Vastu Tips : तुमच्या घरात आहेत का 'या' नकारात्मकता पसरवणाऱ्या गोष्टी?, असल्यास आत्ताच काढा बाहेर
Vastu Shastra : अनेकदा वास्तुदोषाचा परिणाम त्या व्यक्तीच्या प्रगतीवर होतो सतत काही ना काही कारणाने ही व्यक्ती किंवा कुटुंबातली एखादी व्यक्ती सतत आजारी राहाते. वास्तुदोष वैवाहिक जीवनावरही थेट परिणाम करतो आणि वैवाहिक जीवनही नकारात्मकतेने भरून टाकतो
वास्तुशास्त्रानुसार घरातच असलेल्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा निर्माण होते. ज्याचा चांगला किंवा वाईट परिणाम घरातल्या सदस्यांवर होत असतो. अनेकदा घरातील वास्तुदोषाचा थेट परिणाम त्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. कधीकधी हा परिणाम त्या घरातल्या प्रत्येक सदस्यावर झालेला पाहायला मिळतो.
ट्रेंडिंग न्यूज
घरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांच्यामुळे घरात नकारात्मकता येते. या गोष्टींकडे आपण सतत दुर्लक्ष करत असतो. परंतू हीच नकारात्मक उर्जा घरात वारंवार भांडणं लावते. आज घरात असणाऱ्या याच नकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत हे आपण पाहाणार आहोत. या गोष्टींना आजच घराबाहेर काढा.
घरात नकारात्मक उर्जा पसरवणाऱ्या गोष्टी कोणत्या?
बंद पडलेलं घड्याळ
घरात जास्त वेळेपासून बंद असलेलं घड्याळ ठेवू नका. वास्तुनुसार घरात बंद घड्याळ ठेवल्यास नकारात्मक उर्जा वाढते. घड्याळ थाबणे याचा अर्थ वेळ थांबणे असाही घेतला जातो. वेळ थांबणे हे अत्यंत नकारात्मक मानलं गेलं आहे. त्यामुळे असं घड्याळ ताबडतोब बाहेर काढा.
तुटलेल्या किंवा भंग पावलेल्या काचा
घरात तुटलेल्या किंवा भंग पावलेल्या काचा असतील तर त्या ताबडतोब घराबाहेर काढाव्यात. ही गोष्ट घरात गरीबी येणार असल्याचे संकेत देते. त्यामुळे घरात अशा काचा ठेवू नका.
सुखलेली फुलं
सुखलेली फुलं म्हणजे मृत्यू पावलेली फुलं. अशात ही गोष्ट घरात नकारात्मक उर्जा आणू शकते. त्यामुळे घरात सुकलेली फुलं असल्यास त्यांना ताबडतोब घराबाहेर काढलं पाहिजे.
जुनं कॅलेंडर
नवं वर्ष येताच जुनं झालेलं कॅलेंडर घरातून बाहेर काढलं पाहिजे. जुनं कॅलेंडर भूतकाळ दर्शवतं. जुन्या उर्जेला मागे सोडून आपण नव्या उर्जेला कायम धारण केलं पाहिजे.
काटेरी झाडं
घरात कॅक्टससारखी काटेरी झाडं लावू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता पसरते.
रिकामी खुर्ची
घरात कायमस्वरूपी रिकामी खुर्ची असल्यास ते शुभ संकेत मानला जात नाही. कायमस्वरूपी रिकामी खुर्ची हानिकारक आत्म्यांना आमंत्रित करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
विभाग