प्रत्येक दिवस राशीचक्रात विविध हालचाली दिसून येत असतात. नऊ ग्रहांपैकी एखादा तरी ग्रह दररोज गोचर करत असतो. अर्थातच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या गोचरमधून विविध योगांची निर्मिती होत असते. या प्रत्येक ग्रहाचा एक निश्चित कालावधी असतो. या कालावधीतच ग्रह आपले स्थान बदलत असतात. मात्र या नऊ ग्रहांपैकी चंद्र एक असा ग्रह आहे जो राशी परिवर्तन करण्यासाठी सर्वात कमी कालावधी घेतो. चंद्र जवळपास एक ते दीड दिवसांत गोचर करत असतो. त्यामुळे चंद्र दररोज कोणत्या ना कोणत्या योगांची निर्मिती करत असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार आज २१ जुलै २०२४ रोजी चंद्र आपली राशी बदलत आहे. आजच्या दिवशी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे. चंद्राच्या कुंभ राशीत येण्याने शुक्रासोबत त्याची उभयचारी स्थिती निर्माण होत आहे. या दोन्ही ग्रहांच्या स्थिती मधून 'वसुमती' योग घटित होत आहे. शास्त्रानुसार हा ग्रह अत्यंत शुभ समजला जातो. या योगात राशीचक्रातील काही राशींना याचा अत्यंत शुभ लाभ मिळणार आहे. या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.
वसुमती योग वृषभ राशीच्या लोकांसाठी सुखद असणार आहे. याकाळात तुम्हाला तुमच्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळेल. तुमच्या कलात्मक आवडीनिवडी जपाल. साहित्य क्षेत्रात रुची वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल. त्यातून मानसन्मान पदप्रतिष्ठा मिळेल. तुमच्या वाणीचा ठसा लोकांच्या मनावर उमटेल. मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. मुलांसोबत गप्पागोष्टी झाल्याने नातेसंबंध आणखीन मजबूत होतील. व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला मिळकतीचे नवे मार्ग उपलब्ध होतील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आज वसुमती योगाचा दिवस अत्यंत फलदायी असणार आहे. या योगात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. उद्योग-व्यापारात नवी डील हाती लागेल. जोडीदारासाठी एखादे सरप्राईज प्लॅन कराल. प्रेमीयुगल एकमेकांना भेटवस्तू देऊन त्यांचे महत्व अधोरेखित करतील. त्यामुळे नाते अधिक भक्कम होईल. या योगात तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने घरातील भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. कुटुंबातील लोकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
वसुमती योगाचा विशेष लाभ सिंह राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. याकाळात तुम्ही करिअरमध्ये वेगाने प्रगती कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवनव्या संधी उपलब्ध होतील. ज्यातून तुमची क्षमता लोकांसमोर येईल. महत्वाची जबाबदारी पदरात पडेल. व्यवसायिकांचा व्यवसाय विस्तारण्यास नव्या कल्पना सुचतील. त्याचा फायदा भविष्यात दिसून येईल. आज वसुमती योगात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल.
संबंधित बातम्या