Vastu Tips: या ४ गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष द्या, सावधगिरी बाळगा!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips: या ४ गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष द्या, सावधगिरी बाळगा!

Vastu Tips: या ४ गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष द्या, सावधगिरी बाळगा!

Dec 02, 2024 09:32 PM IST

Home Vastu Tips: प्रेम असो, करिअर असो किंवा मग आरोग्य, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा अवलंब करून घरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

या ४ गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष द्या, सावधगिरी बाळगा!
या ४ गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष द्या, सावधगिरी बाळगा!

Vastu Tips for Home in Marathi: जर घराचे वास्तुशास्त्र चांगले नसेल तर त्याचा परिणाम घरातील व्यक्तींच्या जीवनावरही दिसून येतो. घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर सुख-समृद्धीही घरामध्ये कायम टिकून राहते. प्रेमाचा विषय असो, करिअर असो किंवा आरोग्याचा विषय असो, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले गेले आहेत, ज्यांचा अवलंब केल्यास घरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवण्यास मदत होते.. चला तर मग जाणून घेऊ या, वास्तुशास्त्रानुसार घरात काय ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, किंवा काय करू नये म्हणजे नकारात्मक ऊर्जा वाढणार नाही...

घरातील या ४ गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते

बंद घड्याळ

घरात कधीही बंद घड्याळ लावू नका. असे मानले जाते की बंद घड्याळाकडे पाहिलामुळे, विशेषत: सकाळी उठल्यानंतर बंद घड्याळाकडे पाहिल्यानंतर आपल्या नशिबाचा दरवाजा देखील बंद होऊ शकतो हे लक्षात असू द्या. या बरोबरच  घराच्या कोणत्याही कोपऱ्यात बंद घड्याळ ठेवणे शुभ मानले जात नाही. त्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते.

बूट आणि चप्पल

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूट आणि चप्पल ठेवल्याचे आपण नेहमी पाहतो. मात्र हे कायम लक्षात ठेवा की, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कधीही बूट किंवा चप्पल ठेवू नयेत. त्याचबरोबर बूट आणि चप्पल नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला पायातून काढून ठेवायला हव्यात. असे न केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

कोमेजलेली झाडे

घरात कोमेजलेली झाडे ठेवणे शुभ मानले जात नाही. त्याचबरोबर वाळलेली काटेरी झाडे देखील घरात ठेवू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.

फोटो

बहुतेक लोक आपल्या घराला एस्थेटिक लुक देण्यासाठी विविध प्रकारचे फोटो लावतात. मात्र हे फोटो लावत असताना या गोष्टीचे नक्की भान ठेवाल की तुटलेले फोटो किंवा फाटलेले चित्र घरात अजिबात ठेवू नये. यामुळे कुटुंबात कलह आणि क्लेशाचे वातावरण निर्माण होते. तसेच घरात युद्धाचे चित्र लावल्यास घरातील लोकांमध्ये भांडण वाढू शकते. त्याचबरोबर उदास चेहऱ्याचे चित्र देखील घरात लावू नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner