मराठी बातम्या  /  Astrology  /  Vastu Shastra For Money Problem

Vastu Tips : तुमच्या घरात तुम्ही करता का या छोट्या छोट्या चुका?, करत असाल तर वेळीच व्हा सावधान

तुमच्या घरात तुम्ही करता का या चुका
तुमच्या घरात तुम्ही करता का या चुका (Freepik)
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
May 10, 2023 11:51 AM IST

Vastu Shastra For Home : अनेकदा वास्तुदोषाचा परिणाम त्या व्यक्तीच्या प्रगतीवर होतो सतत काही ना काही कारणाने ही व्यक्ती किंवा कुटुंबातली एखादी व्यक्ती सतत आजारी राहाते. वास्तुदोष वैवाहिक जीवनावरही थेट परिणाम करतो.

वास्तुशास्त्रानुसार घरातच असलेल्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा निर्माण होते. ज्याचा चांगला किंवा वाईट परिणाम घरातल्या सदस्यांवर होत असतो. अनेकदा घरातील वास्तुदोषाचा थेट परिणाम त्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. कधीकधी हा परिणाम त्या घरातल्या प्रत्येक सदस्यावर झालेला पाहायला मिळतो. अनेकदा वास्तुदोषाचा परिणाम त्या व्यक्तीच्या प्रगतीवर होतो सतत काही ना काही कारणाने ही व्यक्ती किंवा कुटुंबातली एखादी व्यक्ती सतत आजारी राहाते. वास्तुदोष वैवाहिक जीवनावरही थेट परिणाम करतो आणि वैवाहिक जीवनही नकारात्मकतेने भरून टाकतो. घरातल्या छोट्या छोट्या चुका वास्तुदोषाला कारणीभूत ठरतात.

ट्रेंडिंग न्यूज

ईशान्य दिशेला शौचालय असल्यास व्यवसायात नुकसान होते आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकते.

ईशान्य कोनात पाण्याची टाकी ठेवली असल्यास पाण्याचं हे वजनही तुम्हाला कर्जबाजारी करू शकतं. याच कोनात जर तिजोरी ठेवली असेल तर आर्थिक संकट येऊ शकतं.

उत्तरेकडील भिंतीवर कोणतीही जड वस्तू किंवा डोगर आदी काही चित्र असल्यास अनावश्यक खर्चासाठी कर्ज काढावे लागू शकते.

आग्नेय कोनात पाण्याची टाकी, स्विमिंग पूल किंवा कोणतंही लोखंडी साहित्य ठेवल्यास कर्जाची समस्या उदभवू शकते.

आग्नेय कोनात स्नानगृह किंवा शौचालय असल्यास कर्ज घेण्याची परिस्थिती येऊ शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग