ग्रह-नक्षत्र आपल्या कालगणनेनुसार संक्रमण करतात. प्रत्येक महिन्यात नवग्रहांपैकी काही ग्रहांचे संक्रमण होणे निश्चित असते. या ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ किंवा अशुभ प्रभाव राशीचक्रातील सर्व राशींवर पडतो. ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू होईल सोबतच मराठी महिन्यातील श्रावण महिना संपून भाद्रपद महिनाही सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षाचा पंधरवाड्याचा कालावधी हा फार महत्वाचा असतो कारण या १५ दिवसात आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देत असतात.
सप्टेंबर महिन्यात १७ तारखेपासून पितृ पक्ष सुरू होत आहे. १५ दिवसांच्या पितृ पक्षात शुक्र ग्रह आपली राशी बदलत आहे. अनेक राशींसाठी हा काळ चांगला राहील. शुक्र ग्रह हा धन, ऐश्वर्य, सुख आणि समृद्धीसाठी कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह विशेषतः वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे. तुमच्या कुंडलीत शुक्र कुठे आहे यावरही तुमच्यावरील शुक्राचा प्रभाव अवलंबून असतो. त्यामुळे अचूक परिणामांसाठी कुंडलीतील शुक्राचे स्थान जाणून घेतले पाहिजे.
भाद्रपद पक्षातील पौर्णिमा तिथी, १८ सप्टेंबर २०२४ बुधवारी, सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल. आता शुक्र स्वत:च्याच राशीत प्रवेश करत असल्याने अनेक राशीच्या लोकांसाठी विशेष लाभाचे योग आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी सप्टेंबरमध्ये शुक्राचे परिवर्तन विशेष असेल.
शुक्र ग्रहाच्या राशी बदलामुळे एक किंवा दोन नव्हे तर तब्बल १० राशीच्या लोकांना फायदा होईल. शुक्र संक्रमणाच्या काळात मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल.
शुक्र या राशींना आर्थिक बाबतीत लाभ देईल. धनवृद्धी होईल. या राशीच्या लोकांच्या जोडीदाराशी संबंधित असलेल्या सर्व समस्या दूर होतील आणि काही लग्नासाठी इच्छूक असणाऱ्या व्यक्तिंचे लग्न होण्याची शक्यता आहे. या राशींना गुंतवणुकीतूनही खास फायदा होईल. अनेक आर्थिक मार्ग मोकळे होतील आणि जिथून तुम्ही आशा सोडली होती तीथूनही पैसे येतील. याशिवाय तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धीही येईल. परंतू, या राशीच्या लोकांनी पितृ पक्षाच्या काळात नवीन करार काही काळासाठी पुढे ढकलला पाहिजे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)