Vastu Tips: वास्तूनुसार तुमचे स्वयंपाकघर कसे असावे? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips: वास्तूनुसार तुमचे स्वयंपाकघर कसे असावे? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!

Vastu Tips: वास्तूनुसार तुमचे स्वयंपाकघर कसे असावे? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!

Dec 07, 2024 10:29 PM IST

Vastu Tips in Marathi: स्वयंपाकघर बनवण्याआधी आपण वास्तुशास्त्राची काळजी घेतली पाहिजे. आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे पवित्र स्थान आहे. घरातील पूजास्थळानंतर स्वयंपाकघर हे दुसरे सर्वात पवित्र स्थान मानले जाते.

वास्तूनुसार तुमचे स्वयंपाकघर कसे असावे? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!
वास्तूनुसार तुमचे स्वयंपाकघर कसे असावे? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!

Marathi Vastu Tips: स्वयंपाकघर बनवण्यापूर्वी आपण वास्तुशास्त्र ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, त्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे पवित्र स्थान आहे. घरातील पूजास्थळ ही घरातील अत्यंत पवित्र जागा असते. मात्र पूजास्थळानंतर जर घरात कोणती पवित्र जागा असेल तर ती जागा म्हणजे स्वयंपाकघर. वास्तूशास्त्रानुसार जर आपल्या घरातील आपले स्वयंपाकघर तयार केलेले असेल, किंवा योग्य दिशेला असेल तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि कुटुंबात सुख, समृद्धी, आनंद, भरभराट आणि उत्तम आरोग्य राहते. स्वयंपाकघर बनवण्याआधी आपण वास्तुशास्त्रात काय सांगितले गेले आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणए काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ या, वास्तुशास्त्रानुसार तुमचे स्वयंपाकघर कसे असावे.

किचनची दिशा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे यासा विशेष महत्त्वा आहे. वास्तूशास्त्रानुसार आपले स्वयंपाकघर हे आपल्या घराच्या आग्नेय दिशेला असावे. या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ मानले जाते. अग्नेय दिशेव्यतिरिक्त तुम्ही घराच्या वायव्य दिशेला स्वयंपाकघरही बांधू शकता.

शेगडी

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील शेगडी आग्नेय दिशेला असावी. स्वयंपाक करणारी व्यक्ती नेहमी पूर्व दिशेला मुख करून उभी राहील अशी असावी.

शेगडी आणि सिंकमधील अंतर

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आणि सिंक एकत्र जवळ असू नये. जर तुम्ही तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला ठेवले असेल तर सिंक वायव्य दिशेला बांधावे.

कपाट

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी पश्चिमेकडील भिंतीवर कपाट तयार करावे आणि उत्तर, पूर्व भिंत रिकामी ठेवावी. यामुळे स्वयंपाकघर सुंदर आणि आकर्षक दिसेल.

इलेक्ट्रिक सामान या दिशेला ठेवा

वास्तुशास्त्रानुसार इलेक्ट्रिक वस्तू, मायक्रोवेव्ह, फ्रिज, मिक्सर असे कोणतेही उपकरण असेल तर ते सर्व दक्षिण दिशेला ठेवावे.

स्वयंपाकघरात एक खिडकी असावी

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात सूर्यप्रकाश पडायला हवा. त्यासाठी स्वयंपाकघरात खिडकी असणे अत्यंत गरजेचे आहे. खिडकी पूर्व दिशेला उघडावी. जेणेकरून सूर्याची किरणे सकाळी थेट स्वयंपाकघरात येऊ शकतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner