Weekly Horoscope : एप्रिल महिन्यातील पहिला सप्ताह पाच मोठ्या योगात; आठवडा खास लाभाचा! वाचा राशीभविष्य !
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Horoscope : एप्रिल महिन्यातील पहिला सप्ताह पाच मोठ्या योगात; आठवडा खास लाभाचा! वाचा राशीभविष्य !

Weekly Horoscope : एप्रिल महिन्यातील पहिला सप्ताह पाच मोठ्या योगात; आठवडा खास लाभाचा! वाचा राशीभविष्य !

Apr 01, 2024 08:00 AM IST

Weekly Horoscope 1 to 7 April 2024 : ग्रह-नक्षत्राच्या बदलत्या स्थितीत एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा ठरेल, जाणून घ्या मेष ते मीन सर्व १२ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य.

साप्ताहिक राशीभविष्य १ ते ७ एप्रिल २०२४
साप्ताहिक राशीभविष्य १ ते ७ एप्रिल २०२४ (Freepik)

सप्ताहात बुध वक्री आणि अस्त होणार आहे. चंद्रमा शनि आणि आणि गुरूच्या राशीतुन त्याचबरोबर शुक्र, राहु, मंगळ, केतु, गुरू आणि शनि या सहा ग्रहांच्या नक्षत्रातून गोचर करणार आहेत. शशयोग, सरस्वतीयोग, विषयोग, लक्ष्मीयोग, राजयोग असे पाच मोठे योग घटीत होत आहेत. सप्ताहात गुरू आणि शनिचा विशेष प्रभाव राहील! कसा जाईल सप्ताह! पाहु यात आपल्या जन्मराशीनुसार ! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!

मेषः 

सप्ताहात ग्रहयोग प्रतिकुल असल्याने प्रकृतीची विशेष काळजी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण करेल. तसेच या सप्ताहात खर्चावर नियंत्रण करावे लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कलाकारासाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्ताहात जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. एकंदरीत हा आठवडा काहीसा कष्टप्रद असणार आहे. नोकरदारां साठी हा काळ दगदग व मानसिक त्रास वाढवणारा आहे. नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. स्वतंत्र व्यावसायिकांची मध्यस्थांच्या मदतीतून प्रकल्प मार्गी लागतील.

शुभदिवसः गुरुवार, शनिवार, रविवार.

वृषभः 

सप्ताहात ग्रहांची स्थिती पाहता व्यापारी वर्गाने उधारीचे प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. अन्यथा येणी येताना त्रास संभवतो. मात्र वादविवादाचे प्रसंग टाळा. शेअर्स मधील गुंतवणूकीत इच्छीत फायदा मिळणार आहे. महिला वर्गास काळ अनुकूल आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक आहे. सुशिक्षित तरूणांना आपणास इच्छित असणारी नोकरी जरूर मिळणार आहे. प्रेमी युगुलांना आपल्या मनाप्रमाणे प्रेमविवाह करण्याचा योग उत्तम आहे. अचानक धन लाभाची संधी मिळेल. वारसा अधिकारातून आपणास उत्तम लाभ मिळणार आहे. आठवडा मजेशीर समाधानी जाईल आपला यश संपादन करण्याचा काळ उत्तम आहे. खेळाडूंसाठी यशाचा शिखरं गाठण्यास भाग्याची साथ उत्तम मिळणार आहे. लेखकवर्गास काळ अनुकुल आहे. कलाकारांना मान सन्मान प्रसिद्धी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना वाव देणारा सप्ताह आहे. नवनवीन कल्पना आमलात आणाल.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

मिथुनः 

सप्ताहात अनुकूल ग्रहयोगात रोजगारात नविन संधी प्रस्ताव येतील. बढतीचे योग आहेत. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मनमिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. बेरोजगारांना नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. वैद्यकीय व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. भागीदारीत फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रवासात लाभ होईल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना हा सप्ताह आर्थिकदृष्या लाभ देणारा आहे. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.

शुभदिवस: मंगळवार, बुधवार, गुरुवार.

कर्कः 

सप्ताहात गूरू शनि योगात नोकरीत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करताना भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. वाहनापासून अपघाताची शक्यता राहिल. आरोग्य ठीक राहणार नाही. चिंता निर्माण करणारा सप्ताह आहे. व्यापार रोजगारात काळजीपूर्वक व्यवहार करावेत. भावनेवर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. घरात कलह होतील. त्यामुळे नवनवीन घरात राहण्याचे प्रसंग येतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. आपल्या व्यवहारात अडचण उपस्थित होतील. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता वाटते. वडिलांच्या इस्टेटीत लाभ होणार नाही .सार्वजनिक कामात सावधानतेने भाग घ्या. मानहानी होण्याची शक्यता आहे. उधळेपणावर आळा घालावा लागेल. नाहीतर कर्ज बाजारी व्हाल. लांब पल्याचे प्रवास टाळा. वाहन जपून आणि सावकाश चालवा. अपघात भय शस्त्रक्रिया भय संभवते.

शुभदिवसः मंगळवार, बुधवार, रविवार.

सिंहः 

सप्ताहात शनि अस्त असल्याने नोकरदारांना नोकरीतील बदल त्रासदायक ठरेल. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. लाभापासून दूरावले जाल. मित्र मंडळी नातेवाईक वादविवादाची परिस्थिती ठेवील. घरातील वरिष्ठांची काळजी घेणे जरुरीचे आहे. जोडिदारासोबत वादविवाद टाळा. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले हिताचे ठरेल. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी न जाणे योग्यच ठरेल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्च वाढणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या.

शुभदिवस: शुक्रवार, शनिवार, रविवार.

कन्याः 

सप्ताहात चंद्रभ्रमण अनिष्ट स्थानातून होत आहे. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्थ्यांसोबत तणाव वाढवू शकतो. परिस्थिती संयम ठेवून हाताळा अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठाची साथ मिळेल. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. हितशत्रुचा विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी भांडण वादविवाद असे प्रसंग घडतील. वडिलोपार्जित घर संपत्तीमध्ये नविन समस्या देखील उद्‌भवतील. व्यवसायात आर्थिक फसवणुकीची दाट शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रिया कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार लांबणीवर टाका. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका विचारअंतीच निर्णय घ्यावेत. आपण बोलण्यावर संयम ठेवावा अन्यथा समस्या निर्माण होतील. लांबचे प्रवास जपुन करावेत. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

शुभदिवसः गुरुवार, शुक्रवार, शनिवार.

तूळ: 

सप्ताहात चंद्रभ्रमण अनुकूल असल्याने आरोग्य मानसिक स्वास्थ उत्तम राहील. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. शिक्षण क्षेत्रातील महिलांना अनुकुल प्रगतीचे शिखर गाठता येईल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची उत्तम दाद मिळेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लागेल. व्यवसियाकांनी व्यवसायात केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. कोर्ट कचेरीचे प्रसंग तूर्तास टाळावेत. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. नवीन प्रकल्प हाती येतील. सप्ताहात आपण यशस्वी व्हाल. लेखकवर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धि योग आहेत.

शुभदिवसः मंगळवार, गुरुवार, शनिवार.

वृश्चिकः

 सप्ताहात चंद्राचा नेपच्यूनशी संयोग निर्माण होत आहे. प्रगतीदायक आणि शुभ सप्ताह आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. उत्कर्ष वाढविणारा काळ आहे. आपण आपल्या बोलण्याघर संयम ठेवला तर बऱ्याच समस्या कमी होतील. व्यापारात व्यावसायिकांची येणी वसुल होतील. अतिशय शुभप्रद घटना अनुभवास देणारा सप्ताह आहे. कुटुंबामधून आपणास शुभवार्ता मिळणार आहे. अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारात लाभ होतील. आपल्याला मित्र मैत्रिणींमुळे अनपेक्षीत लाभ होणार आहे. विक्रीच्या व्यवहारामध्ये आपणास अपेक्षीत असणारा फायदा मिळेल. वरिष्ठ आपल्या वर मर्जी ठेवणार आहे इच्छीत नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही. घर वाहन खरेदीस अनुकूल कालावधी आहे .कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून आपणास आर्थिक सहकार्य लाभेल.

शुभदिवस: सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

धनुः 

सप्ताहात अनुकूल ग्रहयोगात आपणास आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. व्यावसायिकांना काळ यशाच्या मार्गाकडे नेणारा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातच लक्ष द्यावे. स्थावराच्या वादात प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे. भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी योग राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. नवीन प्रकल्प पुर्णत्वास जातील. कर्तुत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. दिर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती पाहून समाधान होईल. कामाचा उरक वाढविला पाहिजे. जबाबदारीने आपण काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना पेपर तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे.

शुभदिवस: गुरुवार, शुक्रवार, शनिवार.

मकरः 

सप्ताहात चंद्र राहुशी संयोग करतोय. अचानक अर्थप्राप्तीची संथी देईल. कौटुंबिक जीवनात आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले हिताचे ठरेल. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी न जाणे योग्यच होईल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे लागेल. वाहन चालविण्यास ग्रहमान अनिष्ट आहे. आपल्या संशयीवृत्तीवर आवर घाला. नोकरदार आपण जर नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर सध्या तरी तो विचार सोडून द्यावा. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. वादविवादामध्ये सामोपचाराने प्रसंग हाताला. विद्यार्थ्यांना ग्रहमान प्रतिकूल आहेत. पतीपत्नीतील मतभेद वाढविणारे आहे. वरिष्ठांचा सल्ला आपणास बहुमोल ठरेल. अवास्तव खर्च टाळणे जरुरीचे आहे. प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.

शुभदिवसः सोमवार ,बुधवार, रविवार.

कुंभ: 

सप्ताहात बुध अस्त असणार आहे. नोकरदार नोकरी बदलण्याच्या विचारात असतील तर तूर्तास विचार लांबणीवर टाका. आपल्याला मध्यस्थ बनून तडजोड करणे अतिशय उत्तम जमते त्यामुळे वादविवाद करणे आपल्याला फारसे जमणार नाही. संततीस काळ प्रतिकुल आहे. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. व्यवसायात आपणास अपेक्षीत यश लाभणार नाही. स्थावर मालमत्तेच्या खरेदीतून अपेक्षीत लाभ आपणास मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कष्ट सहन करावे लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करुन जमणार नाही रोजगारात घाईगडबडीत निर्णय घेवू नये. विचाराअंती निर्णय घ्यावे. जमिनी विक्री लांबणीवर ठेवा. विरोधकांचा त्रास जाणवेल. प्रवासात काळजी तर घ्यावीच लागेल. मित्र मंडळी नातेवाईक यांच्याशी व्यवहारात दक्षता घ्यावी लागेल. नोकरीमध्ये पगार पूर्ण मिळण्यास अडचण जाणवेल. पतीपत्नीत वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.

शुभदिवसः बुधवार, शनिवार, रविवार.

मीनः 

सप्ताहात चंद्रभ्रमण आणि आपल्या राशीतील गुरूचे इतर ग्रहांचे प्रतियोग पाहता आर्थिक बाबतीत काम सुरुळीत पार पडतील. स्वत:चे घर वाहन होण्यास काळ अनुकूल आहे. संततीविषयी काळ भाग्योदय कारक आहे. मित्रमैत्रिणीं बरोबर आपण वेळ मजेत घालविणार आहात. नोकरदारांसाठी नोकरीत मान सन्मान मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. नातेवाईक मित्रमंडळी यांच्या सह फिरण्याचा योग उत्तम आहे. नोकरी मध्ये वरिष्ठांची मर्जी आपल्यावर विशेष राहील. वारसा अधिकार मिळेल. व्यापाऱ्यांना सुवर्ण काळ आहे. आपण मानसिक समाधान लाभेल. सुशिक्षीत बेरोजगारांना उत्तम नोकरीचा लाभ होईल. विद्यार्थ्यांना काळ सुवर्णसंधीचा आहे. महिला शासकिय सेवेत असणाऱ्यांसाठी काळ अनुकूल वातावरण आहे. आपली सामाजिक पत प्रतिष्ठा वाढणार आहे. सप्ताहाच्या मध्यान्नात आरोग्याबाबतीत विशेष तक्रारी आणि अपघात भय संभवते. काळजी पूर्वक वाहन चालवा. दुर्व्यसनांपासून सावध रहा.

शुभदिवसः बुधवार, गुरुवार, शनिवार.

Whats_app_banner