आपल्या चैनी स्वभावावर आळा घालावा लागेल. कलाकारांना हा सप्ताह चांगला जाईल. त्यांच्या कालागुणांना वाव मिळेल. मानसन्मान आणी पुरस्कार मिळतील. नवीन प्रकल्प पुर्णत्वास जातील.

शुभ दिवसः मंगळवार, बुधवार, शनिवार.

कुंभः 

सप्ताहाच्या सुरुवातीच्या कालखंडात नोकरीत युक्तीने कामात चालढकल कराल. निष्काळजी पणा हानी देऊ शकतो सावध राहा आणि देवाण घेवाणीच्या वेळी कागदपत्र लक्षपूर्वक वाचा. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या मंडळींचा आत्मविश्वास वाढेल. अचानक कुणी दूरच्या नातेवाईकांकडून काही आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला आनंद देईल. आपणास काही नवीन समस्यांना तोंड द्यावे लागेल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नीसोबत मधुर संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या विषयी गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्रेम प्रकरणात वादविवादाचे प्रकार घडतील. भागीदारीतील आर्थिक व्यवहार देवाण-घेवाण अडचणीत आणणार आहेत. व्यवसायिकांना कर्ज प्रकरण त्रासदायक ठरण्याची संभावना आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी स्नेहपूर्वक वागा. आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. संततीतीविषयी अशुभ घटना घडतील. मानसिकता अस्वस्थता करणारा सप्ताह आहे. व्यापार वर्गांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. निर्णय चुकू शकतात. घरातील वातावरण समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करा. संबंधात तणाव निर्माण होतील. प्रकृतीची काळजी घ्या. शक्यतो दुरवरचे प्रवास टाळावेत. सप्ताहाच्या उत्तरार्थ कालखंडात एखादी भाग्यकारक घटना शुभवार्ता समजतील. अचानक लाभ होतील.

शुभ दिवसः गुरूवार, शनिवार, रविवार.

मीनः 

सप्ताहात कष्टदायक वातावरण राहील. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील. कुटुंबातील आप्तांचे रुसवे फुगवे सहन करावे लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही वेळ जरा अधिक मेहनत कायम ठेवावी लागेल. आपणास कठोर परिश्रम घ्यावे लागतील. गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. वाहनापासून अपघाताची शक्यता राहिल. आरोग्य ठीक राहणार नाही. कायम चिंताग्रस्त राहाल. घरात कलह होतील. त्यामुळे नव नवीन घरात राहण्याचे प्रसंग येतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. आपल्या व्यवहारात भानगडी उपस्थित होतील. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता वाटते. वडिलांच्या इस्टेटीत लाभ होणार नाही. सार्वजनिक कामात सावधानतेने भाग घ्या. मानहानी होण्याची शक्यता आहे. उधळेपणावर आळा घालावा लागेल. नाहीतर कर्जबाजारी व्हाल. एकंदरीत या सप्ताहात आपणास आर्थिक स्थिती आजारपण आणी वादविवाद इत्यादीं बाबतीत काळजीपूर्वक वाटचाल करावी लागणार आहे.

शुभ दिवसः सोमवार, बुधवार, गुरुवार.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)