प्रत्येक ग्रह-नक्षत्राच्या स्थितीचा राशींवर प्रभाव पडतो. प्रेमाचा कारक शुक्र ग्रह हा देखील आपल्या राशी परिवर्तनाने मेष ते मीन सर्व १२ राशींवर शुभ किंवा अशुभ परिणामदायक ठरतो . शुक्र ग्रहाची शुभ स्थिती असल्यास जीवनात पैश्याची कधीच कमतरता भासत नाही. शुक्र ग्रहाचा संबंध लक्ष्मी मातेशी असतो. शुक्र ग्रह सोमवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. ६ मार्चपर्यंत शुक्र ग्रह मकर राशीतच विराजमान राहील. शुक्र ग्रहाच्या या राशीपरिवर्तनाने कोणत्या राशींवर चांगला प्रभाव पडेल, कोणत्या नशीबवान राशींवर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, जाणून घ्या कोणत्या राशींच आर्थिक स्थिती आणखी भक्कम होणार आहे.
शुक्र ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा मेष राशीच्या लोकांना लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला चांगली संधी मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक फायदा होईल. प्रवासाचे शुभ योग आहेत. आर्थिक बाबतीत पैश्याची कमतरता भासणार नाही. तुमचे प्रेम जीवनात आणखी प्रेम वाढेल. धार्मिक कार्य करण्यातही मन रमेल.
शुक्र ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा कर्क राशीच्या लोकांना फायदा होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या जीवनात सुख-शांती राहील आणि तुमच्या कुटूंबातही आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत डेटवर जाण्याचे नियोजन करू शकतात. आर्थिक वृद्धीसाठी नवीन मार्ग व संधी मिळतील. नवीन नोकरी मिळण्याचेही खास योग आहेत.
मकर राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन अनेक पटींनी लाभदायक ठरेल. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतीव व आरोग्य सुदृढ होईल. जीवनात प्रेम आणि आकर्षण सुखद क्षणांचा अनुभव देतील. लहान-मोठा प्रवास घडू शकतो. करिअरमध्ये नवीन आव्हान मिळू शकते. व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या तुम्ही संतूलन ठेवाल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)