Tips for Positivity: वास्तुदोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा, अडथळे, पैशाशी संबंधित समस्या आणि आजार होतात. अनेकदा वास्तुदोषांमुळे व्यक्तीला मेहनत करूनही यश मिळत नाही. वास्तुदोषामुळे कौटुंबिक वाद वगैरे ही होतात. घरातील सुख आणि आर्थिक प्रगतीसाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुतज्ज्ञ मुकुल रस्तोगी यांच्यानुसार वास्तुशास्त्रातील काही उपायांचा अवलंब केल्यास धनलाभ, जीवनात प्रगती आणि सुख-समृद्धी येते.
संध्याकाळी पूजा करताना तांब्याच्या भांड्यात गंगाजल भरून ठेवावे. पूजा पार पडल्यानंतर ते गंगाजल घरात शिंपडावे. असे करणे अत्यंत शुभ आणि पवित्र कार्य असल्याचे मानले गेले आहे.
इमारतीच्या किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा, अशोक आणि कडुनिंबाची पाने लावावीत. ही पाने अत्यंत शुभ मानली गेली आहेत.
हिंदू धर्मात हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. हळदीला अत्यंत शुभ मानले गेले आहे. पिवळ्या कापडात हळकुंड ( अख्खी हळद) बांधून उशीखाली ठेवावी आणि झोपी जावे. यामुळे सौभाग्यात वाढ होते, असे मानले गेले आहे.
मंगळवारी हनुमानजींना गूळ हरभऱ्याचा प्रसाद अर्पण करा आणि नंतर त्याचे वाटप करा.
मुख्य प्रवेशद्वाराच्या वर कोणतेही शौचालय बांधू नये.
घराच्या आग्नेय दिशेला डस्टबिन आणि झाडू ठेवू नये. येथे एक हिरवी वनस्पती लावा, ज्यात लाल फुले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार नैर्ऋत्यदिशेला विष्णूचा फोटो ठेवा. हे असे चित्र किंवा फोटो असावा, ज्यामध्ये लक्ष्मीमाता त्यांच्या चरणी आहेत.
घरातील स्वयंपाकघर अग्नीकोनात बनविणे शुभ असते. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने व्यवसायातही नफा होतो.
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारची घाणेरडी पाण्याचा पाईप ब्रह्मस्थानातून जाऊ नये.
घराच्या मंदिरात भगवान शिव, पार्वती माता आणि गणपती असा शिवपरिवाराचा फोटो ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या देव्हाऱ्यात असा फोटो लावल्यास आर्थिक जीवनात बरीच सुधारणा होण्याची शक्यता असते, असे वास्तूशास्त्रात म्हटलेले आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.