Five Rajyog : सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रात या राशी बदलाला प्रचंड महत्त्व आहे. हा बदल राशींवर आणि पर्यायानं मानवी जीवनावर थेट परिणाम करतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.
चालू महिन्याच्या अखेरीस म्हणजेच, शुक्रवार २९ नोव्हेंबरच्या रात्री शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या राशी बदलामुळं तब्बल ७०० वर्षांनंतर शुक्र आणि गुरू ग्रह समोरासमोर येणार आहेत. या स्थितीमुळं शश, केंद्र त्रिकोण, मालव्य, नवपंचम आणि रूचक असे पाच राजयोग बनत आहेत. या राजयोगांचा मोठा लाभ काही राशींना होणार आहे. या राशींच्या एकूण वाटचालीवर काय परिणाम होईल पाहूया…
मेष राशीच्या जातकांसाठी पुढचं वर्ष अनुकूल असेल. या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदार वर्गासाठी हा राजयोग शुभशकुन घेऊन येत आहे. गुरू-शुक्र समोरासमोर येण्यामुळं प्रमोशनचा योग आहे. विवाहित असलेल्या लोकांचं जीवन सुखी आणि समाधानी राहील. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. अनपेक्षित आर्थिक लाभाचाही योग आहे.
कन्या राशीच्या जातकांसाठी नवे ५ राजयोग हे भरभराट घेऊन आले आहेत. या राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाचा योग आहे. नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध थांबण्याची शक्यता आहे. सामाजिक मानमरातब मिळेल. नशिबाची भक्कम साथ मिळेल. कामात यश निश्चित आहे. आर्थिक उत्पन्न वाढेल. भावी आयुष्याच्या दृष्टीनं आर्थिक बचत कराल.
शुक्राच्या राशी बदलामुळं तयार होणारे पाच राजयोग धनु राशीला फलदायी ठरतील. विदेशात नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्या निमित्तानं परदेश वारी घडेल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या संधीचा योग आहे. गुरू आणि शुक्राच्या कृपेनं मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. या योगाच्या प्रभाव शुभ फल देणारा ठरेल.
आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीनं पाच राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतील. नोकरी करत असाल तर प्रमोशनची शक्यता आहे. मॉडेलिंग, अभिनय, संगीत, मीडिया अशा विविध क्षेत्रातील लोकांची या काळात चांगली प्रगती होईल. सरकारी नोकरीत मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ते प्रयत्न यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)