Shukra Gochar in Kanya Rashi : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची चाल बदलणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ग्रहांची हालचाल बदलल्यानं सर्व राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतात. २५ ऑगस्टला शुक्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. त्याचा काही राशींवर परिणाम होणार आहे.
ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शारीरिक सुख, वैवाहिक सुख, आनंद, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, रोमान्स, वासना आणि फॅशन-डिझायनिंगचा कारक ग्रह आहे. शुक्र वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही त्यांची उच्च राशी आहे, तर कन्या ही त्यांची कनिष्ठ राशी आहे.
ज्योतिषीय गणनेनुसार शुक्राचा सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश झाल्यानं काही राशींना नशिबाची साथ मिळणार आहे, तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जाणून घेऊया, शुक्राच्या कन्या राशीतील प्रवेशानं कोणत्या राशींना चांगले दिवस येतील…
आर्थिक बाजू मजबूत होईल. व्यवसायात फायदा होईल. भावंडे मदत करू शकतात. धैर्य आणि शौर्य वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नशीब साथ देईल. नोकरी आणि व्यवसायासाठी काळ शुभ राहील. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवनात आनंदाचा अनुभव येईल. कुटुंबाकडून अचानक चांगली बातमी मिळू शकते.
नोकरी आणि व्यवसायासाठी काळ शुभ आहे. मान-सन्मान मिळेल. सर्व कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी सूर्य संक्रमण फायदेशीर ठरेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. व्यवहारांसाठी वेळ शुभ आहे.
या काळात कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धनलाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. पैशांशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
नोकरी आणि व्यवसायात सर्व काही चांगलं होईल. नोकरीच्या ठिकाणी बढतीचा योग आहे. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक आघाडीवरही सूर्याचं राशी परिवर्तन आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात शत्रूंवर विजय मिळवाल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तब्येतीत सुधारणा होईल. दाम्पत्य जीवन सुखी राहील.