Marathi Vastu Tips: वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूच्या मदतीने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास आणि नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. आपल्या घरात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तुनुसार काही उपाय करून पाहू शकता. मान्यतेनुसार, काही उपायांच्या मदतीने घरात देवी लक्ष्मीचा वास होतो. चला तर मग जाणून घेऊया, वास्तुशास्त्रानुसार घरात सुख-समृद्धी राखण्यासाठी काय करावे.
माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करावे?
तुळशीजींना रोज अर्घ्य द्या आणि सकाळ-संध्याकाळ तिच्यासमोर तुपाचा दिवा लावा. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याचबरोबर शुक्रवारी उपवास करून लक्ष्मीसूक्तम पाठ केल्यानेही आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
घरात असलेली घाण नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर अनावश्यक वस्तू साठवून ठेवू नका. घरात अडगळ तयार होत असते. आपल्या मोहापायी निरुपयोगी वस्तू आपण साठवत ठेवत जातो. कालांतराने तेथे घाण साचत जाते. त्यांमुळे घरात कुठेही जो काही कचरा तयार झालेला असेल तो आजच घराबाहेर काढा आणि घर स्वच्छ ठेवा. स्वच्छतेमुळे पावित्र्य निर्माण होते.
घरातील सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. तसेच शक्य असल्यास रोज सकाळी केळीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे आपल्या घरावरील आर्थिक संकट दूर होते, तसेच सतत भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.
घराच्या प्रवेशद्वारावर रोज संध्याकाळी दिवा लावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू शकेल. असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीचे आपल्या घरी आगमन होते.
धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की, संध्याकाळी देवी-देवता भ्रमण करण्यासाठी निघतात. सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार पडणार नाही याची काळजी घ्या. असे केल्याने घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. संध्याकाळच्या अंधाराचा घरातील सुख-समृद्धीवर वाईट परिणाम होतो.
Didclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.