Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा या ५ गोष्टी; नकारात्मकता दूर होईल, मिळेल धन, प्रेम, आनंद
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा या ५ गोष्टी; नकारात्मकता दूर होईल, मिळेल धन, प्रेम, आनंद

Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा या ५ गोष्टी; नकारात्मकता दूर होईल, मिळेल धन, प्रेम, आनंद

Dec 29, 2024 08:10 PM IST

Marathi Vastu Tips: वास्तूनुसार जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढविण्यासाठी, वाईट आणि भीतीदायक स्वप्नांपासून सुटका मिळवण्यासाठी काही गोष्टी उशीखाली ठेवणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते.

झोपताना उशीखाली ठेवा या ५ गोष्टी; नकारात्मकता दूर होईल,  मिळेल धन, प्रेम, आनंद
झोपताना उशीखाली ठेवा या ५ गोष्टी; नकारात्मकता दूर होईल, मिळेल धन, प्रेम, आनंद

Vastu Tips in Marathi: वास्तुशास्त्रात सकारात्मकता आणि चांगले आरोग्य वाढविण्यासाठी लवंग, मोरपंख, तुरटी अशा काही गोष्टी उशीखाली ठेवणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की या गोष्टी उशीखाली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि सुख आणि सौभाग्य वाढते. वास्तूनुसार या गोष्टी रोज उशीखाली ठेवल्याने तुमच्या आयुष्यात अनेक बदल होऊ शकतात. आपल्याला हवे तसे परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊ या उशीखाली कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

वास्तू टिप्स : उशीखाली काय ठेवावे?

मोरपंख

हिंदू धर्मात मोरपंख अत्यंत शुभ मानले जातात. मोरपंखांचा उपयोग प्रेम आणि आनंद आकर्षित करण्यासाठी केला जातो, असे मानले जाते. वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि धन आकर्षित करण्यासाठी उशीखाली मोरपंख ठेवून झोपता येते.

लवंग

आपण दररोज उशीखाली ५,७ किंवा ९ लवंगा ठेवून झोपू शकता. रोज सकाळी त्या लवंगा पाण्यात सोडून द्या. असे केल्याने नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मानले जाते.

तमालपत्र

वास्तुशास्त्रात उशीखाली तमालपत्र ठेवणे सुख-समृद्धीचा कारक मानले गेले आहे. असे मानले जाते की उशीखाली तमालपत्र ठेवून झोपल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.

तुरटी

वास्तुमध्ये वाईट शक्ती आणि भीतीदायक स्वप्नांपासून संरक्षणासाठी उशीखाली तुरटी ठेवणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की तुरटीचा तुकडा उशीखाली कमीतकमी ७ दिवस ठेवल्यास दुःस्वप्नांसह सर्व नकारात्मकता दूर होते. यानंतर तुरटी घराबाहेर फेकून द्या.

तुळशीचे पान

हिंदू धर्मात तुळशीच्या पानाचा वापर पूजेसाठी केला जातो. याशिवाय तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्मही आढळतात. असे मानले जाते की झोपताना उशीखाली तुळशीचे पान ठेवल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते. मात्र सूर्यास्तानंतर तुळशीचे पान तोडणे टाळावे. सकाळी फोडून उशीखाली ठेवावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner