प्रत्येक घराचं आपलं असं एक 'अर्थ' कारण असतं. दर महिन्याचे खर्च असतात,त्यावर घराचं अर्थकारण चालत असतं. त्यातून पै पै जोडून ती शिल्लक टाकली जाते आणि त्याचा उपयोग घरात नव्या गोष्टीच्या खरेदीला, लग्नकार्याला किंवा आजारपणाला केला जातो. मात्र काही घरं अशी असतात जिथ माता लक्ष्मी नेहमीचच रूष्ट असलेली पाहायला मिळते. मग त्या घराचं 'अर्थ' कारण काही केल्या रुळावर येत नाही. अशात काय करावं या चिंतेनं ग्रासलेले त्या घरातले सदस्य पाहायला मिळतात.
मात्र वास्तुशास्त्रात लक्ष्मीचा आशिर्वाद मिळवण्याचे काही अगदी सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरावर आपला आशिर्वादाचा हात ठेवते. मग हे अत्यंत सोपे वास्तु उपाय जाणून घेऊया.
अत्यंत साधा आणि सोपा उपाय म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडणे. रोज सकाळी स्नान केल्यानंतर तांब्यात पाणी घेऊ त्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडणे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. अशाने त्या घरात सकारात्मक उर्जा येते आणि त्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते असं सांगितलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाजावर मीठाचे पाणी शिंपडावे. असे मानले जाते की मीठ नकारात्मकता दूर करते. यासोबतच खारट पाणी शिंपडून रोगराई आणि काही दोष दूर ठेवता येतात. त्यामुळे तुम्ही हा उपायही अवश्य करा.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर हळद मिसळलेले पाणी शिंपडणे खूप शुभ असते. रोज सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकावी. त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडा. असे केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते, तसेच घरात धन-संपत्तीची कमतरता भासत नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या