मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Laxmi Narayan Yog: लक्ष्मी-नारायण योग, या राशींसाठी १८ जानेवारीपासून सुवर्ण संधीचा काळ

Laxmi Narayan Yog: लक्ष्मी-नारायण योग, या राशींसाठी १८ जानेवारीपासून सुवर्ण संधीचा काळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 03, 2024 12:32 PM IST

laxmi narayan yog 2024 : ग्रह-नक्षत्राच्या राशीपरिवर्तनामुळे काही ग्रह एकाच राशीत येतात. ग्रहांच्या युतीमुळे शुभ-अशुभ योग तयार होतात. शुक्र-बुध युतीमुळे शुभ असा लक्ष्मी-नारायण योग तयार होईल. या शुभ योगाचा ५ राशींना लाभ होईल.

Laxmi Narayan Yog
Laxmi Narayan Yog

वर्ष २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करतील. ७ जानेवारी २०२४ रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. यानंतर १८ जानेवारी २०२४ ला शुक्र ग्रह धनु राशीत जाईल. धनु राशीत शुक्र-बुध युतीमुळे लक्ष्मी-नारायण योग तयार होईल. यामुळे नवीन वर्षाचा पहिलाच महिना काही राशींना फायदेशीर ठरेल. लक्ष्मी-नारायण योगाचा कोणत्या राशींना खास लाभ होईल जाणून घ्या.

मेष

करिअर मध्ये नवीन संधी मिळतील. नोकरी व धंद्यात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसाय लाभदायक होईल. आर्थिक स्त्रोत वाढल्यामुळे धनलाभ होईळ. मेहनतीचे फळ मिळेल. प्रेम जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनही आनंदात जाईल.

सिंह

नोकरी करणाऱ्यांसाठी सुखद वेळ राहील. कार्यक्षेत्रात नवीन ओळख निर्माण होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मुलाखतीत यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. आनंदाचा काळ आहे.

कन्या

लक्ष्मी-नारायण योगामुळे कन्या राशीचा सुखद काळ सुरू होईल. आर्थिक बाबतीत नशीबाची पूर्ण साथ लाभेल. यशाचा व प्रगतीच्या मार्गावर असाल. नोकरी बगलण्यासाठी सुवर्ण काळ आहे. जोडीदाराचा पाठिंवा मिळेल. सुख-समाधानात जीवन व्यतीत होईल.

तूळ

लक्ष्मी-नारायण योगाच्या शुभ प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. सकारात्मक दृष्टीकोनामुळे प्रगतीच्या मार्गावर असाल. भागीदारीत असलेला धंदा आर्थिक लाभात राहील. कामाचा चांगला परिणाम मिळेल. फार पुर्वीपासूनचा आजारातून सुटका होईल आणि धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.

कुंभ

लक्ष्मी-नारायण योगाचा शुभ प्रभाव कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. भौतीक सुख-सुविधेत वृद्धी होईल. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत यश मिळेल. व्यावसायिक जीवनात महत्वकांक्षी असाल. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासू राहाल. सुखद वेळ राहील.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)