Marathi Vastu Tips for Plants: घरातील प्रत्येकाला झाडे लावायला आवडतात. झाडे लावणे हा अनेकांचा छंदही असतो. वनस्पती किंवा झाडे घरात ताजेपणा आणतात आणि घराचे सौंदर्य देखील वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार घरात रोपे लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात रोपे लावल्याने सुख, शांती टिकून राहते आणि विविध प्रकारच्या समस्या देखील दूर राहतात. वास्तुशास्त्रानुसार घरात रोपे लावताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे काम झाडे करतात, असे वास्तूशास्त्र सांगते. चला तर मग, वास्तूशास्त्रानुसार घरात रोपे लावण्याबाबत काय आहेत वास्तू टिप्स…
वास्तुशास्त्रानुसार घरात रोपे लावण्यासाठी काही दिशा अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत. त्यानुसार घरामध्ये सोपे लावण्याच्या दृष्टीने उत्तर आणि पूर्व दिशा अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत. या दिशेला झाडे लावली तर तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
वास्तुशास्त्रानुसार घरात रोपे लावण्याबाबत काही दिशा अशुभ मानल्या गेल्या आहेत. यानुसार कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला रोपे लावू नयेत. या दिशेला रोपे लावली तर नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण मिळते, असे वास्तूशास्त्र सांगते.
वास्तुशास्त्रानुसार जर उत्तर दिशेला रोपे लावली तर ती तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी आणतात आणि करिअरमध्ये प्रगती साधण्यास मदत करतात. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला कधीही काटेरी वनस्पती लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे. उत्तर दिशेला लावलेल्या तुळशीच्या रोपांमुळे घरात सुख-समृद्धी येते.
जर तुम्ही तुमच्या घरात लाल किंवा गुलाबी रंगाच्या फुलांचे रोप लावण्याचा विचार करत असाल तर अशा रोपांसाठीही दिशेचा विचार करण्यात आलेला आहे. वास्तुशास्त्रानुसार लाल किंवा गुलाब रंगाच्या फुलांचे रोप आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला लावावे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.