Vastu Tips: सूर्यास्तानंतर ही कामे कधीही करू नका, घरात येईल दारिद्र्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips: सूर्यास्तानंतर ही कामे कधीही करू नका, घरात येईल दारिद्र्य!

Vastu Tips: सूर्यास्तानंतर ही कामे कधीही करू नका, घरात येईल दारिद्र्य!

Nov 20, 2024 11:53 AM IST

Vastu Tips for home in Marathi:वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर घरात काही कामे चुकूनही करायची नसतात. ही कामे केल्याने घरात दारिद्र्य येते आणि आपल्या जीवनात विविध प्रकारची दु:खे निर्माण होतात.

सूर्यास्तानंतर ही कामे कधीही करू नका, घरात येईल दारिद्र्य!
सूर्यास्तानंतर ही कामे कधीही करू नका, घरात येईल दारिद्र्य!

Vastu Tips for home in Marathi:वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर घरात काही कामे चुकूनही करायची नसतात. ही कामे केल्याने घरात दारिद्र्य येते आणि आपल्या जीवनात विविध प्रकारची दु:खे निर्माण होतात.

Marathi Vastu Tips for home:

हिंदू धर्मात सूर्याच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. दररोज सूर्याला अर्ध्य देणे देखील शुभ मानले जाते. सूर्यदेवाचा अशा प्रकारे उपासना केल्याने जातकाला तो करत असलेल्या सर्व कार्यात सफलता मिळते अशी मान्यता आहे. मात्र अशी कार्ये ही सूर्यास्तानंतर करायची नसतात. काही कामे सूर्यास्तानंतर केल्यास जातकाला समस्यांना तोंड द्यावे लागते. दु:खांचा सामना करावा लागतो. अशी कोणती कामे आहेत जी सूर्यास्तानंतर करता कामा नये, पाहू या...

सूर्यास्तानंतर नखे, केस, दाढी कापू नये!

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर नखे, केस, दाढी इत्यादी कापू नयेत. सूर्यास्तानंतर ही कामे केल्याने व्यक्तीवर नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडतो. यामुळे व्यक्तीला जीवनात कर्जाला तोंड द्यावे लागू शकते.

कपडे धुवू नयेत!

सूर्यास्तानंतर कपडे धुवून वाळवू नयेत, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. याचे कारण सूर्यास्तानंतर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि ती कपड्यांमध्ये प्रवेश करते. यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

तुळशीची पाने तोडू नका!

तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. तुळशीची पूजा केल्याने साधकाला जीवनात यश मिळते असे मानले जाते. तुळशीच्या पानांचा नैवेद्यात समावेश आहे. अशा या तुळशीची पाने सूर्यास्तानंतर तोडू नका. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडल्याने धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते. यामुळे घरात गरीबी येऊ शकते.

सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये!

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात राहत नाही. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. या कारणास्तव संध्याकाळी झाडू मारण्यास मनाई करण्यात आली आहे.

सूर्यास्तानंतर या गोष्टी दान करू नका!

याशिवाय सूर्यास्तानंतर काही वस्तूंचे दान करू नये, असे म्हटले गेले आहे. या गोष्टींमध्ये पैसे, दही, मीठ आणि हळद अशा गोष्टींचा समावेश आहे. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर या वस्तूंचे दान केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि व्यक्तीला जीवनात पैशाची कमतरता येते.

सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करू नका!

गरुण पुराणानुसार सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार करण्यास मनाई आहे. असे केल्याने आत्म्याला पुढील लोकात अनेक संकटांना सामोरे जावे लागते, अशी मान्यता आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner