Vastu Tips for Drawing Room: वास्तुशास्त्रानुसार घर बांधले जाते. मात्र, अनेकदा कळत-नकळत चुकीच्या दिशेने घर किंवा खोली बांधले जाते. या चुकीमुळे वास्तुदोषाचा प्रभाव कायम राहतो. घराचा मध्यबिंदू दिवाणखाना मानला जातो. घरातील दिवाणखान्यात सकारात्मक ऊर्जा राखणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ पाहुणेच नव्हे, तर घरातील सदस्यही दिवाणखान्याचा वापर करतात. खरे तर घरातील सदस्य सर्वात जास्त वेळ दिवाणखान्यातच घालवतात. दिवाणखान्यातच टिव्ही असतो. त्यामुळे मनोरंजनाचा वेळ इथेच जात असतो. त्याच प्रमाणे गप्पागोष्टी करणे, पाहुण्यांशी बोलणे, विचारविनिमय करणे, विणणे, पेंटिंग किंवा कोणतेही काम बहुधा इथेच बसून केले जाते. जाणून घेऊ या दिवाणखान्याबाबत वास्तूशास्त्र काय सांगते. हा दिवाणखाना नेमका घरात कोणत्या दिशेला असावा याबाबत वास्तूशास्त्राने काय सांगितले आहे ते जाणून घेणे गरजेते आहे. तेव्हा पाहू या दिवाणखान्याशी संबंधित काही वास्तू टिप्स-
वास्तुशास्त्रात दिवाणखान्याच्या दिशेला विशेष असे महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात ईशान्य किंवा वायव्य दिशेला आपल्या घराचा दिवाणखाना असणे किंवा बांधणे शुभ मानले जाते.
१. दिवाणखाना अशा प्रकारे बांधावा की खोलीत सूर्यप्रकाश येत राहील. खोलीत जितका नैसर्गिक प्रकाश येईल तेवढाच तो शुभ असेल.
२- सोफा वगैरे दिवाणखान्याच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.
३. हलके फर्निचर उत्तर व पूर्व दिशेला ठेवावे.
४. दिवाणखान्याचा ईशान्येकडील कोन शक्य तितका रिकामा किंवा अतिशय हलका असावा, म्हणजेच या दिशेला जास्त सामान ठेवू नये.
५. दिवाणखान्यामध्ये पूर्व आणि उत्तर दिशेला खिडक्या असणे आवश्यक आहे.
६- दिवाणखान्याच्या भिंती हलक्या रंगाने रंगवणे चांगले मानले जाते.
७- दिवाणखान्यात सेंटर टेबलवर क्रिस्टल कमळ ठेवणे शुभ असते.
८- दिवाणखान्याचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे अतिशय शुभ मानले जाते.
९- त्याचबरोबर ड्रॉइंग रुमच्या आत उत्तर किंवा पूर्व दिशेला खिडक्या असणे अत्यंत शुभ मानले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या