Vivah Panchami 2024 Upay In Marathi : यावर्षी विवाह पंचमी ०६ डिसेंबर २०२४, शुक्रवार रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रभू राम आणि माता सीतेचा विवाह झाला होता. म्हणूनच पंचमीच्या या तिथीला विवाह पंचमी म्हणतात. धार्मिक दृष्टीकोनातून हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. विवाहपंचमीच्या दिवशी आपल्या राशीनुसार काही उपाय केल्यास वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात आणि इच्छित वर मिळवण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकते, असे मानले जाते. या उपायांच्या मदतीने ग्रहांची स्थितीही मजबूत करता येते.
विवाह पंचमी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा २०२४ मध्ये विवाह पंचमी तिथी ०५ डिसेंबर रोजी १२ वाजून ४१ मिनिटांनी सुरू होईल. तर, दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर रोजी १२ वाजून ०७ मिनिटांनी पंचमी तिथी समाप्त होईल.
मेष - मेष राशीच्या महिलांनी विवाह पंचमीच्या दिवशी माता सीतेला लाल बांगड्या आणि वस्त्र अर्पण करावे.
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी भगवान राम आणि सीता मातेची एकत्र पूजा करावी.
मिथुन - विवाह पंचमीच्या दिवशी माता सीतेला हिरव्या बांगड्या आणि वस्त्र अर्पण करा.
कर्क - या राशीच्या लोकांनी श्री रामाला पिवळे वस्त्र अर्पण करावे.
सिंह - भगवान श्री रामाला पिवळी फुले आणि सीता मातेला गुलाबी फुले अर्पण करा.
कन्या - विवाह पंचमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी श्री सीता चालीसा चे पठण करावे.
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी माता सीतेला गुलाबी बांगड्या अर्पण कराव्यात.
वृश्चिक - विवाहपंचमीच्या निमित्ताने वृश्चिक राशीच्या लोकांनी माता सीतेला सोळा शृंगार अर्पण करावेत.
धनु - धनु राशीच्या लोकांनी विवाह पंचमीला भगवान श्री रामाला गूळ अर्पण करावा.
मकर - मकर राशीच्या लोकांनी विवाह पंचमीला श्रीराम चालीसा चे पठण करावे.
कुंभ - विवाहपंचमी निमित्त कुंभ राशीच्या लोकांनी माता सीतेला खीर अर्पण करावी.
मीन - मीन राशीच्या लोकांनी विवाह पंचमीला श्री सीता चालीसा चे पठण करावे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हे पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या