वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे. याचा उल्लेख अनेक वास्तु ग्रंथात आढळतो. भवन भास्कर आणि विश्वकर्मा प्रकाशासह इतर ग्रंथांमध्येही आढळते. वास्तूनुसार आदर्श घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा. तुमच्या घराचा उतार पूर्व, उत्तर किंवा पूर्व-ईशान्य दिशेला असेल तर ते शुभ मानले जाते. अशा प्रकारे वास्तूनुसार घरातील खोल्या, हॉल, स्वयंपाकघर, स्नानगृह आणि शयनकक्ष एका विशिष्ट दिशेला असावेत. त्यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात.
पूर्व दिशा : पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा, या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात. घराचे मुख्य गेट या दिशेला असेल तर ते खूप चांगले असते. आपण खिडकी देखील ठेवू शकता.
पश्चिम दिशा : तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशेला असावे. स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ नसावेत हेही लक्षात ठेवा.
उत्तर दिशा : या दिशेला घरात जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत. घराची बाल्कनी आणि वॉश बेसिनही याच दिशेने असावे. मुख्य दरवाजा या दिशेला असेल तर उत्तम.
दक्षिण दिशा : दक्षिण दिशेला शौचालय असू नये. घरातील जड वस्तू या ठिकाणी ठेवा. या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे घरातील अडचणी वाढतात.
उत्तर-पूर्व दिशा : याला ईशान्य दिशा असेही म्हणतात. ही दिशा म्हणजे पाण्याचे ठिकाण. या दिशेला देवघर, स्विमींग पूल इत्यादी असावेत. या दिशेने मुख्य गेट असणे खूप चांगले आहे.
उत्तर-पश्चिम दिशा : याला वायव्य दिशा देखील म्हणतात. तुमचे शयनकक्ष, वाहने लावण्याची जागा, गोठ्याची जागा या दिशेला असावी.
दक्षिण-पूर्व दिशा : याला घराचा आग्नेय कोपरा म्हणतात. ही अग्नि तत्वाची दिशा आहे. गॅस, पाण्याचा बंब यांसारखे अग्निशी संबंधीत वस्तू या दिशेला असावेत.
दक्षिण-पश्चिम दिशा : या दिशेला नैऋत्य दिशा म्हणतात. या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत. घराच्या प्रमुखाची खोली येथे बनवता येते. या दिशेला तुम्ही कपाट, तिजोरी इत्यादी ठेवू शकता.
घराचे अंगण : घरामध्ये अंगण नसेल तर घर अपूर्ण राहते. घर लहान असले तरी समोर आणि मागे अंगण असावे. तुळशी, डाळिंब, पेरू, कडुलिंब, आवळा यांंसह अंगणात सकारात्मक ऊर्जा देणारी फुलांची रोपे लावा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)