shukra nakshatra parivartan : ग्रहांचे राशी बदल आणि नक्षत्र बदल या तशा नित्याच्या घटना आहेत. मात्र, त्याचे परिणाम अनेक प्रकारचे असतात. ११ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह नक्षत्र बदलणार आहे. त्याचा फायदा काही राशींना होणार आहे.
ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शारीरिक सुख, वैवाहिक सुख, आनंद, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, रोमान्स, वासना आणि फॅशन-डिझायनिंगचा कारक ग्रह आहे. शुक्र वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही त्यांची उच्च राशी आहे, तर कन्या ही त्यांची नीच राशी आहे. ज्योतिषशास्त्रात नक्षत्र बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नक्षत्रबदलाचा सर्व राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडतो.
शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनानं कोणत्या राशींचं नशीब फळफळणार आहे पाहूया…
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन शुभ म्हणता येईल. नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी वेळ चांगला आहे.
कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
आर्थिक लाभ होईल. त्यातून आर्थिक बाजू मजबूत होईल.
सिंह राशीला शुभ परिणाम मिळतील.
धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
नोकरी- व्यवसायात लाभाचे संकेत, पण निर्णय घेण्यास उशीर करू नका.
लग्नाची शक्यताही वर्तवली जात आहे.
नोकरी, व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे.
स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील.
घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता.
व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे.
धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल.
परोपकार करण्याची संधी मिळेल.
तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.
लग्नाची शक्यताही वर्तवली जात आहे.
कुटुंबात शुभ कार्य होऊ शकते.