Vastu Tips : खिशात पैसा टिकत नाही? तुमच्या पाकीटातही ठेवा या गोष्टी; लक्ष्मी राहील प्रसन्न, होईल धनलाभ
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips : खिशात पैसा टिकत नाही? तुमच्या पाकीटातही ठेवा या गोष्टी; लक्ष्मी राहील प्रसन्न, होईल धनलाभ

Vastu Tips : खिशात पैसा टिकत नाही? तुमच्या पाकीटातही ठेवा या गोष्टी; लक्ष्मी राहील प्रसन्न, होईल धनलाभ

Nov 17, 2024 12:08 PM IST

Vastu Tips For Wallet And Purse In Marathi : काही लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे वास्तू दोष. त्यामुळे कोणतीही वस्तू पर्समध्ये ठेवण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. जाणून घ्या कोणत्या वस्तू पर्समध्ये ठेवाव्या आणि कोणत्या वस्तू ठेऊ नये.

वास्तू टिप्स
वास्तू टिप्स

प्रत्येक व्यक्तीला आपली पर्स पैशांनी भरलेली असावी असे वाटते. जेणेकरून त्याला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, परंतु काही लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे वास्तू दोष.

कुठेही बाहेर जाण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ पर्स नक्कीच ठेवतो. स्त्री असो वा पुरुष, दोघांनाही पैशांसाठी पर्स सोबत ठेवावी लागते. छोट्या-छोट्या गोष्टी हाताळण्यात पर्सचा मोठा वाटा असतो, पण कधी-कधी काही लोक पर्समध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवतात आणि कधी-कधी कळत-नकळत अशा वस्तूही ठेवतात ज्यांची गरजही नसते. त्यामुळे कोणतीही वस्तू पर्समध्ये ठेवण्यापूर्वी वास्तूचे नियम पाळले पाहिजेत. जाणून घ्या कोणत्या वस्तू पर्समध्ये ठेवाव्या आणि कोणत्या वस्तू ठेऊ नये.

जुनी बिले

काही लोकांना खरेदी केल्यानंतर बिल पर्समध्ये ठेवण्याची सवय असते, परंतु वास्तुशास्त्रात असे करणे चुकीचे मानले जाते. कोणतेही बिल जास्त वेळ पर्समध्ये ठेवू नये. अशा स्थितीत देवी लक्ष्मी कोपते आणि व्यक्तीच्या पर्समध्ये पैसा कधीच टिकत नाही.

श्री यंत्र 

श्री यंत्र हे माता लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. असे मानले जाते की, पर्समध्ये श्री यंत्र ठेवल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. श्रीयंत्राच्या या उपायाने आर्थिक प्रगतीही होते असे सांगितले जाते. याशिवाय देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत राहतो.

लक्ष्मीचा फोटो

हिंदू धर्मग्रंथांमध्ये, माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून स्वीकारले गेले आहे. असे मानले जाते की, देवी लक्ष्मीच्या कृपेशिवाय जीवनात आर्थिक स्थिती चांगली असू शकत नाही. अशा वेळी पर्समध्ये देवी लक्ष्मीचे छोटे चित्र ठेवल्याने आर्थिक समृद्धी येते. याशिवाय कर्जातूनही सुटका होते.

अक्षदा

यज्ञ, धार्मिक विधी किंवा देवाला अर्पण करताना आपल्याजवळ आलेल्या अक्षदा पर्समध्ये ठेवल्यास देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. मान्यतेनुसार, हे करण्यापूर्वी तांदळाचे २१ दाणे घेऊन देवी लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर, ते एखाद्या वस्तूला बांधा आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवा. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करते.

पिंपळाचे पान

सनातन धर्माच्या मान्यतेनुसार देव पिंपळाच्या पानात वास करतात. यामुळे लोक पिंपळाला पाणी अर्पण करतात त्याची पूजा करतात. एक पिंपळाचे पान घेऊन ते गंगाजलाने शुद्ध करून पर्समध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते असे म्हणतात. तसेच देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

नोटा आणि नाणी ठेवताना घ्या ही काळजी

नोटा नेहमी पर्समध्ये उघड्या ठेवा. नोट कधीही दुमडून ठेवू नका. नोट दुमडून ठेवल्याने वास्तू दोष निर्माण होतात आणि व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

याशिवाय नोटा आणि नाणी कधीही पर्समध्ये एकत्र ठेवू नयेत. नाणी पाकीटाच्या वेगळ्या खात्यात ठेवावीत आणि नोटा वेगळ्या खात्यात ठेवाव्यात.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner