अनेकदा वास्तुदोषाचा परिणाम त्या व्यक्तीच्या प्रगतीवर होतो सतत काही ना काही कारणाने ही व्यक्ती किंवा कुटुंबातली एखादी व्यक्ती सतत आजारी राहाते. वास्तुदोष वैवाहिक जीवनावरही थेट परिणाम करतो आणि वैवाहिक जीवनही नकारात्मकतेने भरून टाकतो. घरातल्या छोट्या छोट्या चुका वास्तुदोषाला कारणीभूत ठरतात.
काही छोट्या गोष्टी अजाणतेपणे आपल्याकडून घरात ठेवल्या जातात आणि मग त्या गोष्टी आपल्या आसपास नकारात्मक उर्जा सरकवायला सुरूवात करता. मग चिडचिड, भांडणं असं आपल्या घरात घडू लागतं आणि घराची आणि पर्यायाने घरातल्या सदस्यांची प्रगती थांबते.
घरात अशा काही गोष्टी असतील ज्या बाहेर काढणं अत्यंत महत्वाचं असतं त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण पाहाणार आहोत.
जुने किंवा फाटलेल्या कपड्यांची ठेवलेली बंडलं, फाटलेले जुने कपडे किंवा चादर देखील घरात नकारात्मक मानसिकता आणि ऊर्जा निर्माण करतात. असे कपडे कोणाला तरी दान करावेत किंवा इतर काही कामासाठी वापरावेत.
तुटलेली भांडी, आरसे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चित्रे, फर्निचर, पलंग, घड्याळ, दिवे, झाडू, मग, कप इत्यादी घरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो. असेही मानले जाते की यामुळे वास्तु दोष तर निर्माण होतातच, पण लक्ष्मीचे आगमनही थांबते.
महाभारत हे भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर युद्ध मानले जाते. असे म्हणतात की या युद्धाची प्रतीकं म्हणजेच चित्र किंवा रथ इत्यादी घरात ठेवल्याने घरातील संकटे वाढतात. एवढेच नाही तर महाभारताचं पुस्तकही घरापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
खराब आणि निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर अशांसारखी सदोष असणारी उपकरणे चुकूनही घरात ठेवू नका.
नटराज हा नृत्याचा देव आहे. जवळजवळ प्रत्येक शास्त्रीय नर्तकांच्या घरात नटराजाची मूर्ती ठेवली जाते. परंतु असे मानले जाते की नटराजाच्या या मूर्तीमध्ये भगवान शिव 'तांडव' नृत्याच्या मुद्रेत आहेत, ही मुद्रा विनाशाचं प्रतीक आहे. त्यामुळे नटराज घरात ठेवणे देखील अशुभ मानलं जातं.
एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नयेत. असे केल्याने उत्पन्नाची साधनं कमी आणि खर्च जास्त होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या