मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vivah Yog 2024: लग्न बाकी आहे? २०२४ मध्ये या राशींसाठी आहे विवाह योग

Vivah Yog 2024: लग्न बाकी आहे? २०२४ मध्ये या राशींसाठी आहे विवाह योग

Priyanka Chetan Mali HT Marathi
Dec 20, 2023 02:56 PM IST

Vivah Yog 2024 prediction: वर्ष २०२३ संपायला थोडेच दिवस बाकी आहे यानंतर नवीन वर्ष २०२४ सुरू होईल. हे नवीन वर्ष काही राशीच्या प्रेम जीवनासाठी फार खास ठरणार आहे. या राशींसाठी विवाह योग जुळून येत आहे. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

A small appreciation goes a long way. We should appreciate our partners more for their efforts and make them feel valued and loved.
A small appreciation goes a long way. We should appreciate our partners more for their efforts and make them feel valued and loved. (Unsplash)

ज्योतिषशास्त्रात राशीनुसार त्या राशीच्या लोकांचा स्वभाव, गुण, वैशिष्ट्य सांगितले जाते. या राशींची आर्थिक, व्यावसायिक, करिअर, वैवाहिक, प्रेम जीवन कसे असेल हे ही सांगता येते. ज्योतिष गणनेनुसार नवीन वर्ष २०२४ काही राशींसाठी फार शुभ योगायोग घेऊन येत आहे. तुमचे लग्न बाकी आहे आणि लग्नाचा योग आहे की नाही, नवीन वर्षात कोणत्या नशीबवान राशी आहेत ज्यांच्यासाठी लग्नाचा शुभ योग जुळून येत आहे. जाणून घ्या कसे असेल प्रेम जीवन.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष प्रेम जीवनासाठी फार खास ठरेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता. यामुळे तुमच्या प्रेम जीवनात सुखाचे क्षण येतील, याचा तुमच्या भविष्यावर सकारात्मक परिणाम होईल. प्रेम जीवनात सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. भावनांचं गाठोडं एकमेकांसोबत व्यक्त कराल. लग्न बाकी असलेल्यांसाठी यावर्षी लग्नाचे योग जुळून येत आहे.

मिथुन

लग्न बाकी असलेल्यांसाठी यावर्षी विवाह योग आहेत. तुमच्या जीवनातील खास व्यक्तिप्रती प्रेम वाढेल. तुम्हाला ही व्यक्ति आकर्षीत करेल. तुमच्या भावना त्यांच्यासमोर लवकरात लवकर व्यक्त करा, त्यांच्या मनात तुमच्याविषयी काय आहे हे जाणून घ्या. यामुळे याच व्यक्तिसोबत राहावे की नाही याचेही तुम्हाला स्पष्टीकरण मिळेल. प्रियकर प्रेयसी सोबत फिरायला जातील. यावर्षी परस्पर फार पाठींबा लाभेल.

कन्या

तुमच्या परस्पर संबंधावर लक्ष द्या आणि संभाषणातून आपले मत एकमेकांसमोर ठेवा. तुमच्या जोडीदाराला तुमच्या पाठींब्याची आवश्यकता आहे. तुमच्या कामकाजाची जबाबदारी घ्या. वैवाहिक जीवनात तुमची आर्थिक स्थिती सुधरवण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. यावर्षी प्रेमीचे फार सहकार्य मिळेल. हे नवीन वर्ष विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी लग्नाचे शुभ योग घेऊन आलं आहे.

वृश्चिक

तुम्ही माघार घेऊ नका. दिवस फार रोमांचक आहे. ज्यांच्याकडे फार ऊर्जा आहे ते असे ध्येय गाठू शकतात जे अशक्य आहे. जर तुम्ही तुमच्याकडून गोष्ट पुढे नेण्याचा निर्धार करत असाल तर एक वेळा चौफेर विचार करून घ्यावा. जोडीदाराचा पाठींबा मिळेल. लग्न बाकी असलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लग्नाचे योग आहेत.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel