वास्तु टिप्स : सनातन धर्मात तुळशीचे झाड अत्यंत पूजनीय मानले जाते. तुम्हाला बहुतांश घरांपुढे तुळशीचं वृंदावन दिसेल. हिंदू धर्मात तुळस खूप पवित्र मानली जाते, रोज तुळशीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात तुळशीचं विशेष स्थान आहे, त्यामुळे प्रत्येक पूजेत या पवित्र वनस्पतीची पानं वापरली जातात. इतकंच नाही तर तुळशीला विष्णुप्रिया असंही म्हणतात. ज्या घरात ही वनस्पती असते त्या घरात भगवान विष्णूंचा वास असतो. तुळशीचं पान भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्याच्या पदार्थांवर ठेवलं नाही तर ते नैवेद्य स्वीकारत नाहीत, अशीही एक मान्यता आहे.
असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप आहे त्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असते. घरातील नकारात्मकता दूर होऊन जीवनात धन, सुख-समृद्धी येते. यासोबतच कार्तिक महिन्यात घरात तुळशीचे रोप लावणे आणि त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, परंतु तुळशीचे रोप लावताना वास्तुतील काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. जाणून घेऊया तुळशीशी संबंधित वास्तु टिप्स...
वास्तुनुसार उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
त्याचबरोबर दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावणे टाळावे. यामुळे जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. असे केल्याने तुळस सुकून जाऊ शकते आणि भगवान विष्णू नाराज होऊन त्यांचा कोप होऊ शकतो.
तुळशीचे रोप हे उंच ठिकाणी ठेवावे. तुळशीच्या झाडाजवळ डस्टबिन, चप्पल, बूट आणि झाडू ठेवू नये.
आपण तुळशीचे रोप फुलांच्या झाडांजवळ ठेवू शकता, परंतु निवडुंग जवळ ठेवू नका. यामुळे घराची नकारात्मकता वाढू शकते.
तुळशीचं रोप कधीही जमिनीवर लावू नये, त्याऐवजी ते कुंडीत लावावं. तुळशीची लागवड करण्यासाठी सर्वात चांगली जागा अंगणाच्या मध्यभागी असलेली कुंडी किंवा वृंदावन आहे.
वाळलेले तुळशीचे रोप घरात ठेवू नका. त्यातून लवकर काढून नवीन रोप लावावे. त्याचबरोबर वाळलेल्या तुळशीच्या झाडाचे पवित्र नदीत किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जन करावे.
यासोबतच तुळशीची पाने किंवा तुळशीची डाळ शिवाला अर्पण करू नये.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे हि माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)