Vastu Tips : घराच्या कोणत्या खोलीत कोणत्या रंगाचे लाईट असावेत? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips : घराच्या कोणत्या खोलीत कोणत्या रंगाचे लाईट असावेत? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार

Vastu Tips : घराच्या कोणत्या खोलीत कोणत्या रंगाचे लाईट असावेत? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार

Dec 01, 2024 10:29 AM IST

Vastu Tips For Home Lights In Marathi : जीवनात सकारात्मकता वाढवण्यासाठी वास्तुचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. वास्तुच्या नियमांनुसार घरातील प्रत्येक खोलीत लाईटाचा रंग आणि दिशा यांची विशेष काळजी घ्यावी.

वास्तू टिप्स
वास्तू टिप्स

Vastu Tips For Home Lights In Marathi : प्रत्येक जण आपलं स्वप्नाचं नवीन घर बांधतान वास्तू नियमांचा विचार करतात. आपल्या स्वत:च्या घरात असो वा भाड्याच्या घरात आपण कोणतिही वस्तू ठेवताना किंवा लावताना वास्तुशास्त्राचा, योग्य दिशेचा विचार करतो. जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासाठी वास्तुमध्ये अनेक उपाय आणि नियम सांगण्यात आले आहेत. सुखी आणि आनंदी जीवनासाठी वास्तुच्या नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे मानले जाते. 

वास्तुशास्त्रात किचन, बेडरूम, वॉशरूम, ड्रॉइंग रूम आणि त्याच्या सजावटीसह घरातील सर्व खोल्यांबाबत अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, वास्तुशी संबंधित काही चुकांचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. वास्तूनुसार घरात पुरेशा प्रमाणात प्रकाश असणे आवश्यक आहे. प्रकाशाचा अभाव असेल तर प्रगतीत अडथळा निर्माण होतो आणि घरात तणावाची परिस्थिती निर्माण होते.

वास्तुमध्ये घरातील प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगांचे लाईट वापरण्याचाही सल्ला दिला आहे. असे मानले जाते की, यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खूप शुभ फळ मिळते. चला तर मग जाणून घेऊया घराच्या कोणत्या खोलीत कोणत्या रंगाचा लाईट असावा?

घरातील मुख्य व्यक्तिच्या खोलीतील लाईटाचा रंग

वास्तु सल्लागार आचार्य मुकुल रस्तोगी यांच्यानुसार, घरात लाईटच्या रंगांना खूप महत्त्व आहे. जर घराच्या मुख्य व्यक्तिची बेडरूम नैऋत्य दिशेला असेल तर तेथे पिवळा लाईट लावणे शुभ मानले जाते.

स्वयंपाकघरातील लाईटाचा रंग

आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असेल तर तेथे पांढऱ्या लाईटाचा वापर करावा. त्याचबरोबर घराच्या मध्यभागी म्हणजेच ब्रह्मस्थानात पिवळा लाईट लावणे शुभ मानले जाते. वास्तुनुसार घराच्या वायव्य दिशेला पांढरा लाईट लावावा.

वासूनुसार देवघरातील लाईटाचा रंग

वास्तुनुसार देवघरात रंगीत दिवे लावता येतात. परंतू, घराच्या इतर भागात रंगीत लाईट लावू नका. असे म्हणतात की यामुळे मन अस्वस्थ राहते.

हॉल किंवा ड्रॉइंग रूममधील लाईटाचा रंग

वास्तुनियमांनुसार ड्रॉइंग रूमच्या पश्चिम दिशेला दिवे लावू नयेत. हॉल किंवा ड्रॉइंग रूममध्ये तुम्ही उत्तर दिशेला पांढऱ्या रंगाचा लाईट लावू शकता.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner