ज्योतिषशास्त्रात विविध ग्रहांच्या एकत्र येण्याला आणि एकत्र अस्त होण्यालासुद्धा विशेष महत्व आहे. हा मे महिना काही राशींसाठी चांगलच त्रासदायक ठरणार आहे.याचे कारणसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रात तब्बल २४ वर्षांनंतर गुरू आणि शुक्र एकत्र अस्त होणार आहेत. या काळात कोणतेही शुभकार्य करणे अशुभ समजले जाते. त्यामुळे या राशींना लक्षपूर्वक कार्य करावे लागणार आहेत. ज्योतिषशास्त्रात देवतांचे गुरु म्हणून बृहस्पतीला मान्यता आहार. तर दैतांचे गुरू म्हणून शुक्राला मान्यता आहे. या दोघांच्या सोबत अस्त होण्याने कोणत्या राशीला नुकसान होऊ शकतो याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
दैनंदिन ज्योतिषशास्त्रानुसार दैत्याचे गुरू शुक्राचा २८ एप्रिल दिवशी सकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी मेष राशीत अस्त झालेला पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता जवळपास दीड दोन महिन्यांनी म्हणजेच २९ जून रोजी संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी मिथुन राशीत उदय होणार आहे. हे झाले शुक्राचे आता आपण गुरूबाबत जाणून घेऊया.
गुरू येत्या ७ मे रोजी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी वृषभ राशीत अस्त होणार आहे. तसेच शुक्राप्रमाणे येत्या जूनमध्ये ६ तारखेला उदय होणार आहे. विशेष म्हणजे या योग एक दोन नव्हे तर तब्बल २४ वर्षांनी घडून येत आहे. या गोष्टीचा काही राशींवर मात्र नकारात्मक परिणाम झालेला दिसून येणार आहे.
२४ वर्षांनी आलेला हा योग वृषभ राशीसाठी थोडासा निराशाजनक असणार आहे. या राशीच्या लोकांनां कामाच्या ठिकाणी विविध अडचणी उद्भवतील. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जोखीम घ्यावी लागेल. ऑफिसमध्ये वरीष्ठ नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामात लहानमोठे अडथळे निर्माण होतील. घरातील लोकांचे आरोग्य सांभाळावे लागेल.मिळकतीपेक्षा खर्च अधिक होईल. त्यामुळे मन निराश होऊन चिडचिड होईल.
गुरु आणि शुक्राच्या सोबत अस्त होण्याचा फटका सिंह राशीलासुद्धा बसणार आहे. सिंह राशीमध्ये गुरू दहाव्या तर शुक्र नवव्या घरात अस्त होणार आहे.त्यामुळे आयुष्यात अनेक समस्या उद्भवतील. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.लांबचा प्रवास घडून येईल. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दगदग होईल. सतत मुलांच्या भविष्याची चिंता वाटेल. हातात घेतलेले काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होईल.जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होतील. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करावे लागेल.
वृषभ आणि सिंहप्रमाणे वृश्चिक राशीसाठीसुद्धा हा योग फारसा लाभदायक नसणार आहे. या राशीत गुरु सातव्या तर शुक्र सहाव्या राशीत अस्त होणार आहे. त्यामुळे मनात योजिलेली कामे पूर्णत्वास जाणार नाहीत. कष्टाचे हवे तसे फळ मिळणार नाही. तज्ञांचा सल्ला न घेता आर्थिक गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. पैशाची चणचण भासेल.चांगल्या कामातसुद्धा नशिबाची साथ मिळणार नाही.