Marathi Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात काय करावे आणि काय करू नये, याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा आपल्या आर्थिक जीवनावरही प्रभाव पडतो. वास्तुदोष असल्यास आर्थिक अडचणीही येतात. वास्तुशास्त्रानुसार घरात गोष्टी योग्य पद्धतीने असणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील गोष्टी वास्तुशास्त्रानुसार नसतील तर वास्तुदोष असू शकतो, ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. वास्तूचे काही उपाय केल्याने जीवन सुख-संपत्तीने भरलेले असते. पाहू या वास्तुशास्त्रानुसार धनलाभासाठी काय करावे...
घराचा मुख्य दरवाजा हा केवळ बाहेर येण्याचा मार्ग नसून त्या मार्गाद्वारे घरातील सर्व प्रकारची ऊर्जाही घरात प्रवेश करते किंवा घराबाहेर पडते. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ असला पाहिजे. तसेच तो सजवलेला देखील असला पाहिजे. स्वच्छता आणि सजावटीमुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. त्याचा व्यक्तीच्या मनावर, विचारांवर प्रभाव पडत असतो.
घरात पैशांशी संबंधित कोणतीही समस्या येऊ नये असे वाटत असेल तर घराच्या भिंतींवर जांभळ्या रंगाचा रंग लावा. वास्तुशास्त्रानुसार जांभळा रंग हा धनाचे प्रतिनिधित्व करतो, असे मानले गेले आहे. कोणत्याही कारणाने तुम्हाला घरातील भिंतींना जांभळा रंग लावता येत नसेल तर घराच्या आत जांभळ्या रंगाच्या भांड्यात मनी प्लांट लावा. त्याचाही सकारात्मक परिणाम होऊन तुमची पैशांबाबतची समस्या निघून जाते.
आपण आपल्या घरातील तिजोरीत किंवा कपाटात पैसे ठेवत असतो. मात्र या संदर्भात वास्तूशास्त्रात सांगितलेला उपाय नक्की करून पाहा. या उपायानुसार ज्या तिजोरीत किंवा कपाटात तुम्ही रोख रक्कम किंवा दागिने ठेवता, त्या तिजोरी किंवा कपाटाच्या समोरच आरसा लावा. हा असा आरसा लावा की त्या आरशात तुमच्या तिजोरीचे किंवा कपाटातील खणाचे प्रतिबिंब दिसू शकेल. वास्तुशास्त्रानुसार आरशात दिसणारे तुमच्या तिजोरीचे किंवा कपाटातील खणाचे प्रतिबिंब तुमची आर्थिक स्थिती आणखी चांगली बनवेल. यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.