Vastu Tips In Marathi : अनेकदा बरेच प्रयत्न करूनही घरात अशांततेचे वातावरण असते. घरातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर दुरावा निर्माण झालेला असतो. असे मानले जाते की जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा घरातील सदस्यांमध्ये ही दुरावा निर्माण होतो. जर तुम्हीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील हाेणाऱ्या कलहाने त्रस्त झालेले असाल तर तुम्ही काही वास्तुशास्त्रात दिलेले उपाय करून पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया वास्तुचे असे काही उपाय, जे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्याबरोबरच सुख-शांती राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
घराचा ईशान्य कोपरा : वास्तुनुसार ईशान्य दिशेला ईशान्य कोन म्हणतात. घराचा ईशान्येकडील कोपरा नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवावा. घराचा ईशान्येकडील कोपरा स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो.
बुद्धाची मूर्ती : घरातील कलह आणि भांडणाचे वातावरण कमी करण्यासाठी भगवान बुद्धांची मूर्ती ठेवा. भगवान बुद्धांची मूर्ती घरातील बैठक खाेली किंवा बाल्कनीमध्ये ठेऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरात भगवान बुद्धांची मूर्ती ठेवल्याने घरात शांतता राहते.
सकाळी पाण्यामध्ये हळद मिसळून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे आणि स्वस्तिक बनवावे. यासोबतच सकाळ संध्याकाळ मुख्य गेटवर दिवा लावावा. नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरामध्ये गंगाजल शिंपडू शकता.
सेंधा मीठाचा वापर : सेंधा मीठाचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करता येते. वास्तुशास्त्रानुसार मीठाच्या वापराने नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते, म्हणून सेंधा मीठाचा तुकडा आपल्या घराच्या किंवा खोलीच्या सर्व कोपऱ्यात ठेवा. १ महिन्यानंतर मीठ बदलून नवीन तुकडा प्रत्येक कोपऱ्यात ठेवा.
दिशा लक्षात ठेवा : अनेकवेळा वास्तुदोषामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि भांडणे होतात. त्यामुळे घराच्या ईशान्य कोपऱ्यात कधीही शौचालय बांधू नका, हे लक्षात ठेवा. तसेच घराच्या आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असणे खुपच शुभ मानले जाते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे, हि माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)