Marathi Vastu Tips: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुखसोयींनी परिपूर्ण जीवन जगण्याची इच्छा असते. लोक दिवसरात्र मेहनत करतात जेणेकरून त्यांची संपत्ती दिवसरात्र वाढू शकेल. पण अनेकदा काही लोकांसोबत मेहनत आणि प्रयत्न करूनही त्यांना ना करिअरग्रोथ मिळते, ना आर्थिक यश. मात्र, वास्तुशास्त्रानुसार यावर मात करता येते. वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने सामान्य जीवन चांगले चालते आणि आर्थिक लाभ होतो. जाणून घ्या वास्तुशास्त्र वास्तु तज्ज्ञ मुकुल रस्तोगी यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास व्यक्तीला त्याचा फायदा होतो असे वास्तुशास्त्रात मानले गेले आहे. पाहू या, आपले आयुष्य आनंदाने भरून जाण्यासाठी नेमके कोणते उपाय करणे आवश्यक आहे.
वास्तूशास्त्रात भरभराटीच्या दृष्टीने खिरीचे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यानुसार आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा खीर बनवून ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थानी ठेवून द्यावी. या खिरीचा वास्तुदेवाला भोग अर्पण करावा. त्यानंतर ती खीर खाऊन घ्यावी. असे केल्याने मोठा फायदा व्यक्तीला होतो असे वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे.
वास्तूशास्त्रात जायफळाचे देखील महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. आपल्या घरामध्ये थोडे संपूर्ण जायफळ नैर्ऋत्य दिशेला ठेवावे. असे केल्याने त्याचा लाभ मिळतो.
घरात सुखशांती आणि भरभराट यावी, जीवन सुखी आणि आनंदी व्हावे यासाठी वास्तुशास्त्रात दुधाचाही उपाय सांगितलेला आहे. त्यानुसार कच्च्या दुधात काळे तीळ टाकून ते दररोज शिवलिंगाला अर्पण करावे.
तुम्हाला रोज मंदिरात जाता येत नसेल तर मंदिराच्या माथ्यावर असलेल्या ध्वजाचे दर्शन करा.
बुधवारी दुपारी १२ ते १.३० या वेळेत कचरा काढावा. असे केल्याने अनेक अडथळे दूर होतात.
एखाद्याच्या उपचारासाठी किंवा औषधांसाठी देणगी देणे किंवा दान करणे.
घर किंवा दुकानाचा विस्तार पूर्व किंवा उत्तर दिशेला करणे नेहमीच शुभ असते. दक्षिण दिशेला विस्तार करणे टाळा. या दिशेने विस्तार केल्यास नुकसान होण्याची शक्यता वाढते.
घराचे स्वयंपाकघर पूर्व-ईशान्य दिशेला बांधू नये, त्यामुळे खूप भांडणे होतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.