Horoscope Venus Transit, Rashifal Shukra : शुक्र हा सुख, समृद्धी, प्रेम आणि सौंदर्याशी संबंधित ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शुक्राच्या हालचालीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शुक्राची स्थिती चांगली असेल तर ऐशोआराम, विलास आणि प्रेमाचा आनंद मिळतो. त्याचबरोबर शुक्राची वाईट स्थिती देखील जीवनात अडचणी निर्माण करू शकते. आता शुक्र कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. शुक्राचे कुंभ राशीत भ्रमण केल्याने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊ या-
द्रुक पंचांगानुसार शुक्र ग्रहाने २८ डिसेंबर २०२४ रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. पुढील राशी मीन रास असेल. शुक्र हा २८ जानेवारीला मीन राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत शुक्र कुंभ राशीत विराजमान राहणार आहे.
शुक्राचे राशीपरिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांचे प्रेमजीवन चांगले राहील. व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. जास्त मेहनत न करता पैसे मिळतील. शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल.
कुंभ राशीत शुक्राचे संक्रमण या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम देऊ शकते. या संक्रमणामुळे व्यवसायक्षेत्रात फायदा होऊ शकतो. तुम्हांला बहुतांश कामात यश मिळणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे. धनु राशीच्या लोकांकडे धन आणि समृद्धी कायम राहील. तुम्हांला सकारात्मक परिणाम मिळतील. त्याच प्रमाणे तुमच्या प्रेमजीवनात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात.
शुक्राचे कुंभ राशीचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. शुक्राच्या या राशीपरिवर्तनामुळे तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या राशीपरिवर्तनामुळे तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नवे गुंतवणूकदार मिळू शकतात. या राशी परिवर्तनामुळे तूळ राशीच्या काही लोकांना चांगली बातमी मिळू शकते. दांपत्य जीवनात गोडवा राहील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.