Vastu Tips: पहिल्या मजल्यावरील घराची रचना वास्तूनुसार कशी असावी? जाणून घ्या, कोणते नियम पाळलेच पाहिजेत!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips: पहिल्या मजल्यावरील घराची रचना वास्तूनुसार कशी असावी? जाणून घ्या, कोणते नियम पाळलेच पाहिजेत!

Vastu Tips: पहिल्या मजल्यावरील घराची रचना वास्तूनुसार कशी असावी? जाणून घ्या, कोणते नियम पाळलेच पाहिजेत!

Nov 23, 2024 03:36 PM IST

Vastu Tips in Marathi : वास्तुशास्त्रात घर बांधताना वास्तुचे काही नियम पाळणे महत्वाचे मानले जाते. असे मानले जाते की घरात सुख-समृद्धीसाठी पहिल्या मजल्यावरील घर बांधताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे पाहिजे.

पहिल्या मजल्यावर बांधलेल्या घराचे वास्तू कसे असावे? जाणून घ्या, कोणते नियम पाळलेच पाहिजेत!
पहिल्या मजल्यावर बांधलेल्या घराचे वास्तू कसे असावे? जाणून घ्या, कोणते नियम पाळलेच पाहिजेत!

Vastu Tips for First Floor of the House : हिंदू धर्मात वास्तूचे नियम पाळणे अत्यंत अनिवार्य मानले जाते. असे मानले जाते की जर घराची वास्तु योग्य असेल तर जीवनात सुख-समृद्धी येते आणि धन आणि धान्याचा साठा भरलेला राहतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पहिल्या मजल्यावर घर बांधताना वास्तुतील काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. याचे कारण म्हणजे वास्तुमध्ये घराचा १ नंबरचा मजला शुभ मानला जातो. असे मानले जाते की, यामुळे घरात धन, वैभव आणि आनंद मिळतो. चला तर मग, जाणून घेऊ या घराच्या पहिल्या मजल्यावर घर बांधताना वास्तुचे कोणते नियम पाळले पाहिजेत?

पहिल्या मजल्याची उंची तळमजल्याहून जास्त नसावी!

वास्तुनुसार घराच्या पहिल्या मजल्यावर बांधलेल्या घराची उंची तळमजल्यापेक्षा जास्त असू नये. असे मानले जाते की जेव्हा खूप उंच मजला असतो तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा कायम रहावी यासाठी पहिला मजला हा तळमजल्याहून उंच नसेल याची काळजी घ्यावी.

पहिल्या मजल्याच्या नैऋत्य दिशेला बाल्कनी असू नये!

पहिल्या मजल्याच्या नैऋत्य दिशेला बाल्कनी असू नये. ती घराच्या कोपऱ्यापासून दूर असावी. उत्तर आणि पूर्व दिशेला बाल्कनी असलेली उत्तम.

इथे पावसाचे पाणी गोळा होणार नाही याची काळजी घ्या!

घराच्या पहिल्या मजल्यावरील उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला पावसाचे पाणी गोळा होता कामा नये याचे काळजी घ्यावी. 

उत्तर किंवा पूर्व बाजूचे टेरेस रिकामे ठेवावे!

पहिल्या मजल्याच्या नैऋत्य दिशेला बांधकाम केले पाहिजे. तर  फक्त उत्तर किंवा पूर्व बाजूचे टेरेस किंवा गच्ची रिकामी ठेवावी. बहुमजली इमारतींना मात्र हा नियम लागू होत नाही.

मजल्याचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा!

पहिल्या मजल्यावरील मजल्याचा उतार उत्तर व पूर्व दिशेला असेल अशी रचना करावी. 

खिडक्या व दरवाजे उत्तर व पूर्व दिशेला असावेत!

या मजल्यावरील खिडक्या व दरवाजे उत्तर व पूर्व दिशेला असावेत. त्याचबरोबर वायव्य दिशेला मोठी खिडकी शुभ मानली जाते. पहिल्या मजल्याचा मुख्य दरवाजा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner