ज्योतिषशास्त्रात नवग्रह कार्यरत असतात. या नऊ ग्रहांचे प्रत्येकाचे एक खास वैशिष्ट्य असते. प्रत्येक ग्रह आपल्या गुणधर्मानुसार राशींवर प्रभाव टाकत असतो. नवग्रहांपैकी दोन ग्रह असे आहेत ज्यांना मायावी ग्रह म्हणून संबोधले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतू हे मायावी ग्रह मानले जातात. तसेच हे दोन्ही ग्रह वक्री चाल चालतात. त्यामुळेच राहू-केतू राशींमध्ये वक्री गोचर करत असतात. वैदिक शास्त्रानुसार, केतूची उच्च राशी धनु आहे. तर दुसरीकडे राहूची उच्च राशी वृषभ आहे. त्यामुळेच राहू आणि केतू अनुक्रमे धनु आणि वृषभ राशीवर नेहमीच शुभ कृपादृष्टी टाकत असतात. येत्या काळात राहू मीन राशीत तर केतू कन्या राशीत विराजमान असणार आहेत.
मीन राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र सुखसमृद्धी आणि धनसंपत्तीचा कारक आहे. त्यामुळे मीन राशीवर राहूचा नकारात्मक परिणाम पडणार नाही. याउलट कन्या राशीमध्ये केतू विराजमान असणार असल्याने, कन्या राशीच्या लोकांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. विविध कार्यांमध्ये अडचणी येतील. आर्थिक नुकसान सहन करावे लागतील. प्रगतीचा वेग मंदावेल. महत्वाचे म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल १० महिने केतू कन्या राशीला त्रास देत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात केतूच्या प्रकोपापासून बचावासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. आपण आज त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्रानुसार सध्या केतू कन्या राशीत विराजमान आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच १७ मे २०२५ पर्यंत केतू कन्या राशीतच असणार आहे. त्यांनंतर १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी केतू कन्या राशीतून निघून सिंह राशीत गोचर करणार आहे. पुढच्या वर्षी ४ डिसेंबर २०२५ पर्यंत केतू या राशीत विराजमान असेल. नंतर ५ डिसेंबर २०२५ रोजी केतू राशीपरिवर्तन करत सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या संक्रमणानंतरच कन्या राशीच्या लोकांना केतूच्या प्रकोपापासून मुक्ती मिळेल.
वैदिक शास्त्रानुसार ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून बचावासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा काटकोरपणे पालन केल्याने ग्रहदोषापासून मुक्ती मिळू शकते. यानुसार केतू दोष दूर करण्यासाठीसुद्धा काही उपाय अधोरेखित करण्यात आले आहेत. शास्त्रानुसार, कन्या राशीचे आराध्य दैवत श्रीगणेश आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांनी बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करावी. बाप्पाला दुर्वा, मोदक आणि मालपुआ अर्पण करावा. त्यासोबतच गणेश चालिसाचा पाठदेखील करावा. कन्या राशीच्या लोकांनी केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळविण्यासाठी दररोज आंघोळीनंतर श्रीगणेशाला अभिषेक करावा.
परंतु अभिषेक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गंगा जलमध्ये अक्खी हिरवी मूगसुद्धा मिक्स करावी. शिवाय तुमच्या कुंडलीतील ग्रह मजबूत करण्यासाठी बुधवारच्या दिवशी पूजेनंतर गायीला चारा खाऊ घालावा. असे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात. आणि अशुभ प्रभावापासून तुमची सुटका होते. सोबतच आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी श्रीगणेशाची प्रतिमा ठेवावी त्यामुळे तुमच्यावरील अशुभ प्रभाव कमी होऊन कामात प्रगती होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या