Venus Transit: २९ तारखेला शुक्राची राशी बदलणार आहे. शुक्र आता ४ महिने मीन राशीत राहील. राहू देखील या राशीत आधीच विराजमान झालेला आहे. अशा तऱ्हेने शुक्र आणि राहू ४ महिने एकत्र राहिल्याने कोणत्या राशींवर परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २९ जानेवारी २०२५ रोजी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत जात आहे. शुक्र हा मीन राशीत गेल्याने याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. पण राहू आधीच या राशीत विराजमान आहे. राहू या राशीत असल्याने शुक्र आणि राहू आता पुढील चार महिने एकत्र राहणार आहेत. याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये राहूचे मीन राशीत गोचर झाले होते. अशा तऱ्हेने धन आणि वैभव देणारे शुक्र आणि राहू काही राशींना लाभ देणार आहेत, तर काही राशींना त्रास देखील देतील. जाणून घेऊ या राशींवर काय होणारा आहे परिणाम…
मीन राशीच्या लोकांसाठी हा बदल चांगला राहील. या राशीच्या लोकांना करिअरची प्रगती, पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला कोणत्याही मालमत्तेचा वारसा देखील मिळेल, ज्यामुळे आपल्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तयार होतील. एकंदरीत शुक्र आणि राहू तुम्हाला लाभ देतील.
कर्क राशीच्या जातकांना त्यांचे नशीब आता साथ देईल. तुम्हाला जे हवं होतं, ते आता तुमच्याकडे येणार आहे. एकंदरीत तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नशिबामुळे बिघडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.
कन्या राशीच्या जातकांना शुक्र वैयक्तिक जीवनात सकारात्मक परिणाम देईल. तुमचा जीवनसाथी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक समजून घेईल. तुमच्या दोघांची केमिस्ट्री चांगली राहणार आहे. राहूने तुम्हाला ताण-तणाव दिला तरी देखील शुक्रामुळे तुमचे वैयक्तिक जीवन खूप चांगले राहणार आहे.
disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या